For Online booking, Click on the link- https://forms.gle/qyt4UxdpWvvqMoup9
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ मार्च ते १३ मार्च २०२१)Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यासही हा कालावधी चांगला आहे. अचानक लाभही होऊ शकतील. काहींना प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग शक्य आहेत. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. कुठलाही शारिरीक त्रास असल्यास अंगावर काढू नका. वैद्यकिय सल्ला नक्की घ्या. जोडीदाराशी किंवा मित्रांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काही लाभ होण्याची शक्यता आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताह प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराच्या तब्येतीला जपावे तसेच जोडीदाराशी व आपल्या वरीष्ठांशी वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी आपले व्यवहार पारदर्शक ठेवावेत. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट तसेच कागदपत्रे सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. वरीष्ठांची मर्जी खफा होईल असे वर्तन या काळात टाळावे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मात्र जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या मुलांच्या स्वभावाचे वेगळेच कंगोरे या काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे. वाद टाळावेत. विद्यार्थी व प्रेमिकांना फ़ारसा चांगला कालावधी नाही. सप्ताह मध्यात व नंतर काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला जाईल. काही लाभही होतील. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. खेळाडू व विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. ह्रदयविकाराचा त्रास असणार्यांनी थोडी काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. चांगल्या घटना घडतील. काहींना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. भागीदारीतील व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात बुध, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादा धनलाभ होऊ शकेल. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्तरुप देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात डोळे किंवा दात यांच्यासंबंधी काही त्रास जाणवू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभ संभवू शकतात. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी काही अनावश्यक खर्च डोके वर काढतील. परदेशासंबंधीत कामांसाठी मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण व शनिशी युती होईल. १० तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राची अनुक्रमे शुक्र व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. काहींना प्रवास संभवतो. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)