अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ मार्च ते २० मार्च २०२१)) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानकपणे करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. वरीष्ठ दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. पारमार्थिक उन्नती करणार्‍यांसाठी मात्र हा काळ उत्तम असणार आहे. सप्ताहाच्या मध्यात छान धनलाभाचे योग आहेत. गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाची अखेर लाभदायक आहे. आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. कायदा व शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात जोडीदारासाठी काही खरेदी कराल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून अचानक फायदा शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. छान लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी/ सहकार्‍यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराबरोबर काही वाद असतील तर ते वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्य संमिश्र असेल. काही लाभ संभवतात. मात्र एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.
सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. नित्योपासना करण्यास अनुकूलता जाणवेल.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मधूमेह असणार्‍यांनी मात्र या काळात पथ्यपाणी सांभाळायला हवे. सप्ताह मध्यात चांगलं काम झाल्यामुळे खुष असाल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. काही धनलाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यानंतर लेखक, कवी, साहित्यिक यांना छान ग्रहयोग आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. आरोग्याबाबत काही तक्रारी जाणवतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या कामात केलेला हलगर्जीपणा नुकसानीचा ठरु शकतो. या काळात आपले काम बरे व आपण बरे हे धोरण ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी काही धनलाभही होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा असू शकतो. अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचा त्रास या काळात होऊ शकतो. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. वाहने सावकाश चालवावीत. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यायला हवी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र चांगला काळ आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. हा काळ भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला नाही. गैरसमज टाळावेत. सप्ताह अखेर विचित्र घटनांची असू शकेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम करु नका.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान चांगलं आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. लेखकांना, कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील चांगले वातावरण असेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल कालावधी आहे. तब्येतीचे किरकोळ त्रास जाणवतील. सप्ताहाचा मध्यात व सप्ताह अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना व खेळाडूंना यशासाठी जास्त मेहनत घ्यायला लागेल. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, वकील यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल कालावधी आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काही लाभ मनाला आनंद देतील. सप्ताह अखेरीस तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. खरेदीसाठी अनुकूल कालावधी आहे. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. हातासंबंधी काही व्याधी असतील तर त्याचा थोडा त्रास या काळात संभवतो. सप्ताह मध्यानंतर घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शनीशी लाभयोग होईल, शुक्राची नेपचूनशी युती होईल व सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १५ तरखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राचा शनीशी केंद्रयोग तर हर्षलशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्य व शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि २० तारखेला चंद्राचा गुरुबरोबर त्रिकोण होईल.
फलादेश- एकंदरीतच पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यार्‍या घटना संभवतात. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर वरीष्ठ खुश असतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह मध्यही तुम्हाला अनुकूल असणार आहे. लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रवासाचे योग संभवतात. लेखक, कलाकार व ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)