अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ ऑगस्ट  ते १५ ऑगस्ट २०२०)

(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, punekar)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, तृतियस्थानी शुक्र व राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- रविवारचा दिवस खर्च वाढवणारा असेल. काही काळज्याही असतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमवाल. सोमवार आणि मंगळवार रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखी/ मायग्रेनसारख्या आजारांचा त्रास संभवतो. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. लेखक व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. भावंडांशी संवाद साधाल. चांगला कालावधी आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र व राहू, तृतियस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- रविवा्री दुपारपर्यंत मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचा योग असेल. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ प्रतिकूल आहे. खर्च वाढतील. शत्रूपीडा जाणवू शकते. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. कुटूंबीयांसमवेत वेळ छान जाणार आहे. लेखक, कवी व गायकांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकेल. मात्र कोणाचं मन या काळात दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र व राहू, धनस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. वरीष्ठ आपल्यावर खुष असणार आहेत. मित्र भॆटतील. काही मानसन्मान किंवा लाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यात मनाजोगती खरेदी कराल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ शक्य आहेत.
उपासना: गणेशाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि व्ययस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दी करणारे असतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. कलाकार, विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रेमिकांना छान काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना काळ चांगला आहे. लेखक/ ब्लॉगर्स यांनी या कालावधीत वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र व राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहात सुरुवातीला जोखिम टाळा. प्रवास शक्यतो या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करावेच लागणार असतील योग्य ती काळजी घ्यावी. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. एखादं बक्षिस/ भेटसस्तू सुखावून टाकेल. प्रेमी जीवांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. छान लाभ झाल्याने प्रसन्न असाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र व राहू आणि लाभस्थानात सूर्य , बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. प्रवासात काळजी घ्या. सर्जन/ थेरपिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. न्यायाधीश, शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट आपल्यात आत्मविश्वास घेऊन येईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले कार्य घडेल. हा काळ धनलाभाचा ठरु शकेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल, आणि भाग्यस्थानात शुक्र व राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहात सुरुवातीला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास असतील त्यांनी या कालावधीत खाण्या- पिण्याबाबत काळजी घेतलेली बरी. जोडीदाराबरोबर वाद टाळा. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. काही मनाविरुध्द घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, आणि अष्टमस्थानात शुक्र व राहू आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- रविवारचा दुपारपर्यंतचा दिवस चांगला आहे. नंतर मंगळवारपर्यंत तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या काही तक्रारी असतील तर विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मित्रांबरोबर वाद टाळावेत. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मात्र हा काळ अतिशय लाभदायक असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद ताळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इन्शुरन्सचे काम करणार्‍यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, आणि सप्तमस्थानात शुक्र व राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध,  अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश असे समीकरण असेल. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असणार्‍यांना तसेच वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. कफ़ाचा काही त्रास असेल तर हा काळ थोडासा त्रासदायक आहे. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, षष्ठस्थानात शुक्र व राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध,  आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- रविवारचा दुपारपर्यंतचा दिवस प्रतिकूल आहे. त्यानंतर एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस नोकरदार व्यक्तींवर वरीष्ठांची चांगली मर्जी राहील. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, पंचमस्थानात शुक्र व राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध,  लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे मात्र या काळात वादग्रस्त लिखाण टाळा. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना चांगली आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र व राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र व मंगळाची युती व चंद्राचा केतुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १३ चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल.
फ़लादेश- रविवार दुपारपर्यंतचा काळ छान आहे. नंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. डोळ्यांची काळजी या काळात घ्यायला हवी. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. त्यांच्याकडून काही लाभही होऊ शकतील. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. अती दगदग टाळावी. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group