अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०१९)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, अष्टमस्थानात बुध, गुरु, शुक्र भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
पूर्ण सप्ताह भाग्यकारक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ शाबासकीची एखादी थाप मिळू शकते. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह अखेरीस मनासारखी खरेदी कराल. जोडीदाराला एखादं छानसं प्रेझेंट देऊन खूश करु शकाल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात रवि, सप्तमात बुध, गुरु, शुक्र अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. ज्योतिष, अध्यात्म अशा गूढ गोष्टींकडे ऒढा राहील. प्रवासयोग येतील. परदेशगमनासाठी प्रयत्नात असाल तर त्यासाठी अनुकूल कालावधी आहे. मात्र प्रवासात अडथळे येऊ शकतील. सप्ताह मध्यात कामात कुचराई करु नका. यशाचं प्रमाण कमी झाल्याने नाराज होऊ नका. सप्ताह अखेरीस एखद्या मित्र किंवा नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, षष्ठात बुध, गुरु, शुक्र सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. इंशुरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. जोडीदाराशी वाद टाळावे. जोडीदाराला काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. विवाहोत्सुक लोकांसाठी विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. प्रवासयोग संभवतात. सप्ताह अखेरीस भागीदारीत व्यवसा करणार्यांसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, पंचमात बुध, गुरु, शुक्र षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. मात्र भागीदाराला कोणत्याही बाबतीत गृहीत धरु नका. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तुमच्या तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. इंशुरन्स एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व शिक्षणक्षेत्रातील लोकांना तसेच धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. प्रवासयोग येतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात मंगळ, मंगळ, तृतिय स्थानात रवि, चतुर्थात बुध, गुरु, शुक्र पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना व वकिलांना हा काळ चांगला आहे. कूठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. प्रेमी जीवांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. ज्योतिषाचा, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी रवि, तृतियस्थानात बुध, गुरु, शुक्र, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. भेळ/ पाणीपूरी असे चटकमटक पदार्थ या सप्ताहात टाळलेलेच बरे. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. काहींना धनलाभ शक्य. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी बुध, गुरु, शुक्र, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. आप्तेष्ट/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल आहे. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना मात्र हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, शुक्र धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी मंगळ, व्ययस्थानात रवि, अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस एखाद्या पार्टीत किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात मंगळ, लाभस्थानी रवि, आणि व्ययस्थानी बुध, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग संभवतात. छान मेजवानीचे योग येतील. काहींना प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमात रवि, लाभस्थानी बुध, गुरु, शुक्र, आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जरी काही अडथळे आले किंवा गोष्टी मनाविरुध्द झाल्या तरी नंतर सप्ताह चांगला आहे. डोळ्यांची या सप्ताहात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांनी भरलेला असेल. धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे. काहींना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे योग संभवतात. काही खर्च मनाविरुध्द करावे लागू शकतील. सप्ताह अखेर लेखक/ कलाकार/ कवी यांना चांगला आहे. नोकरी/ व्यवसायात छान काम होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग संभावतात.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी बुध, गुरु, शुक्र आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. आपल्या जिवलगांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्य भाग्यवर्धक असेल. केलेल्या कामात यशाचं मान जास्त असेल. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटी शक्य. सप्ताह अखेरीस घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा मित्रमंडळी/ आवडत्या लोकांबरोबर मस्त मेजवानीचा बेत ठेवायला हरकत नाही. घरात आनंदी वातावरण असेल. एखादा धनलाभ सुखवून टाकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमात रवि, भाग्यस्थानी बुध, गुरु, शुक्र, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी व शुक्राशी लाभयोग होईल, ५ तारखेला गुरु राशिबदल करुन धनु राशित प्रवेश करेल, ७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व चंद्राची नेपचूनशी युती होईल, ८ तारखेला रविचा शनिशी लाभयोग होईल आणि ९ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची शक्यता आहे. ऒळखीच्या व्यक्तीकडून एखादं अडलेलं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्यांना चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. काहींना गुरुभेट शक्य आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध