अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०१९)      

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमस्थानात रवि, बुध, भाग्यात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. जॊडीदाराची काळजी घ्या. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामधे चांगले काम झाल्याने खुश असाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर लेखक/ कवि यांना प्रतिकूल कालावधी आहे. सोशल मिडियावर वादग्रस्त लेखन या काळात टाळलेले बरे. भावंडांशी वाद होणार नाही याचीही काळजी या काळात घ्यावी लागेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, अष्टमात गुरु, शुक्र, शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला बेकायदा व्यवहार करु नका. अचानक उदभवलेल्या खर्चाने त्रस्त होऊ शकाल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. डोळे, दात, मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी या काळात जपावे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असेल. काही चिंता मनाला सतत सतावत रहातील. गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा असेल. सप्ताहाच्या शेवटी मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ काढा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, पंचमात मंगळ, बुध, षष्ठात रवि, सप्तमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला मित्र मैत्रिणींचा सहवास लाभण्याची शक्यता आहे. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्यविषयक काही समस्या जाणवतील. विशेषत: सर्दी/ सायनसचा त्रास असणार्‍यांनी या काळात जपावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, षष्ठात गुरु, शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. घराच्या डागडुजीसाठी किंवा घराच्या सुशोभीकरणासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. मात्र अती दगदग टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताह अखेर मस्त. खरेदीसाठी व मौजमजा करण्यासाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी हा काळा विशेष चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, पंचमात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
छान आठवडा आहे. भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक गोष्टींसाठी प्रवासयोग शक्य आहे. लेखक, खेळाडू, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. वरीष्ठ कौतुक करतील. एखादं बक्षिस/ पगारवाढ/ बढती सुखावुन टाकेल. सप्ताहाच्या अखेरीस घरात एखादा कार्यक्रम किंवा मित्रमंडळींबरोबर छानसं गेट-टुगेदर आयोजित करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात रवि, बुध, चतुर्थात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्य उत्तम प्रवासाचे असतील. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. काही लाभही शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करायला अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी रवि, बुध, तृतिय स्थानात गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. एखाद्या समारंभाचं किंवा कार्यक्रमाचं आयोजन घरात कराल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. इंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. काहींना सुचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. काहींना धनलाभाचे योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, धनस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे काळजी घ्यावी. परदेशात नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी मात्र हा कालावधी अनुकूल ठरु शकेल. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ आणि व्ययस्थानी रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कलाकार व खेळाडूंनाही हा कालावधी चांगला आहे. एखादा धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्य फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांना काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. कफ़ाचा काही त्रास असेल तर हा काळ थोडासा त्रासदायक आहे. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदारासाठी काही खरेदी कराल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, दशमात मंगळ, लाभस्थानी रवि, बुध, आणि व्ययस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. नोकरदार व्यक्तींवर वरीष्ठांची चांगली मर्जी राहील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी रवि, बुध आणि लाभस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. नृत्यकलेशी संबधितांना यशदायक ग्रहमान आहे. परदेशप्रवासासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना व वक्त्यांना चांगला काळ आहे. काहींना अचानक लाभ संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, बुध दशमस्थानी गुरु, शुक्र, शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राची प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असेल. एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणे त्रासदायक ठरु शकेल. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. आपल्या छंदासाठी थोडा वेळ जरुर काढा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध