अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ जुलै ते १८ जुलै २०२०)
(Astroshodh – astrologerinpune, vastuconsultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध (वक्री) व राहू, भाग्यस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, दशमस्थानात शनि (वक्री), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस अचानक काही खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. सप्ताहाच्या मध्यात वादग्रस्त घटना शक्य आहेत. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा दीर्घकाळ नुकसानीचे योग शक्य. सप्ताह मध्यात काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग येतील. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. कलाकारांना विशेषत: गायकांना हा कालावधी खुप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, अष्टमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, भाग्यस्थानात शनि (वक्री), दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. जोडीदाराबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी कळतील. भागीदारीबद्दलचे काही प्रस्ताव आले आणि जर ते आपल्याला अनुकूल असतील तर ते स्विकारायला हरकत नाहीत. मित्रांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या मध्यात पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतुन लाभ होऊ शकतील. वैद्यकीय क्षेत्राला सेवा पुरविण्याचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी काही धनलाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध (वक्री) व राहू, सप्तमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, अष्टमस्थानात शनि (वक्री), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराशी व वरीष्ठांशी वाद टाळावे. नोकरीसाठी किंवा नोकरीबदलासाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीची ऒळख वापरता येते का ते पहा. काम होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, सप्तमस्थानात शनि(वक्री), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ दशमस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. नंतर मात्र सप्ताह चांगला जाणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात छान काम होईल. तुमच्यावर वरीष्ठ खुष असतील. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. कलाकारांसाठी व प्रेमी जीवांसाठी हा कालावधी खुप चांगला आहे. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे. तब्येतीची मात्र काळाजी घेणे आवश्यक.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, षष्ठस्थानात शनि (वक्री), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात त्रासाची व कंटाळवाणी होईल. वाहने जपून चालवा. शक्यतो प्रवास टाळलेला बरा. अध्यात्म मार्गातील लोकांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह मध्यात छान काम होईल. तुमच्यावर वरीष्ठ खुष असतील. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. छान धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. लाभदायक काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, पंचमस्थानात शनि (वक्री), षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ,
अष्टमस्थानात हर्शल, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सोमवार व मंगळवार वाहने जपून चालवा. बेकायदा गोष्टींशी तुमचा संबंध येणार नाही याची दक्षता घ्या. जोखिमेची कामे टाळा. सप्ताह मध्यात काही चांगल्या घटना चकित करतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर चांगला कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम हॊईल. लाभदायक काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- तृतियस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, चतुर्थस्थानात शनि (वक्री), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल,
अष्टमस्थानात शुक्र आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगला काळ आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, तृतियस्थानी शनि (वक्री), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल,
सप्तमस्थानात शुक्र आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छान लाभ होतील. मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. विशेषत: अॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास जाणवतील. खाण्या- पिण्याबाबत अतिरेक टाळावा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत व्यतित होईल. जोडीदाराच्या बाबतीत चांगली बातमी कळू शकेल. सप्ताहाचा शेवट मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. काळजी घ्यावी.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), केतू व प्लूटो, धनस्थानात शनि (वक्री), तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल,
षष्ठस्थानात शुक्र आणि सप्तमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. घरकामासाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. मात्र अती आत्मविश्वास नको. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ काढा. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतुन फ़ायदा संभवतो. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी शनि (वक्री), धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. रिअल इस्टेट्ची कामे करणार्यांना एखादं चांगलं फ़ायदा मिळवून देणारं काम मिळू शकेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. सप्ताह मध्यानंतर एखाद्या स्पर्धा/ परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. नोकरी बदलासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करतांना सावधानता बाळगावी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, लाभस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो आणि व्ययस्थानात शनि (वक्री) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं व फ़ायदा मिळवून काम आपल्या हातून घडेल. वॆळ छान जाईल. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. लेखक/ ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक घटनांचा असेल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, दशमस्थानात गुरु (वक्री), केतू व प्लूटो, लाभस्थानात शनि (वक्री) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शुक्र लाभयोग होईल. १४ तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग होईल व चंद्र बुध लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १६ तारखेला सुर्य कर्क राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व मंगळाशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. मात्र कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मौज मजेचे प्रसंग घडतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)