अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२०)

या सप्ताहात इंग्रजी नविन वर्षाची सुरुवात होत आहे. आपणा सर्वांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
सर्वांना हे नविन वर्ष आनंदाचं भरभराटीचं, प्रगतीचं जावो. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा या वर्षात पूर्ण होवोत ही परमेश्वराजवळ प्रार्थना !!!

मेष रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, दशमात शुक्र, आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. जोडीदाराकडून छानशी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग आहेत. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. ज्यांचा परदेशी कंपनी बरोबर भागीदारीत व्यवसाय आहे त्यांना हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, भाग्यात शुक्र, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक गोष्टींमध्ये मन लागणे कठीण आहे. तब्येतीच्याही काही तक्रारी जाणवतील. प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घेणे उचित ठरेल. सप्ताहाच्या मध्यात गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र यासारखे विषय शिकायला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नित्याच्या कामात मात्र दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, अष्टमात शुक्र, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाची सुरुवात शारिरीक त्रासाची व कंटाळवाणी होईल. अपघातभय आहे. वाहने सावकाश चालवावीत. संतती व जोडीदार यांच्याशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराला आपल्या मदतीची गरज असेल. जोडीदाराच्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्याला आधी प्राधान्य द्या. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू शकतात. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. भागीदारीत व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी अजुन काही काळ थांबलेले बरे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, गुरु, शनि, केतू व प्लुटो, सप्तमात शुक्र, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्यात पती/ पत्नीबरोबर वाद टाळावे. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. वातविकार तसेच त्वचेसंबंधी काही समस्या जाणवतील. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. मात्र प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. घरात छान उत्सवाचं वातावरण असेल. संततीसाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात शुक्र, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याचीसुध्दा काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यानंतर काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. गूढ विषयांचा अभ्यास करण्यास चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, पंचमात शुक्र, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभ, मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. ज्यांना श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास त्यांनी मात्र या काळात विशेष काळजी घ्यावी. वकील, सिव्हिल कॉंट्रॅक्टर यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात रवि, बुध, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात शुक्र, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घरासंबंधी काही दुरुस्ती/ आवराआवरी बरेच दिवस रेंगाळली असेल तर त्यासाठी वेळ काढाल. प्रॉपर्टीच्या खरेदी/ विक्रीच्या कामांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना चांगला आहे. ब्लॉगर्स, लेखक व खेळाडूंना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. न्युट्रिशियन्स, कौंसिलिंगचे काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावे.
उपासना: हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ धनस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, तृतिय स्थानात शुक्र, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाच्या सुरूवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या किंवा भावंडांच्या भेटी होतील. प्रवासाचे किंवा सहलीचे छान योग आहेत. प्रवास लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. घरात पार्टीचे वातावरण असेल. दमा किंवा श्वसनासंबंधी त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे मात्र अती आत्मविश्वास किंवा गाफ़िल रहाणे नुकसानीचे ठरु शकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील.
सप्ताह मध्यात प्रिय व्यक्ती भेटतील. काही छान लाभ होतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासाचे योग येतील भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. छान लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना चांगला कालावधी. कलाकारांनाही अनुकूल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, लाभस्थानी मंगळ, आणि व्ययस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाच्या सुरूवातीला एखादा खर्च करावा लागेल. कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. डोळ्यांची विशेष काळजी या काळात घ्यायची आहे. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग येतील. मात्र प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. भावंडांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कलागुणांना छान वाव मिळणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. सप्ताहाच्या शेवटी खरेदीस अनुकुल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, दशमस्थानी मंगळ, लाभस्थानी रवि, बुध, गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकूल असेल. एखादा अचानक किंवा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. थोडा वेळ स्वत:साठी जरुर काढा. काही छंद असतील तर त्यालाही वेळ द्या. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. चांगले धनलाभ होतील. तर काहींना भाग्यकारक घटना चकीत करतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सप्ताहाच्या शेवटी लेखक व प्रकाशक यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी मंगळ,  दशमस्थानी रवि, बुध, गुरु, शनि, केतू, प्लुटो, लाभस्थानी शुक्र, आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र व शुक्राची युती होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल. १ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शनीशी व प्लुटोशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग होईल आणि बुध व गुरुची युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राचा शनी व प्लुटोशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राची हर्षलशी युती होईल.
फ़लादेश-
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्याला बरीच कामे करावी लागणार आहेत. त्यात चांगल्यापैकी यशस्वीसुध्दा व्हाल. वरीष्ठांकडूनही शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र भेटतील. परदेशासंबंधी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही अतींद्रीय अनुभव येण्याची शक्यता आहे. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. सप्ताह अखेर एखादा धनलाभ शक्य आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य#ज्योतिषशास्त्र#अ‍ॅस्ट्रोशोध#भविष्य#ज्योतिषी