अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२०)  (Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, धनस्थानात राहू, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री) आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. मात्र असे असले तरी वरीष्ठ तुमच्या चुका शोधण्याचाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांनी जोखिमेचे व्यवहार सध्या टाळावेत. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या किंवा जुन्या मित्रांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग आहेत. ज्यांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, तृतियस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ (वक्री), हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज भासू शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. घरातील वडीलधारी मंडळींचं सहकार्य मिळेल. प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घेणे उचित ठरेल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. धातूसंबंधी व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादा धनलाभ होता होता राहून जाण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होण्याचीही शक्यता आहे. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र यासारखे विषय शिकायला ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात शारिरीक त्रासाची व कंटाळवाणी होईल. अपघातभय आहे. वाहने सावकाश चालवावीत. निराशवादी विचार मनात येतील. पण  काळजी कारु नका ही तात्पुरती ग्रहस्थिती आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत व्यतीत कराल. भागीदारीतील व्यवसायात चांगला फ़ायदा मिळेल.  सप्ताह मध्यानंतर काही लाभदायक घटना घडतील. मित्रांशी संपर्क होईल. मात्र एखाद्या मित्राशी वाद होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवू शकतील. आहारावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, तृतियस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांशी वाद टाळावेत. विद्यार्थ्यांना प्रतिकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात पती/ पत्नीबरोबर वाद टाळावे. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. वातविकार तसेच त्वचेसंबंधी काही समस्या जाणवतील. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताह मध्यानंतर काही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी वरीष्ठ दुखावले जातील असे वर्तन टाळावे. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. मात्र प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, तृतियस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ (वक्री), हर्शल आणि दशमस्थानात राहू व व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार सध्या नकोत. कोर्ट-कचेरीचे काही व्यवहार प्रलंबित असतील तर शक्यतो पुढची तारीख घ्यावी. या सप्ताहातील नको. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे लागेल. सप्ताह मध्यानंतर गूढ विषयांचा अभ्यास करण्यास चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध, तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु, प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, भाग्यस्थानात राहू आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांनी यशासाठी शॉर्टकट टाळावेत. कलाकारांना प्रतिकूल काळ आहे. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची सध्या काळजी घ्या. सप्ताह मध्य ज्यांना नोकरी बदलायची आहे त्या लोकांसाठी चांगला आहे मात्र नविन संधी हातात आल्याशिवाय हातातील नोकरी सोडण्याची घाई करु नका. तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. बांधकाम व्यावसायिक तसेच वकील यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, अष्टमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात थोडी प्रतिकूल आहे. वाद-विवाद टाळावेत. घरातील शांतता बिघडेल असे विषय सध्या टाळलेले बरे. ज्यांना श्वसवाचा/ दम्याचा त्रास आहे त्यांनी या काळात विशेष काळजी घेतलेली बरी. घरासंबंधी काही दुरुस्ती/ आवराआवरी बरेच दिवस रेंगाळली असेल तर त्यासाठी वेळ काढाल. प्रॉपर्टीच्या खरेदी/ विक्रीच्या कामांना प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. डॉक्टर, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स, न्युट्रिशियन्सचे काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावे.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु, प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, सप्तमस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला शेजार्‍यांशी किंवा भावंडांशी वाद होऊ शकतात. काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. घरात चांगले वातावरण असेल. मात्र दमा किंवा श्वसनासंबंधी त्रास असणार्‍यांनी या कालावधीत काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे मात्र अती आत्मविश्वास किंवा गाफ़िल रहाणे नुकसानीचे ठरु शकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, आणि षष्ठस्थानात राहू, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र घटनांची असेल. काहींना धनलाभ होतील. मात्र या कालावधित अचानक एखादा खर्च उद्भवू शकेल. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्ती भेटतील. काही छान लाभ होतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासाचे योग येतील. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर कामे चांगली झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. छान लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, पंचमस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. मात्र एखाद्या मित्राबरोबर किंवा कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. डोळ्यांची विशेष काळजी या काळात घ्यायची आहे. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग येतील. मात्र प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कलागुणांना छान वाव मिळणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. सप्ताहाच्या शेवटी अनुकुल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ (वक्री), हर्शल, चतुर्थस्थानात राहू, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकूल असेल. एखादा अचानक किंवा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक काही काळज्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र हा २/३ दिवसात परिस्थिती बदलणार आहे. सप्ताहाच्या मध्यामधे लाभदायक ग्रहमान आहे. एखादा धनलाभ होऊ शकेल. मित्रांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सप्ताहाच्या शेवटी लेखक व प्रकाशक यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ (वक्री), हर्शल, तृतियस्थानी राहू, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. या सप्ताहाच्या पुर्वार्धात शनि आधी वक्री मग स्तंभी आणि नंतर मार्गी अशा तिन्ही स्थितीत असणार आहे त्यामुळे फ़लादेशावर शनिचाच अंमल जास्त असणार आहे. २७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल व शनि मार्गी होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी व प्लूटोशी लाभयोग होईल. १ तारखेला सुर्याचा चंद्राशी प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्याला बरीच कामे करावी लागणार आहेत. त्यात चांगल्यापैकी यशस्वीसुध्दा व्हाल. वरीष्ठांकडूनही शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र भेटतील. परदेशासंबंधी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही अतींद्रीय अनुभव येण्याची शक्यता आहे. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. सप्ताह अखेर एखादा धनलाभ शक्य आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group