अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ जुलै ते २५ जुलै २०२०)                                                     (Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी बुध व राहू, चतुर्थस्थानात सूर्य, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येऊ शकतील. प्रेमी जिवांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
साहित्यिकांसाठी व कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण छान असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वादविवाद टाळा.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात बुध व राहू, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी संवाद साधाल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणारे तसेच प्रिंटिंग/ प्रकाशन क्षेत्राशी संबंधितांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस वक्ते, विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल काळ आहे. काहींना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध व राहू, धनस्थानात सूर्य, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
पूर्ण सप्ताह चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. विवाहेच्छूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.  कलाकारांना व लेखकांनाही काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. प्रेमिकांना हा सप्ताह विशेष चांगला आहे. नविन विषयाचा अभ्यास सुरु करण्यासाठीही अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभाचे अचानक आलेले योग सुखावून टाकतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी सप्ताहाची सुरूवात जास्त अनुकूल आहे.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ दशमस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात बुध व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला अचानक एखादा खर्च करावा लागू शकतो. नकारत्मक विचार मनात येतील. मात्र धार्मिक कार्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्य  छान आहे. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटनाही घडतील. धनलाभ होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत ना याची काळजी घ्या. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना प्रतिकूल कालावधी आहे. या काळात प्रवास शक्यतो टाळलेले बरे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात बुध व राहू आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. घराच्या देखभालीसाठी लक्ष द्यावं लागेल. सप्ताह मध्यानंतर आपले काही छंद असतील तर त्यासाठी किंवा नविन विषयांचा अभ्यास करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. ज्योतिष किंवा त्यासारख्या गूढ विषयांमधे रुची निर्माण होऊ शकेल. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ,
अष्टमस्थानात हर्शल, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात बुध व राहू आणि लाभस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल ग्रहमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यालयिन कामासाठी प्रवास करावा लागु शकेल. सप्ताह मध्यात आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धनलाभ होतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताह अखेरीस एखाद्या महत्वाची जबाबदारी आपल्यावर वरीष्ठ सोपविण्याची शक्यता आहे. व्यापार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल,
अष्टमस्थानात शुक्र आणि भाग्यस्थानात बुध व राहू आणि दशमस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. धनलाभाचे योग आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करु नका. अन्यथा कायदेशीर कटकटी उद्भवू शकतात.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल,
सप्तमस्थानात शुक्र आणि अष्टमस्थानात बुध व राहू आणि भाग्यस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. मात्र हा कालावधी इंशुरंन्सचं काम करणारे तसेच ज्योतिषी यांना अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने खुश असाल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत. मात्र एखाद्या मित्राला अचानक काही मदत करावी लागेल. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल,
षष्ठस्थानात शुक्र आणि सप्तमस्थानात बुध व राहू आणि अष्टमस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान खरेदीचा मूड असेल. सोमवार व मंगळवार काहींना त्रासदायक व अडचणींचे असू शकतात. मात्र गूढ विषयांचा अभ्यास किंवा पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची असेल त्यांना हा काळ अनुकूलच ठरणार आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. मात्र आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात बुध व राहू सप्तमस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्‍यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेरीस गुरुजन किंवा वडीलधारी व्यकींशी वाद संभवतो. धार्मिक कार्यासाठी मात्र काळ चांगला आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात बुध व राहू, षष्ठस्थानात सूर्य, लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा ठरु शकेल काळजी घावी. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात बुध व राहू, पंचमस्थानात सूर्य, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाशी युती होईल. २० तारखेला सूर्याचा शनिशी तर चंद्राचा गुरु व शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. तब्येतीची काळजी मात्र घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)