धनु राशितील गुरु

धनु राशितील गुरु

गुरु साधारणपणे दर १३ महिन्यांनी राश्यांतर करीत असतो. ५ तारखेला पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी गुरु धनु राशित प्रवेश करेल. तेथे त्याचं भ्रमण ५ नोव्हेंबर २०१९ ते ३० मार्च २०२० व ३० जुन २०२० ते २१ नोव्हेंबर २०२० असे असणार आहे. गुरु खरं म्हणजे शुभ ग्रह समजला जातो. तरी सुध्दा काही स्थानांना त्याची अशुभ फ़ळं मिळ्तातच. बघुया कोणत्या राशिंना गुरु कसा आहे ते.

मेष रास      (भाग्यकारक घटनांची नांदी)
वर्षभर गुरुची प्रतिकुलता तुम्ही अनुभवली मात्र आता हा गुरुबदल तुम्हाला दिलासा देणार आहे. भाग्यकारक घटना घडतील. लांबचे प्रवास घडतील. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या कळतील. संततीप्राप्तीसाठीही अनुकूल काळ आहे. विध्यार्थी, लेखक व कलाकारांना उत्तम ग्रहमान आहे. स्पर्धा-परीक्षांमध्ये कमी श्रमात घवघवीत यश मिळेल. नोकरीत बढती मिळू शकेल. व्यावसायिकांना मनासारखं काम व छान मोबदला मिळणार आहे. मन प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास     (संमिश्र घटनांचा काळ)
अष्टमातील गुरु तुमचा खर्च वाढविणार आहे. हा गुरु तुमची परीक्षा बघणार असला तरी काही बाबतीत मात्र तो अनुकूल ठरणार आहे. वर्षभर सतर्क रहाणे गरजेचे आहे. प्रॉपर्टीचे अडकलेले व्यवहार मार्गी लागू शकतील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. ज्योतिषी, विमा प्रतिनिधी, इतिहासकार, सर्जन, मानसोपचारतज्ञ यांना उत्तम काळ आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास     (लाभदायक काळ मात्र जोडीदाराला अनिष्ट)
आपल्या पराक्रमात वृध्दी होणार आहे. तुमच्या हातून छान लेखन होईल. छान लाभ होतील. भरपूर व लाभदायक प्रवास घडतील. मित्रांकडून मदत मिळेल. वरीष्ठ कामावर खुष असतील. भागीदारीत व्यवसायाचे नविन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीकडॆ मात्र लक्ष द्यावे लागेल. आपापसात काही वाद असतील तर ते वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास     (आरोग्य सांभाळावे)
गेल्या वर्षभर अनुकूल असलेला गुरु आता आपल्याला प्रतिकूल होणार आहे. आरोग्यासंबंधी काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. नियमित व्यायाम आता महत्वाचा आहे. मधूमेह असणार्‍यांनी पथ्यसुध्दा नीट पाळायला हवे आहे. नोकरीत वरीष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंकडॆ लक्ष ठेवा. परदेशगमन करायचे असेल तर त्यासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. गुरु सहावा असला तरी स्वगृही असल्याने परीस्थिती आटोक्यात राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह    (सुखप्राप्ती)
अतिशय छान ग्रहमान आहे. ईच्छापूर्तीचे योग येतील. मुलाबाळांकडून छान सुख मिळेल. धनलाभाचे योग वारंवार येतील. गुंतवणूक छान फ़ायदा देईल. प्रेमी जिवांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांकडून लाभ होतील. धार्मिक कार्ये घडतील. लांबचे प्रवास सुखाचे ठरतील. नविन विषयाची किंवा एखाद्या छंदा्ची जोपासना यादरम्यान करु शकाल. शिक्षणक्षेत्रातील लोक तसेच न्यायव्यवस्थेतील लोकांना हा गुरु विशेष अनुकूल आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या    (विरोधी ग्रहमान)
चतुर्थातील गुरु आता जवळजवळ वर्षभर तुम्हाला प्रतिकूल आहे. मानसन्मानाची हानी होईल. आईच्या तब्येतीची काळ्जी घ्यावी. खर्च वाढतील त्यावर वेळीच आवर घालणे गरजेचे ठरणार आहे. जोखिम असलेली कामे टाळावीत. वाहने जपून चालवावीत. प्रॉपर्टीचे व्यवहार या काळात टाळलेले बरे मात्र हा गुरु नविन व्यवसाय किंवा जोडधंद्याचे योग आणणार आहे. तसेच या काळात ज्यांची लग्नं व्हायला विलंब झाला आहे त्यांची लग्नं ठरण्याचे योग येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ   (कलह/ पीडाकारक काळ)
भावंडंशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासातही काळजी घ्यावी लागेल. वादग्रस्त लिखाणापासून लांब रहा. जोडीदारासाठी मात्र हा गुरु चांगला आहे. काही लाभदायक प्रसंगही घडतील. मात्र या संपूर्ण कालावधीत आरोग्याची व कुणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. मधूमेह तसेच हातासंबंधी काही दुखणी असतील तर विशेष काळजी घेतलेली बरी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास   (धनलाभाचा काळ)
गुरु धमाकेदार एंट्री करणार आहे. लाभदायक व अनुकूल काळ आहे. घरातील वातावरण छान असणार आहे. काहींना अपत्यप्राप्तीचे योग संभवतात. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही नविन संधी चालून येतील. वरीष्ट तुमच्यावर खुष असतील. पगारवाढ किंवा बढतीसाठी जरुर प्रयत्न करावेत. गूढ गोष्टींकडे मन आकृष्ट होईल. ज्योतिषशास्त्र, परामानसशास्त्र अशा गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास     (चांगला काळ)
धनु राशिच्या लोकांनी साडेसाती व व्ययातील गुरुमुळे बर्‍याच काळापासून त्रास सहन केला होता मात्र आता धनू राशित येणारा गुरु चांगल्या दिवसांची सुरुवात करुन देणार आहे. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. प्रवास लाभदायक ठरतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास    (संमिश्र काळ, प्रवासात काळजी घ्यावी)
व्ययातील गुरु खर्च वाढविणार आहे. काही मनाविरुध्द घटना संभवतात. मात्र नविन नोकरी किंवा नोकरीबदल यासाठी हा गुरु चांगला आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार जपून करावेत. कोर्ट केसेस यामध्ये अनुकूलता लाभेल. कर्जप्रकरणे मंजुर होतील. नृत्यकलेशी संबंधितांना चांगला कालावधी आहे. पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची आहे त्यांना उत्तम कालावधी आहे. मात्र या संपूर्ण काळात प्रवासात काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास     (लाभाचा व सन्मानाचा काळ)
लाभात येणारा गुरु तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे. अनेक लाभ या काळात होणार आहेत. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना छान काळ आहे. भावंडांकडूनही काही लाभ होतील. विद्यार्थ्यांना यशदायक काळ आहे. विवाह ठरविण्यास अनुकूल ग्रहमान आहे. भागीदारीत व्यवसाय जर सुरु करायचा असेल तर अनुकूल ग्रहमान आहे. एकंदरीतच लाभाचा व मानसन्मानाचा काळ असणार आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास    (संमिश्र काळ)
काही बाबतीत खुप चांगले तर काही बाबतीत खराब ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना नोकरी मिळेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकुलता आहे. कुटुंबात छान वातावरण असणार आहे. मात्र आपल्या कार्यक्षेत्रात विरोधी परीस्थितीचा सामना करावा लागेल. वरीष्ट नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group