माझे पहिले पुस्तक ’कोरोना व्हायरस- ज्योतिषीय दॄष्टीकोनातून’ येत्या मार्च महिन्यात प्रकाशित होत आहे. सध्या त्या पुस्तकाच्या किंमतीवर प्रकाशनपूर्व १०% सवलत सुरु आहे. ही सवलत मर्यादित काळासाठीच व मर्यादित आवृत्यांसाठीच आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा. नोंदणी साठी पुढील लिंकचा वापर करा.
https://astroshodh.com/corona-virus-books/#Corona_Virus_English_Book
पुस्तकाच्या विक्री विभागाचा नंबर ९६०७०४९०४९  असा आहे. हा नंबर Whats App वर सुध्दा आहे.

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२१)Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सोमवार, मंगळवार भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवास छान फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना हा कालावधी खूप चांगला आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. घराच्या सजावटीसाठी खरेदी कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर शेवटपर्यंत कायम टिकणार आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनासारखी खरेदी होईल. बोलण्यावर संयम ठेवावा. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. नृत्यकलेशी संबंधितांना मात्र हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्य शेवटी शेजारी रहाणार्‍यांचा चांगला अनुभव येईल. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग शक्य आहेत. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण आनंदी असेल. हातातली कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे तुमचा कल असेल. सप्ताह अखेरीस मनाविरुध्द घटना शक्य आहेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला वरीष्ठ खूश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. जोडीदारासाठी लाभदायक योग आहेत. सप्ताहाचा मध्य आरोग्यासाठी अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्यावी. या काळात कोणाशीही वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील नंतर मात्र सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतात. जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनही चांगला कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सासरकडच्या लोकांबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची बहाल मर्जी असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात बुध, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाराकडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. धनलाभ होतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. काही लाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त मजेत वेळ जाईल. कलाकारांना दिवस अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. काही विचित्र अनुभवही शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना फारसा अनुकूल नाही. कमी श्रमात जास्त यश मिळविण्याचा प्रयत्न या कालावधीत अंगाशी येऊ शकतो. काळजी घ्यावी. प्रेमिकांसाठीही प्रतिकूल काळ आहे. वादाचे प्रसंग टाळावे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात बुध, गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्र व शुक्राचा त्रिकोण होईल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. २५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनि, बुध व गुरुशी प्रतियोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २७ तारखेला सूर्य व चंद्राचा प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. मात्र रविवारी प्रवास टाळावेत. विद्यार्थी, लेखकांना व कलाकारांना हा कालावधी खूप चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप, बक्षिस सुखावून टाकेल. धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)