अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२०) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, दशमस्थानात गुरु, शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. काही भाग्यवर्धक घटनाही शक्य आहेत. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये मन रमेल. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगला आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना व नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही प्रलंबित कामे असल्यास त्यांना प्राधान्य द्या. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची कामे मात्र सध्या नकोत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा व्यवहारापासून लांब रहा. काही खर्च अचानक समोर येतील. सप्ताहाच्या अखेरीस जोखीम टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात शुक्र, केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाचे पहिले चार दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा पुरेसा मोबदला मिळणं कठीण आहे. मात्र काळजी करू नका. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान आपल्याला पुन्हा अनुकूल होत आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. त्यानंतर सप्ताह मध्यात भाग्यकारक घटना शक्य आहेत. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू किंवा अचानक मिळालेली पगारवाढ थक्क करु शकेल. अध्यात्म, न्यायक्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर छान काम केल्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- संपूर्ण सप्ताह आरोग्याची काळजी घ्यायची आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढतील तिकडे दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. ईंशुरन्स संबंधी कामे करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत. लाभदायक कालावधी आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, केतू, तृतियस्थानी सूर्य, बुध, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र काळ आहे. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. मात्र काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, केतू, धनस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, तृतियस्थानी गुरु, शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चैन, मौजमजा यांनी होऊ शकेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. शिक्षणासठी परगावी किंवा परदेशात जाण्याचा प्रयत्न करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ आहे. नविन गुंतवणूकीसाठीही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी सूर्य, बुध, प्लूटो, धनस्थानात गुरु, शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर कमी श्रमात जास्त यश देणारा काळ आहे. मुलांबद्दल चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही लाभ होऊ शकतील. घरात आनंदी वातावरण असेल. लेखक, वक्ते व कवी छान काम झाल्याने आनंदात असतील. सप्ताह मध्यात छान लाभ होतील. भावंडांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला जाणार आहे. सप्ताह मध्यानंतर भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. प्रवासयोग येतील. प्रेमिकांना ग्रहमान छान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, केतू, लाभस्थानात सूर्य, बुध, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छान खरेदी होईल किंवा अचानक काही खर्च करावे लागतील. प्रवासयोग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मन आनंदी असेल. जुने मित्र भेटतील. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे आपल्याला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव सप्ताह मध्यात येणार आहे. आपले वरीष्ठ व सहकारी आपल्यावर खुश असतील. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, भाग्यस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात सूर्य, बुध, प्लूटो, लाभस्थानात गुरु, शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा अनुक्रमे गुरू व शनिशी लाभयोग होईल व गुरुची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. २३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला मंगळ मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा अनुक्रमे शनिशी व गुरुशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनासारखी खरेदी होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. मित्रांच्या भेटी होतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचेही योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक काळ आहे. खेळाडू, कलाकार व विध्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस भावंडांच्या भेटीचे योग येतील. कुटुंबीयांसमवेत वॆळ छान व्यतीत होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)