अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ जानेवारी ते ११ जानेवारी २०२०)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, दशमात शुक्र, आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीचे दोन दिवस सोडले तर नंतर सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वाहने जपून चालवा. बोलण्यावरसुद्धा संयम या कालावधीत ठेवण्याची गरज आहे. तोंड येणे, डोकेदुखी, मायग्रेन, अॅसिडिटी अशा आजारांचा त्रास संभवू शकेल. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल. वरीष्ठ आपल्यावर खुश असतील. सप्ताह मध्यानंतर प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी असं ग्रहमान सांगत आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, भाग्यात शुक्र, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मन प्रसन्न असेल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सायनस/ सर्दी/ त्वचा या काळात जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संवाद साधाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, अष्टमात शुक्र, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. केलेल्या कामाचे चीज होइल. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. मात्र आरोग्याच्या समस्या या दरम्यान काहींना जाणवतील. एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. नृत्यकलेशी संबंध असणार्या लोकांना चांगला काळ आहे. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, सप्तमात शुक्र, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. अचानक एखादा सन्मान/ भेटवस्तू मिळणे/ कोणाकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळणे असे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल.
सप्ताहाच्या शेवटी अचानक खर्च उद्भवतील. नव्या गुंतवणूकीला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य नाही. तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात शुक्र, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात थोडे जास्त काम करावे लागेल मात्र अती दगदग टाळा. गुप्तशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्या. सर्दी/ कफ़ाचा त्रास जाणवेल. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभात किंवा पार्टीत सहभागी व्हाल. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, पंचमात शुक्र, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थी, कलाकार व उपासक यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात रवि, बुध, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात शुक्र, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्यांना चांगला काळ आहे. काही लाभ होतील. एखादी छानशी पार्टी घरात आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्य इंशूरन्सचे काम करणारे, इतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल कालावधी आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ धनस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, तृतिय स्थानात शुक्र, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी चांगला आहे. लेखक, ब्लॉगर्स, कवी, कलाकार यांना ग्रहमान अनुकूल आहे. भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानक उद्भवतील. मुलांसाठी काही खरेदी कराल. विद्यार्थ्यांना कालावधी प्रतिकूल आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, लाभस्थानी मंगळ, आणि व्ययस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. काही धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. नोकरीमध्ये आपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, दशमस्थानी मंगळ, लाभस्थानी रवि, बुध, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदी कराल. घरासाठी किंवा घरातील वस्तूंच्या दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. मात्र मित्रांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करा आणि आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, लाभस्थानी शुक्र, आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा नेपचूनशी लाभयोग होईल व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा शुक्राशी केंद्रयोग होईल. ७ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व मंगळ हर्षल षडाष्टक होईल. ८ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल व शनी प्लूटो यांची युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताह मध्यानंतर छान कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. परदेशगमनासाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य#ज्योतिषशास्त्र#अॅस्ट्रोशोध#भविष्य#ज्योतिषी