अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२०)
(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, punekar)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्शल, तृतियस्थानी शुक्र व राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री) आणि लाभस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. काहींना जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. नित्यउपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. छोटासा प्रवासही घडू शकतो. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. न्यायाधीश व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र व राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताह थोडा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकेल. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांना व वकीलांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराला जपा. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज असू शकेल. भागीदारीत व्यवसाय असेल तर कुठल्याही प्रकारे लपवाछपवी महागात पडू शकते. सप्ताह अखेरीस वाहने जपून चालवावीत. मात्र ज्योतिषी, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना अनुकूल ग्रहमान आहे. एखादा अचानक धनलाभही शक्य आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र व राहू, तृतियस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, आणि लाभस्थानात मंगळ, हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला घ्यावा. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस आपल्या आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. घरातील वातावरण छान असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्शल, आणि व्ययस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे मात्र कागदपत्रांची तपासणी तज्ञ व्यक्तीकडून केल्याशिवाय व्यवहार नकोत. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व प्रेमिकांसाठी अनुकूल आहे. उपासना, ध्यानधारणा मनाप्रमाणे होईल. काही अध्यात्मिक अनुभव शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील तसेच फ़िजिकल फ़िटनेससंबंधी काम करणारे लोक यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्शल आणि लाभस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहे. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी, प्रकाशक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. कलाकार, खेळाडूंचीही विशेष प्रगती होऊ शकते.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्शल, दशमस्थानात शुक्र व राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग आहेत. कौटुंबीक वातावरण छान राहील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. धनलाभही संभवतो. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. सोशल मिडियावर काहीही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची दक्षता घ्या. भावंडांशी मतभेद शक्य आहेत. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. उद्योग व्यवसायामध्ये सुरुवातीला लागलेला चांगला सूर सप्ताहाच्या शेवटीही जाणवत राहील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्शल, आणि भाग्यस्थानात शुक्र व राहू आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांची असू शकेल. शिक्षण क्षेत्रातील लोक, न्यायाधीश यांना ग्रहमान अनुकूल आहे. प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यात विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. धनलाभाचेही योग आहेत. मात्र या कालावधीत खाण्यापिण्यावर संयम ठेवा आणि आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्शल, अष्टमस्थानात शुक्र व राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही लाभ होऊ शकतात. नृत्यकलेशी संबंधीत असणार्या लोकांना विशेष चांगला कालावधी आहे. ऊपासना करणार्यांनाही विशेष अनुकूलता आहे. सप्ताह मध्यात उगीचच कुठल्यातरी गोष्टींची चिंता वाटत राहील. डोकेदुखी/ मायग्रेनचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. आपल्या चीजवस्तु सांभाळा. आपल्या हितशत्रूंकडे लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्शल, आणि सप्तमस्थानात शुक्र व राहू आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना धनलाभ संभवतात. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतात. ज्यांच्या नोकरी/ व्यवसायाचा संबंध परदेशाशी आहे अशांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट आत्मविश्वास वाढविणारा असु शकेल. अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्शल, षष्ठस्थानात शुक्र व राहू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रासाठी संमिश्र ग्रहमान आहे. आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वरीष्ठांशी वाद टाळावेत. आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, तृतियस्थानी मंगळ, हर्शल, पंचमस्थानात शुक्र व राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. एखादं बक्षिस/ भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व कलाकारांना खुप चांगला काळ आहे. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात मंगळ, हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र व राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याशी चंद्राचा व चंद्राशी बुधाचा लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाचा शनिशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा गुरुशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राची गुरु व शनिशी युती, शुक्राशी प्रतियोग आणि बुधाचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वाहने जपुन चालवावीत. मात्र इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. काहींना सुचक स्वप्ने पडू शकतात. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभही होतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)