अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२०) 

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला मेषेत हर्षल, मिथुन राशीत राहू, वृश्चिक राशीत मंगळ, धनु राशीत गुरु, शनि, केतू व प्लुटो, मकर राशीत  रवि व बुध आणि कुंभ राशीत शुक्र व नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा रवि, शनी व प्लूटोशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राची  मंगळाशी युती होईल व चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल व शुक्र व गुरुचा लाभयोग होईल. २४ तारखेला शनी मकर राशीत प्रवेश करेल तेथे तो २९ एप्रिल २०२२ पर्यंत असेल.
फ़लादेश-
मेष रास  
संपूर्ण सप्ताह सतर्क रहाण्याची गरज आहे. रविवार संध्याकाळपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवासाला जाणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. गाडीची कागदपत्रे जवळ बाळगा. मात्र इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य चांगला असेल. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास  
रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. काही विचित्र घटना त्रास देऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे बेत ठरतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास  
रविवारचा दिवस लाभदायक आहे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. कुठलीही गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. शक्य तो नव्याने काहीही गुंतवणूक या सप्ताहात तरी करु नका. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. वाहने जपून चालवावीत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
रविवारचा दिवस संमिश्र घटनांचा ठरु शकेल. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीच्या काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा त्वचाविकार असणार्‍यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर आपल्या जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण घालवू शकाल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताह चांगला असणार आहे. रविवारी घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. नंतरचे दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडणार आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. नोकरी करणार्‍यांनी आपल्या वरीष्ठांशी वाद टाळावेत. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. खेळाडूंनी किंवा व्यायाम करणार्‍या लोकांनी आपल्या शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताण या काळात देऊ नये अन्यथा दूरगामी परीणाम होऊ शकतील. काळजी घ्यावी.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास करायला चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. एखाद्या सभा-समारंभात सामिल होऊ शकाल. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लागू शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. मुलांच्या बाबतीतली चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. विशेषत: अती तिखट किंवा मसालेदार पदार्थ
खाणे टाळावे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी वाद टाळावेत. शेजार्‍यांचे विचित्र अनुभव येऊ शकतात. प्रवास शक्य तो टाळलेलेच बरे. प्रवास करावाच लागणार असेल तर सर्व प्रकारची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. घरातील लोकांशी विशेषत: आईशी वाद टाळावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
रविवारचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. नंतरचे दोन दिवस रागावर नियंत्रण ठेवायला हवे याची जाणीव होईल. डोकेदुखी, अ‍ॅसिडिटीसारखे आजार त्रास देतील. सप्ताह मध्यात व सप्ताह अखेरपर्यंत काही धनलाभ होता होता राहू शकतील. आपल्या बोलण्यावर या काळात संयम ठेवायला हवा. या काळात नाराज झालेली आपली माणसं कायमची दुरावू शकतात. डॊळ्यांची विशेष काळजी या काळात घ्यायला हवी. काही त्रास असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. छान खरेदीचे योग संभवतात. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताह मध्यात संमिश्र अनुभव येतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र  शेजारी किंवा परीचितांचे काही विचित्र अनुभव येऊ शकतात. सप्ताह अखेरीस कुटुंबीय किंवा मित्रमंडळींबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण चांगले असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहाची सुरुवात छान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना उपासनेत खंड पडणे, मन भक्तीमार्गाकडे न लागणे असे योग आहेत. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. डोके, डोळे व पायांना जपावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. सप्ताह मध्यात काहींना अचानक पैशांच्या कामाला विलंब होऊ शकतो. काही मनाविरुध्द घटना घडू शकतील. कामात कसूर होऊ नये म्हणून जागरूक रहा. मोठे व्यवहार या काळात न केलेले बरे. काहींना मित्राच्या किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताह अखेरीस पाय/ घोटा यासंबंधी त्रास संभवतो. महत्वाची खरेदी या काळात करु नका.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होतील. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास लाभदायक होतील. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात नविन विषयाचा अभ्यास करावासा वटेल. वडीलांकडून किंवा वडीलधारी व्यक्तींकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना अनुकूल काळ आहे. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जुने मित्र भेटतील. धनलाभ होतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य#ज्योतिषशास्त्र#अ‍ॅस्ट्रोशोध#भविष्य#ज्योतिषी#Astrologer#Pune#Transit#Saturn

Posted by | View Post | View Group