अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ एप्रिल ते ११ एप्रिल २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. जोडीदाराविषयी एखादी चांगली बातमी कळू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गोष्टींसाठी/ उपासनेसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ काढा. ईंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे.  त्यानंतरचे दोन दिवस उपासना करण्यास चांगला कालावधी आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ आपल्यावर खुश असतील. सप्ताहाचा शेवट लाभदायक असू शकेल.
उपासना: मारुतीची उपासना फ़ायदेशीर ठरेल. हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. घरच्यांबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय असणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवहार स्वच्छ ठेवावेत. ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा यकृतासंबंधीचा काही त्रास असेल त्यांनी आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. अंगावर दुखणे काढू नका. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी आपले काम बरे आणि आपण बरे हे धोरण ठेवावे. वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची पुर्ण काळजी घ्यावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. स्पर्धा परीक्षेमध्ये यश संभवते. नविन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराला जपावे. वादविवाद टाळावेत. त्याच्या तब्येतीविषयी काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे विकार असतील त्यांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. अती मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. सप्ताहाचा शेवट काहींना भाग्यवर्धक आहे. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना हा संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना विरोधी ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. संधीवात, ह्रदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यावी. वकील व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र हा अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर वाहने हळू चालवावीत. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
उपासना: हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतुन लाभ संभवतात. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला आहे. घरातील काही दुरुस्तीची कामे प्रलंबीत असतील तर आता त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे मात्र यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. कमोडीटी, शेअर मार्केट किंवा तत्सम गोष्टींमध्ये गुंतवणूक सध्या नुकसानीची ठरु शकेल. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना सप्ताहाचा शेवट चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस काहींना धनलाभाची प्राप्ती होऊ शकेल मात्र वादाचे प्रसंग टाळावेत. डोळ्यांचे किंवा दाताचे काही विकार असतील तर वेळीच उपचार करुन घ्यावेत. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग आहेत. मात्र अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. घरातील वातावरण छान असेल. प्रॉपर्टीच्या संबंधी कामे करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होईल. मन प्रसन्न असेल. घरात आपल्या आवडीच्या पदार्थांची रेलचेल असेल. घरातील वातावरण चांगले राहील. सप्ताह मध्यात भावंडांशी संपर्क साधाल. लेखक/ ब्लॉगर्स यांना चांगले ग्रहमान आहे. हातून चांगले काम घडेल. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणार्‍यांना या काळात एखादा चांगला फ़ायदा होऊ शकेल. नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस अचानक खर्चाचा असेल तसेच नृत्यकलेशी संबंधीतांना चांगला असेल. नंतरचे दोन दिवस संमिश्र घटनांचे असतील. सप्ताह मध्य आत्मविश्वासात वाढ करविणारा असेल. मात्र त्यामुळे आपलेच म्हणणे खरे असा हटवादीपणा ठेऊन लोकांची मने या काळात दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस अनुकूल कालावधी आहे. काही लाभाचे प्रसंग घडतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक घटना शक्य आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात काही खरेदी किंवा अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च करावा लागेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ होतील.
वरीष्ठ आपल्या कामावर खुश असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला गुरु कुंभ राशित प्रवेश करेल, चंद्राची शनिशी युती आणि सूर्याचा चंद्राशी व शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला बुधाचा शनिशी व शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. भाग्यवर्धक काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. मित्रमंडळींच्या भेटी घडू शकतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group