अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२०) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

(महत्वाची सूचना: मासिक राशिभविष्य ईमेलव्दारे पुन्हा सुरु करणार आहे. ज्यांना ईमेलव्दारे मासिक राशिभविष्य हवे असेल त्यांनी या पेजच्या एकदम खाली ’Newsletter ’ आहे त्यामध्ये आपली राशी निवडून त्या राशिच्या आधीच्या चौकोनात टीक करावी व आपला ईमेल ’ Email Address’ च्या चौकोनात लिहून ‘ Submit ‘ करायचे आहे).

साप्ताहिक राशिभविष्य
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात गुरु, शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
रविवारी सकाळी डोके किंवा डोळ्यांसंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील नंतर मात्र संपूर्ण सप्ताह छान असणार आहे. रविवार दुपार ते बुधवार रात्रीपर्यंत घरातील वातावरण आनंदी असेल. जोडीदाराबाबत एखादी चांगली बातमी कळू शकेल. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग संभवतात. मात्र या काळात प्रवास शक्यतो टाळावेत. लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांनी या काळात वादग्रस्त होईल असे लेखन करु नये. या काळात गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाढणार आहे. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, विमा प्रतिनिधी यांना मात्र हा काळ फ़ायदेशीर ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. हातातील काम लवकर संपवून आराम करण्याकडे कल असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली असेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. मात्र आरोग्याच्या काही समस्या या दरम्यान जाणवतील. सप्ताहाचा मध्य खूप छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यापासून धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यावसायिंकांना यशदायक व फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संपर्क साधाल. लेखक, साहित्यिक व ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रवास फ़ायदेशीर ठरतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. भाग्यवर्धक योग आहेत. सप्ताहाची सुरुवातच एखाद्या छानशा धनलाभाने होईल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. प्रेमिकांना हा कालावधी खूप चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य नोकरदारांसाठी भाग्यवृद्धीचा आहे. तुमचा कोणी गॉडफादर असेल तर त्याच्यापासून तुम्हाला चांगला फायदा होईल. मात्र या काळात सर्दी, सायनस यासारखे त्रास जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट मिष्टान्न भोजनाचा असेल. एखादा धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. भाग्यवृध्दीचे किंवा धनलाभाचे योग आहेत. वरिष्ठ खुश असतील. पदोन्नती किंवा पगारवाढ यासाठी प्रयत्न करीत असाल तर अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी खरेदी होईल मात्र कसली तरी चिंता मनाला लागून राहिलेली असेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा लोकांना लाभदायक ग्रहयोग आहे. लेखक, ब्लॉगर्स यांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे. ज्यांचा व्यवसाय वडिलार्जित किंवा पारंपारिक आहे त्यांना हा काळ विशेष फायदेशीर आहे. सॉफ़्टवेअर, प्रिंटींग, पब्लिशिंग तसेच ट्रॅव्हल कंपनिशी संबंधित लोकांना फ़ायदेशीर ग्रहयोग आहेत. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी किंवा फ़ोनवरचा संवाद आनंद देतील. काही लाभही होऊ शकतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी चांगला आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
रविवारची सकाळ प्रतिकूल घटनांनी होऊ शकते. जोखीम असलेली कामे करू नका. कुटुंबियांशी वाद टाळा. रविवारची दुपारपासून बुधवार रात्रीपर्यंतचा काळ भाग्यवृध्दीकारक आहे. काही धनलाभही होऊ शकतील. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना संभवतात. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे. लेखक, ब्लॉगर्स, कमिशन एजंट व ट्रॅव्हल कंपनीच्या लोकांना लाभदायक कालावधी आहे.
भावंडांकडून मदत मिळू शकेल. सप्ताहाचा शेवटसुध्दा लाभदायक असेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, केतू, तृतियस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी वाद टाळावे. जोडीदाराच्या काही मागण्या असतील तर जरूर विचार करा. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला अंधारात ठेवून कोणतीही गोष्ट या काळात करु नये. अन्यथा त्याचे परीणाम दीर्घकालीन व नुकसान करणारे असू शकतील. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्य अनुकूल घटनांचा आहे. विद्यार्थी, कलाकार, शिक्षक व न्यायाधीश यांना अनुकूल ग्रहमान आहे. लांबच्या प्रवासाचे बेत ठरतील. आपल्या एखाद्या छंदाला जरूर वेळ द्या. सप्ताहाचा शेवट आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवून देईल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, केतू, धनस्थानात प्लूटो, तृतियस्थानी गुरु, शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील. तुमच्यात व तुमच्या जोडीदारात काही वाद असतील तर ते वाढू देऊ नका. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यातसुध्दा ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेले कामे करू नका. मात्र हा योग काही लोकांना अचानक धनलाभ देऊ शकेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग शक्य. भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात गुरु, शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, षष्ठस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीनी प्रतिकूल आहे. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, फिजिकल फिटनेस क्षेत्रातील लोक, वकील तसेच फार्मासिस्ट यांना हाच कालावधी उत्तम असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळा. परदेशाशी संबंधीत भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यांना हा काळ चांगला फ़ायदा देणारा ठरु शकेल. सप्ताहाचा शेवट संमिश्र ठरू शकतो. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. ज्योतिषी, इतिहासकार व मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ यशदायक असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला अतिशय छान ग्रहमान आहे. केलेल्या कामाचे चीज होईल. काही धनलाभही शक्य आहेत. अनपेक्षितपणे मिळालेलं एखादं बक्षिस, मानसन्मान आनंद वाढविणार आहे. शेअर किंवा तत्सम क्षेत्रातून लाभाचे योग आहेत मात्र त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावेत. कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांनाही हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्य नविन नोकरी मिळण्याच्या किंवा नोकरीबदलाच्या दृष्टीने अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनाही कालावधी अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना विशेष अनुकूल काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. शेजार्‍यांचा एखादा चांगला अनुभव या काळात येईल. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दी करणारे योग आहेत. कमी कष्टात जास्त पैसा मिळेल. एखादे बक्षिस किंवा मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील लोकांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात गुरु, शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग तर गुरु, शनि व प्लूटोशी त्रिकोण होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याचा चंद्राशी प्रतियोग व बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्रवारी त्रिकोण होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आनंददायक असेल. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रवासयोग येतील. मात्र प्रवास या काळात टाळलेलेच बरे. लेखक व वक्त्यांना या कालावधीत काही वादग्रस्त लिखाण सोशल मिडियावर शेअर केलं जात नाही ना याची दक्षता घ्यावी लागणार आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण या काळात वाटत राहिल. ज्योतिषशास्त्रासारखे विषय शिकायचे असतील तर आत्ताचा काळ खरच चांगला आहे.
सप्ताह मध्य भाग्यकारक असेल. धार्मिक गोष्टींसाठी कालावधी अनुकूल आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group