अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ फ़ेब्रुवारी ते १५ फ़ेब्रुवारी २०२०)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, दशमात रवि, शनि आणि लाभात बुध व नेपचून आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात सुखद असेल. रविवारी एखाद्या छानशा पार्टी किंवा समारंभामध्ये सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. त्यानंतरचे दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठांची मर्जी संपादन करु शकाल. विद्यार्थ्यांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. वकीलांनाही हा कालावधी चांगला आहे. मात्र आपल्या आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, भाग्यात रवि व शनि, दशमात बुध, नेपचून, लाभात शुक्र आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही काहींना संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल काळ आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अतिशय चांगला काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह अखेरीस वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांना कालावधी चांगला आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, अष्टमात रवि व शनि भाग्यात बुध, नेपचून, दशमात शुक्र, आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. रविवारी आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. नंतरचे दोन दिवस आप्तेष्टांशी मतभेद टाळा. शेजार्यांचे विचित्र अनुभव शक्य आहेत. प्रवासात अडचणी किंवा त्रासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवा. प्रकाशक/ लेखक यांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना, कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, सप्तमात रवि व शनि अष्टमात बुध, नेपचून, भाग्यात शुक्र, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काही चिंता किंवा हुरहुर मनाला सतावत राहील. घरात आरोग्याच्या समस्या जाणवतील. सोमवार, मंगळवार आहारावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात वाहने जपून चालवा. प्रवासात त्रासाचे योग संभवतात. लेखक/ ब्लॉगर्स यांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद टाळा. सप्ताह अखेरीस एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, षष्ठात रवि व शनि सप्तमात बुध, नेपचून, अष्टमात शुक्र, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवशी अचानक काही खर्च करावे लागतील. मनाला काही गोष्टींची काळजी वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस तब्येतीच्या काही समस्या जाणवतील. कोणाशी शत्रूत्व निर्माण होईल असे वर्तन या काळात टाळावे. सप्ताह मध्यात कुटुंबियांबरोबर वेळ मजेत जाईल. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. धनलाभही शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवास अनिवार्य असेल तर सर्व प्रकारची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवा. जोखिम असलेल्या कोणत्याही कामात सामिल होऊ नका.
उपासना: या काळात विठ्ठलाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, पंचमात रवि व शनि षष्ठात बुध, नेपचून, सप्तमात शुक्र, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. त्यानंतरचे दोन दिवस बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. वाहने हळू चालवा. सप्ताह मध्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्दी/ सायनस अशा स्वरुपाचा त्रास संभवतो. आपल्या वागण्याने किंवा बोलण्याने
कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. जोडीदाराला एखादं मस्त गिफ़्ट देऊन खुश कराल. भागीदारीत व्यवसाय नव्याने सुरु करायचा असेल तर अनुकूल ग्रहमान आहे. लाभदायक घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, चतुर्थात रवि व शनि पंचमात बुध, नेपचून, षष्ठात शुक्र, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी/ व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थीत मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात संततीसाठी काही खर्च करावा लागेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना ग्रहमान खूप चांगले आहे. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल.
सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जणवतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, तृतिय स्थानात रवि व शनि चतुर्थात बुध, नेपचून, पंचमात शुक्र, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह मध्यात अचानक धनलाभ संभवतो. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. रीअल ईस्टेट क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग. काहींना प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थी व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांना काही भावनिक क्षण अनुभवता येतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, धनस्थानी रवि व शनि तृतियस्थानात बुध, नेपचून, चतुर्थात शुक्र, पंचमस्थानात हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
रविवारचा दिवस विचित्र घटनांचा असू शकेल. गुढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस उपासना करण्यास चांगला आहे. आवडत्या व्यक्तींच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. घरात प्रसन्न वाताररण असेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. कार्यलयीन कामांसाठी प्रवास शक्य. भावंडांशी संवाद साधाल. लेखकांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. मन आनंदी असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि व शनि धनस्थानी बुध, नेपचून, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस जोखिम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. मनात कोणती तरी चिंता सतावत राहील. वाहने हळू चालवावी. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आपल्या जिवलग माणसांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: या काळात विठ्ठलाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, नेपचून, धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो आणि व्ययस्थानी रवि व शनि अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कुठल्याही वादात पडू नका. काही आजूबाजूचे किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोखिमीची कामे टाळावीत. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू व प्लुटो, लाभस्थानी रवि व शनि आणि व्ययस्थानी बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला रविचा चंद्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला रवि कुंभ राशित प्रवेश करेल १३ तारखेलाच चंद्राचा मंगळाशी लाभयोग तर गुरु व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य आहेत. सप्ताह मध्य तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी भागीदाराला गृहीत धरु नये. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. अचानक धनलाभाचे योग संभवतात मात्र जोखिम असलेल्या कामांपासून लांब रहावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #astrologer #astrologymemes #astro #astrologyposts #numerology #vastu #follow #राशिभविष्य #ज्योतिषशास्त्र #अॅस्ट्रोशोध #भविष्य