अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२०)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी, हर्शल, धनस्थानात राहू, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
फ़लादेश- रविवारी जोखमीची कामे टाळावीत. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. उष्णतेचे काही त्रासही संभवतात. त्यानंतरचे दोन दिवस आपला एखादा स्नेही/ नातेवाईक किंवा आवडती व्यक्ती भेटल्याने मन आनंदी असेल. एखादा छानसा धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. लाभदायक ग्रहमान आहे. लेखक, ब्लॉगर्स व गायकांना हा कालावधी उत्तम आहे. मौज मजेचे प्रसंग घडतील. प्रवासासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री) आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
फ़लादेश- रविवारी आरोग्याचे काही समस्या जाणवत राहतील. सोमवार मंगळवार लाभदायक ग्रहमान आहे. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना काही लाभ अनपेक्षितपणे होऊ शकतील. पती किंवा पत्नी विषयी चांगल्या बातम्या कळतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. मोठी आव्हाने या दोन दिवसात नकोत. ज्योतिषी इतिहासकार मानसोपचारतज्ञ या लोकांना मात्र हा काळ अतिशय चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गोष्टीत मन रमेल. आपले धार्मिक मध्ये मात्र इतरांवर लादू नका.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
फ़लादेश- विवारचा दिवस चांगला आहे. भावंडांशी संपर्क होईल. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. कलाकारांसाठी व साहित्यिकांसाठी महत्वाचा दिवस असेल. नंतरचे दोन दिवस वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी चांगले असतील. नोकरीच्या शोधात असणार्यांना आशेचा किरण दिसायला लागेल. अॅसिडिटी किंवा पोटाच्या संदर्भात काही तक्रारी जाणवू शकतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ छान व्यतित कराल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
फ़लादेश- रविवारी प्रापर्टीच्या कामांसाठी चांगला दिवस आहे. लाभदायक ग्रहमान आहे. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. उपासनेसाठीसुद्धा हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत काही प्रतिकूल घटना शक्य आहेत. मधूमेह असणार्यांनी या काळात आहाराकडे दुर्लक्ष करता कामा नये. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनाविरुध्द घटना घडण्याची शक्यता आहे. घरातील शांतता बिघडेल असे वर्तन टाळावे. प्रॉपर्टीचे व्यवहार करायचे असतील तर काही दिवस थांबलेलेच बरे. अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), अष्टमस्थानात हर्शल, भाग्यस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची असू शकेल. डोळ्यांच्या काही समस्या जाणवतील. काही अचानक काही खर्च उद्भवू शकतील. निराशावादी विचार मनात येऊ देऊ नका. सप्ताहाचा मध्य लेखक/ ब्लॉगर्स यांना अनुकूल आहे. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे. विवाहोत्सुक व्यक्तींना चांगला कालावधी आहे.
वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट काही गोष्टीत विलंब दाखवित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.
उपासना: दत्तगुरुंची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), सप्तमस्थानात हर्शल, अष्टमस्थानात राहू आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रांच्या भेटीमुळे किंवा फ़ोनमुळे आनंदी असाल. नंतरचे दोन दिवस आरोग्यासंबंधी काही समस्या दर्शवित आहे. अॅसिडिटी/ पोटासंबंधी किंवा डोळ्यांसंबंधी त्रास संभवितात. या काळात तुमच्या बोलण्यामुळे कोणीतरी दुखावले जाण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान अनुकूल आहे. लेखाक, साहित्यिक व डॉक्टर्स यांना चांगला काळ असेल. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. मात्र अती दगदग या काळात महागात पडू शकेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला खरेदीसाठी चांगला काळ आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही अनुकूल बदल दिसू शकतील. विद्यार्थी, खेळाडू यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. घरात छान पार्टीचे वातावरण असेल. जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवा. लेखाक, ब्लॉगर्स यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. भावंडांशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), पंचमस्थानात हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षक, न्यायाधीश यांच्यासाठी मात्र ग्रहमान अनुकूल असेल. एखादं विलंबित काम एखादा मित्र किंवा ऒळखीच्या व्यक्तीमुळे सहजगत्या होण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यात परदेशाशी काही व्यवहार असतील तर आता त्यात सकारात्मक बदल घडतांना दिसू लागतील. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्या काही घटना शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवट संमिश्र घटनांचा असू शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताहातील सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडल्यामुळे वरीष्ठ खुश असतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. काही लाभही शक्य आहेत. प्रिंटींग/ पब्लिशिंग, साहित्य या क्षेत्रातील लोकांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाचा मध्य खरेदीसाठी चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी जे लोक प्रयत्न करीत आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ (वक्री), तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय असणार्यांसाठी काही अनुकूल बदल किंवा नविन कल्पना यश देतील. सप्ताहाच्या मध्यात घरात प्रसन्न वातावरण असेल. एखादा धनलाभही होण्याची शक्यता आहे.
सप्ताह मध्यानंतर मित्रांच्या किंवा आपेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. ग्रहमानाची साथ चांगली लाभली आहे. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च अचानक उद्भवू शकतील.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ (वक्री), धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला सुर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. चंद्राचा अनुक्रमे गुरु, शुक्र व शनि यांच्याशी लाभयोग होईल तर शुक्राचा नेपचूनशी प्रतियोग होईल. १९ तारखेला शुक्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २१ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्र व गुरु युती होईल. २३ तारखेला शुक्र कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्र व शनि यांची युती होईल.
सप्ताहाची सुरूवात संमिश्र घटनांनी होईल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर भग्यवर्धक घटनांचा काळ असेल. मनासारखी छान कामे झाल्यामुळे प्रसन्न असाल. डोकेदुखी किंवा उष्णतेसंबंधी काही त्रास या काळात होणे शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)