अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ फ़ेब्रुवारी ते २९ फ़ेब्रुवारी २०२०) 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, दशमात शनि, लाभात बुध, रवि व नेपचून आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. जुन्या मित्रांचं छान गेट-टुगेदर आयोजित करायला हरकत नाही.
वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. मात्र तुमची धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. प्रवासयोगही येऊ शकतात. मात्र वाहने सावकाश चालवा. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवट संमिश्र घटनांचा असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मात्र डोके व डोळ्याच्या काही तक्रारी जाणवतील. ज्यांना मायग्रेन सारखे आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, भाग्यात शनि, दशमात रवि, बुध, नेपचून, लाभात शुक्र आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. प्रवासयोग येतील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. मात्र एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर अचानक खर्चाची ठरु शकेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र हा काळ चांगला आहे. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांनाही चांगले ग्रहमान आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, अष्टमात शनि भाग्यात रवि, बुध, नेपचून, दशमात शुक्र आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या जोडीदाराला भाग्यवर्धक काळ आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरात वडीलधारी असतील तर त्यांची काळजी घ्यावी. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात आपली कामे छान पार पडल्यामुळे खूश असाल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर व नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
 
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, सप्तमात शनि, अष्टमात रवि, बुध, नेपचून, भाग्यात शुक्र, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात विचित्र घटनांनी होऊ शकेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावा. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी जोडीदाराबरोबर वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात नोकरीबदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. वरीष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. हितशत्रूंवर नजर ठेवा. अ‍ॅसिडीटी तसेच मधूमेह असणार्‍यांनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, षष्ठात शनि, सप्तमात रवि, बुध, नेपचून, अष्टमात शुक्र, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात विचित्र घटनांनी होऊ शकेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावा. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी जोडीदाराबरोबर वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना संभवतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. विद्यार्थ्यांना मात्र हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणिव होईल.
सप्ताहाच्या शेवटी काही लाभदायक घटना शक्य आहेत.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, पंचमात शनि, षष्ठात रवि, बुध, नेपचून, सप्तमात शुक्र, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. देऊन खुश कराल. भागीदारीत व्यवसाय नव्याने सुरु करायचा असेल तर अनुकूल ग्रहमान आहे. लाभदायक घटना घडण्याची शक्यता आहे. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर निय़ंत्रण ठेवणे उचित ठरेल. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वकील/ फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी ग्रहमान प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्‍यांनी जोखिम टाळावी. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मात्र अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, चतुर्थात शनि, पंचमात रवि, बुध, नेपचून, षष्ठात शुक्र, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. काही लाभ/ बक्षिस अचानक मिळू शकेल. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्‍यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टींचा काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, तृतिय स्थानात शनि चतुर्थात रवि, बुध, नेपचून, पंचमात शुक्र, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला जाईल. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट तब्येतीसाठी चांगला नाही. मात्र वकील, जीम ट्रेनर व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीबदलासाठीही काळ चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, धनस्थानी शनि, तृतियस्थानात रवि, बुध, नेपचून, चतुर्थात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे किंवा सहलीचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न असेल. घरात एखादा छानसा कार्यक्रम/ समारंभ साजरा कराल.  प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची कामे करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ, एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने सुखावल्यासारखे होऊ शकेल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, धनस्थानी रवि, बुध, नेपचून, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. मात्र खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा असं ग्रहांचं सांगणं आहे. आपल्या चीजवस्तू सांभाळा. डोळ्यांवर अती ताण येणार नाही असे बघा. सप्ताह मध्यात परदेशगमनासाठी चांगले ग्रह्मान आहे. छान खरेदीचे योग आहेत. मात्र या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह अखेरीस घरात वाद टाळा. प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. बेकायदेशीर व्यवहारामध्ये पडू नका.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, नेपचून, धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो आणि व्ययस्थानी शनि अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. खरेदीसाठी चांगला काळ आहे काही अनावश्यक खर्चही या काळात करावा लागू शकेल. एखाद्या गोष्टीची काळजी/ चिंता वाटत राहू शकेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ आपल्यावर खुष असतील. धनलाभाचे काही योग येऊ शकतील. प्रमोशन, पगारवाढ किंवा काही सवलतींसाठी वरीष्ठांकडे शब्द टाकायचा असेल तर त्यासाठी हा योग्य काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, लाभस्थानी शनि आणि व्ययस्थानी रवि, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला रविची व चंद्राची युती होईल, चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला रविचा मंगळाशी व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला रवि-बुध युती होईल व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २७   तारखेला चंद्र-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी त्रिकोण, बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छानशी खरेदी कराल. एखादा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. मात्र आता केलेला खर्च किंवा देऊ केलेला वेळ भविष्यात नक्की फ़ायदा देऊ शकेल. आयात-निर्यात करणार्‍यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यामधे आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ आपल्यावर खुश असतील. धार्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. आवक चांगली राहील. मन प्रसन्न असेल. दातांसंबंधी किंवा डोळ्यांसंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्या.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #astrologer #astrologymemes #astro #astrologyposts #numerology #vastu #follow  #राशिभविष्य #ज्योतिषशास्त्र #अ‍ॅस्ट्रोशोध #भविष्य #ज्योतिषी #astrologerinpune

Posted by | View Post | View Group