अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ ऑगस्ट  ते २२ ऑगस्ट २०२०)

(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, punekar)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, तृतियस्थानी शुक्र व राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस लेखकांना व कलाकारांना चांगला आहे. नंतरचे दोन दिवस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहेत. इस्टेट ब्रोकर्स, बिल्डर्स यांना  व्यवसायवृध्दीचा काळ आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर एखादं अनपेक्षितणे मिळालेलं बक्षिस/ एखादी शाबासकीची थाप किंवा धनलाभ सुखावून टाकेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ काढा. मनाचं समाधान हेच जीवनातील खरं सुख असतं याची जाणीव होईल. सप्ताह अखेरीस आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. योग्य ती काळजी घ्यावी.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र व राहू, तृतियस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- आठवडा छान जाणार आहे. चागले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. छान पार्टीचा मूड असेल. गायकांना हा कालावधी खुप चांगला आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर घरासाठी/ घरातील वस्तुंच्या डागडुजीसाठी खर्च करावा लागेल. आपले काही छंद असतील किंवा नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र व राहू, धनस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना प्रवासयोग येऊ शकतात. जोडीदारबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि व्ययस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस एक प्रकारची हुरहुर किंवा एखाद्या गोष्टीची चिंता विनाकारण वाटत राहील. नंतरचे दोन दिवस मन प्रसन्न असेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादा धनलाभ संभवतो. मुलांबाबत चांगली बातमी कळेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना अत्यंत अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर काहींना भाग्यवर्धक घटनांची ठरेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी तसेच लेखकांना छान ग्रहमान आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र व राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारी एखाद्या मित्राशी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. नंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. अध्यात्मिक मार्गातील लोकांना चांगले अनुभव येतील. सप्ताह मध्यात आपली चीडचीड वाढणार नाही व घरातील लोकांवर आपला राग निघणार नाही याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी एखादा अनपेक्षित खर्च उद्भवू श्केल किंवा एखादा धनलाभ हॊता होता राहून जाण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र व राहू आणि लाभस्थानात सूर्य , बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छान ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात मनाजोगते काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांची किंवा मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा अनपेक्षित धनलाभ सुखावून टाकेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल, आणि भाग्यस्थानात शुक्र व राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनासारखे काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या ओळखीमुळे किंवा मित्रामुळे अडकलेले एखादं काम सहजगत्या होऊन जाण्याची शक्याता अहे. सप्ताह अखेर संमिश्र असेल. काही लाभ होण्याची शक्यता आहे मात्र बेकायदेशीर कृत्ये टाळावीत.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, आणि अष्टमस्थानात शुक्र व राहू आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारी दुपारपर्यंतचा काळ सोडल्यास सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.  काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, आणि सप्तमस्थानात शुक्र व राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारी संध्याकाळपर्यंतचा कालावधी चांगला आहे. काही लाभ होण्याची शक्यता आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. नंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा काळ कंटाळवाणा व कटकटीचा असला तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. एखादं अचानक मिळालेलं गिफ़्ट/ बक्षिस मनाला आनंद देऊन जाईल. नवनवीन कल्पना सुचतील. सप्ताहाचा शेवट चांगला असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, षष्ठस्थानात शुक्र व राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध,  आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य. भाग्यवृध्दीचे योग आहेत. धनलाभाचे योग येतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, पंचमस्थानात शुक्र व राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध,  लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस खुप चांगला आहे. काही लाभ होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस आरोग्याच्या तक्रारी जाणवत रहा्ण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी लागेल. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी अनुकूल आहे. इऩ्शूरन्सचे काम करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. जोखिम असलेली कामे मात्र टाळावीत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र व राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर गुरु व शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ मेषेत व सुर्य सिंहेत प्रवेश करेल. १७ तारखेला बुध सिंहेत प्रवेश करेल आणि सुर्याची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व नोकरीबदल करायची इच्छा असेल तर त्यांना अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर शारीरिक तक्रारी जाणवू शकतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, न्यायधीश यांनासुध्दा ग्रहमान अनुकूल आहे. नविन गुंतवणुक करणार असाल तर मात्र त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे नीट बघून व योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणुक करावी. सप्ताहाच्या शेवटी चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)