अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, लाभस्थानात बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदारांसाठी चांगले आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात बुध, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात बुध, नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भावंडे/ नातेवाईक किंवा शेजारी यांच्याबरोबर मजेत जाईल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा राहील. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात बुध, नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस प्रिय घटनांचा असेल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. नंतरचे दोन दिवस प्रवासाचे योग येऊ शकतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. आपल्या रागावर या काळात नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सोशल मिडीयावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरात छान खरेदी कराल. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रेमिकांसाठीही चांगला कालावधी आहे. शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात बुध, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. आरोग्याच्या काही समस्यासुध्दा जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस घरातील लोकांबरोबर छान जातील. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या लेखनामुळे किंवा बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. प्रवास करणार असाल तर शक्यती सर्व काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानात बुध, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार हा कालावधी त्रासदायक असू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. तब्येतीचीही काळजी या काळत घेणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थी, कलाकार यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वाद टाळा. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. लेखकांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात बुध, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. नंतरचे दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रॉपर्टीच्या कामांसाठी, गृहसजावटीसाठी वेळ काढाल.
सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका आणि आपली मते दुसर्यांवर लादू नका. पित्ताचा किंवा पोटाचा काही त्रास असेल तर काळजी घ्या.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी बुध, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सोमवार, मंगळवार आपल्या कामात आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक, साहित्यिक यांना खूप चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात बुध, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांना असू शकेल. वडीलधारी मंडळींचा सहवास लाभेल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती दगदग या कालावधीत टाळावी. सोमवार, मंगळवार भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. काहींना धनलाभ होतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला सूर्य व मंगळ यांचा केंद्रयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर शुक्र व शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा सूर्य व गुरुशी केंद्रयोग तर मंगळाशी प्रतियोग होईल आणि बुध वक्रगतीने मकर राशीत प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा अनुक्रमे सूर्य, गुरु, शुक्र व शनिशी लाभयोग होईल व शुक्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात चांगली होणार आहे. रविवारच्या दिवशी आपल्या आवडत्या लोकांबरोबर एखाद्या पार्टीचे किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर रुसवे/ फुगव्याचे असू शकतात. खरेदीसाठी मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)