अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२०) (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

सर्वांनाच दिवाळीचे वेध लागलेले आहेत. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जिवनात आनंद, उत्साह व उत्तम आरोग्य घेऊन येवो ही परमेश्वराजवळ प्रार्थना!

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी, हर्शल, धनस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाची सुरुवात सुखद असेल. रविवारी प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही चांगला काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना चांगले आहेत. ज्यांना विवाह ठरवायचा असेल त्यांच्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. भागीदारीत नव्याने व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठीही ग्रहांची अनुकूलता आहे. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घ्यावी तसेच जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री) आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामांना प्राधान्य द्या. तसेच घरातील वातावरण बिघडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासाला कोणताही शॉर्टकट नसतो याची जाणिव होईल. सप्ताह अखेरीस वैद्यकीय व्यवसाय करणारे व फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना कालावधी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थी, वक्ते, लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला आहे. नविन काही शिकायची इच्छा असेल तर आता त्यासाठी वेळ काढा. आपले काही छंद असतील तर त्यापासुन आनंद मिळेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. घरातील आवराआवरीच्या किंवा घ्रराच्या सजावटीसाठी वेळ काढाल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. वक्ते, लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला आहे. आप्तेष्टांशी संपर्क साधाल. घरात आनंदाचे वातावरण असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही खर्च करावे लागतील. मनाला काही गोष्टींची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. सप्ताह मध्य छान आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. प्रवासयोगही संभवतात. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल. सप्ताह अखेरीस अनुकूल काळ आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. सोमवार दुपारनंतर बुधवारपर्यंत बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. मात्र या कालावधीत एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात धनलाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर डोळ्यांच्या काही समस्या असतील तर काळजी घ्या. घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताह अखेरीस जोडीदाराबरोबर वेळ आनंदात घालवाल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), सप्तमस्थानात हर्शल, अष्टमस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील.
सप्ताह मध्यात काही बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. सप्ताहाचा शेवट धार्मिक बाबतीत चांगला आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच वरीष्ठांचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. बेकायदा गोष्टींपासून चार हात लांव रहा. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), पंचमस्थानात हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सोमवार सकाळपर्यंतचा काळ संमिश्र घटनांचा असू शकेल. गुढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम होईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात. त्यामुळे खुश असाल. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सोमवार दुपारपर्यंतचा काळ घरच्यांबरोबर छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतात. वाहने हळू चालवावी. रागावर नियंत्रण ठेवावे. जोखिम असलेली कामे टाळावीत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आपल्या जिवलग माणसांबरोबर वेळ मजेत घालवाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)सप्ताह मध्य

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ (वक्री), तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कुठल्याही वादात पडू नका. काही आजूबाजूचे लोक किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्र व कायदाविषयी कामे करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर जोखिम असलेली कामे टाळावीत. गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ (वक्री), धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सुर्याचा चंद्राशी केंद्रयोग व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल चंद्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल व गुरुची प्लूटोशी युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १३ चंद्राची बुधाशी युती व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल याचबरोबर मंगळ स्तंभी असणार आहे. १४ तारखेला मंगळ मार्गी होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य. सप्ताह मध्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. नोकरीबदल करण्यासाठी अनुकूल काळ आहे. मात्र या काळात तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group