अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२०)
(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune, punekar)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, तृतियस्थानी शुक्र व राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. सप्ताहाच्या मध्यात काहींना लाभ संभवतात. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र यांसारख्या गूढ विषयांचा अभ्यास करण्यांसाठी चांगला काळ आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र व राहू, तृतियस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगारवाढीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस धनलाभाचे योग आहेत. विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, परामानसशास्त्रज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र व राहू, धनस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनीही या कालावधीत जपून व्यवहार करावेत. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम करु नये. विमा क्षेत्रात काम करणार्यांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र त्यात अडथळे येण्य़ाची शक्याता आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या वरीष्ठांच्या नाराजीला कारण ठरेल असे कृत्य़ आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि व्ययस्थानात शुक्र व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना व वकिलांना चांगली. तब्बेतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. जोडीदाराच्याही तब्येतीकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या मध्यात कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळा. सप्ताहाच्या शेवटी आपल्या हितशत्रूंकडे लक्ष ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याकडून या कालावधीत दिरंगाई/ कुचराई किंवा चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र व राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेसर्स/ कमोडीटी सारख्या व्यवहारापसून सध्या लांब रहावे, मैदानी खेळ खेळणार्यांना नविन संधी मिळतील मात्र शारीरिक दुखापती होऊ नयेत याची या काळात पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनी एखादी ऑफ़र मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कुठलाच निर्णय तातडीने घेऊ नका. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाचा शेवट ज्योतिषी, ईतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र व राहू आणि लाभस्थानात सूर्य , बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थ्यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र पंचमातील शनी विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करण्याची गरज आहे हे सांगत आहे. सप्ताहाच्या मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच आहारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळू शकते. अविवाहितांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला कालावधी आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल, आणि भाग्यस्थानात शुक्र व राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. प्रॉपर्टीच्या खरेदी/ विक्री करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा एखाद्या छंदासाठी जरूर वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून लाभ संभवितात. आहारतज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, आणि अष्टमस्थानात शुक्र व राहू आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. धनलाभाची शक्यता आहे. प्रवासाचे योग येतील. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्याने खूश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, आणि सप्तमस्थानात शुक्र व राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सप्ताहाची सुरूवात छान धनलाभाची असू शकेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला आहे. भावंडांशी संपर्क शाधाल. काहींना प्रवासयोग आहेत. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, षष्ठस्थानात शुक्र व राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: रविवारचा दिवस बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. काही अनावश्यक खर्च किंवा खरेदी करावी लगू शकेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. नंतरच्या ३/४ दिवसात दात व डोळे यांची काळजी घ्यावी. त्याबद्दल काही त्रास असतील तर अंगावर काढू नका. योग्य तो वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा. काहींच्या बाबतीत हातातोंडाशी आलेले धनलाभाचे योग लांबतील. सप्ताहाच्या शेवटी लेखक व नृत्यकलेतील लोकांसाठी चांगला कालावधी आहे. प्रवास शक्यतो या कालावधीत टाळलेला बरा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, पंचमस्थानात शुक्र व राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही अनावश्यक खर्च करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांबच रहावे. सप्ताहाच्या शेवटी आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामामुळे वरीष्ठांना खुश करु शकाल. धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र व राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग आणि शनिशी युती होईल. ३ तारखेला बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग व शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश: संपूर्ण सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या मध्यात मनासारखे धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या सहवासात रहायला मिळू शकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)