अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२०)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात शुक्र व नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात सुखद असेल. रविवारी एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी होण्याचे योग येऊ शकतात. त्यानंतरचे दोन दिवस खर्चाचे असू शकतील. विद्यार्थ्यांनी या काळात अती आत्मविश्वास बाळगायला नको. यशाला परीश्रमाशिवाय पर्याय नाही याची जाणिव होईल. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. नोकरीत आपल्या कामामध्ये चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा. त्यांचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, दशमात शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामांना प्राधान्य द्या. तसेच घरातील वातावरण बिघडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रतिकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस वैद्यकीय व्यवसाय करणारे व फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांना कालावधी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात शुक्र, नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांशी किंवा जोडीदाराशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. शक्यतो या कालावधीत प्रवास टाळावेत. प्रवासयोग त्रासाचे ठरु शकतील. लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला नाही. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामासाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात शुक्र, नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात छान यश मिळणार आहे. वरीष्ठ/ वडीलधारी व्यक्तींचं सहकार्य चांगलं मिळेल. सप्ताह मध्यात व त्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. डोळे/ दात/ पाठीसंबंधी काही त्रास या काळात जाणवतील. जर समस्या जास्त प्रमाणात असतील तर अंगावर काढू नका. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. सप्ताह अखेरीस इंशुरन्स/ मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात शुक्र, नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही खर्च करावे लागतील. मनाला काही गोष्टींची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. सप्ताह मध्य छान आहे. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. प्रवासयोगही संभवतात. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल. सप्ताह अखेरीस अनुकूल काळ आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात शुक्र, नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. सोमवार दुपारनंतर बुधवारपर्यंत बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. वाहने हळू चालवा. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल. सप्ताह मध्यानंतर घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ संभवतात. नविन गुंतवणूक करणार असाल तर तज्ञ व्यक्तींचा सल्ला जरुर घ्या. सर्दी/ कफ़ाच्या समस्या जाणवतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, पंचमात शुक्र, नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात काही बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या काही तक्रारी जणवतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ धनस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. वाद होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच वरीष्ठांचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करण्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सोमवार दुपारपर्यंतचा काळ विचित्र घटनांचा असू शकेल. गुढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम होईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात. त्यामुळे खुश असाल. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, लाभस्थानी मंगळ, आणि व्ययस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सोमवार दुपारपर्यंतचा काळ घरच्यांबरोबर छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. वाहने हळू चालवावी. रागावर नियंत्रण ठेवावे. जोखिम असलेली कामे टाळावीत. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आपल्या जिवलग माणसांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, दशमस्थानी मंगळ आणि लाभस्थानी रवि, बुध, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनीशी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कुठल्याही वादात पडू नका. काही आजूबाजूचे किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्र व कायदाविषयी कामे करणार्यांना मात्र हा कालावधी चांगला असेल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर जोखिम असलेली कामे टाळावीत. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला बुधाची शनी व प्लुटोशी युती होईल. १३ तारखेला बुध मकर राशीत प्रवेश करेल, रविची शनीशी व प्लुटोशी युती होईल आणि चंद्र व शुक्राचा प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला रवि मकर राशीत प्रवेश करेल व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभही शक्य. सप्ताह मध्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. नोकरीबदल करण्यासाठी अनुकूल काळ आहे. मात्र या काळात तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)