अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१९)
दिवाळीच्या मंगलमय आणि छान वातावरणात या सप्ताहाची सुरुवात होत आहे. सर्वांना हे दिवाळीचे दिवस व पाडव्यापासून सुरु होणारं संपूर्ण वर्ष खूप खूप छान जावो. ही परमेश्वराजवळ प्रार्थना!
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, शुक्र अष्टमस्थानात बुध, गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
रविवारचा दिवस आरोग्याच्या तक्रारींचा ठरु शकेल. वाद टाळावेत. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर छान जातील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. एखादा छानसा धनलाभ सुखावून टाकेल. घरात छान वातावरण असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र काळ आहे. आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात रवि, शुक्र व सप्तमात बुध, गुरु, अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
रविवारचा दिवस खुप छान आहे. काही लाभ होऊ शकतील. खेळाडू, कलाकार यांना चांगला दिवस आहे. प्रेमी युगुलांना काही सुखद क्षण अनुभवता येतील. लग्न ठरविण्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. नंतरचे दोन दिवस वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, फ़िटनेसच्या क्षेत्रात असणारे लोक व वकील यांना अनुकूल आहेत. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही नविन संधी दृष्टीक्षेपात येतील. तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष या काळात नको. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, शुक्र षष्ठात बुध, गुरु, सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. घरासंबंधी एखादी दुरुस्ती किंवा सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील.
सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, शुक्र पंचमात बुध, गुरु, षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या मध्यात काही सुखद/ आंनंददायक प्रसंग घडू शकतात. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची कामे करणार्यांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. खेळाडू, लेखक, ब्लॉगर्स यांना विशेष चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांकडून कौतुक ऎकायला मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात मंगळ, मंगळ, तृतिय स्थानात रवि, शुक्र चतुर्थात बुध, गुरु, पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
सप्ताहाची सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. छान पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. कवी, लेखक, वक्ते, कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. वरीष्ठांची आपल्यावर छान मर्जी असणार आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल
होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. एखादा
अचानक धनलाभही होऊ शकतो.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी रवि, शुक्र, तृतियस्थानात बुध, गुरु, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
सप्ताहाची सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. प्रवास लाभदायक ठरतील. आवडत्या माणसांच्या भेटीचे योग येतील. छान मेजवानीच्या प्रसंगात सहभागी व्हाल. मस्त सप्ताह मध्य कलाकारांना, वक्त्यांना चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या गोष्टींसाठी किंवा छंदांसाठी जरुर वेळ द्या. सप्ताहाच्या मध्यानंतर पुन्हा प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवासात पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह अखेर प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगली आहे. पटकन कामे उरकून आराम करण्याकडे कल असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शुक्र, धनस्थानी बुध, गुरु, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
रविवारी मनासारखी छान खरेदी होईल. एखादा अनपेक्षित खर्चही करावा लागू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतुन अचानक धनलाभ होऊ शकतील. नंतरचे दोन दिवस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत घलवण्याकडे कल असेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात मनावर व बोलण्यावर संयम ठेवावा. आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर शक्य असल्यास प्रवास टाळावेत. प्रवास आवश्यकच असतील तर प्रवासात आपल्या चीजवस्तू सांभळाव्या. सप्ताह अखेरीस अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी मंगळ, व्ययस्थानात रवि, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभाचे योग संभवतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. कामानिमित्त प्रवास शक्य. मनासारखी चांगली खरेदी कराल. परदेशगमनासाठी हा काळ चांगला आहे. अति दगदग टाळावी. सप्ताह मध्यात हातातलं काम लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. खाण्यापिण्यावर
नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात मंगळ, लाभस्थानी रवि, शुक्र आणि व्ययस्थानी बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस आपल्या कार्यक्षेत्रात जास्त काम करावं लागू शकेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. सोमवार ते बुधवार लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. वरीष्ठ कामावर खुष असतील. आपल्या काही मागण्या असतील तर त्या वरीष्ठांच्या कानावर घालण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. कुणाच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे मनाचा तोल जाऊ देऊ नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमात रवि, शुक्र, लाभस्थानी बुध, गुरु आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
पूर्ण सप्ताह चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. प्रवासाचे योगही संभवतात. वरीष्ठ/ वडीलधारी मंडळींचे आपल्याला पूर्ण सहकार्य या काळात लाभणार आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षमतेला व गुणांना वाव मिळेल. छान काम होईल. सप्ताह मध्यानंतर लाभदायक काळ आहे. जुने मित्र/ आप्तेष्ठ भेटतील. धार्मिक कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सायनस किंवा सर्दीचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट छान खरेदीचा ठरेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, शुक्र, दशमस्थानी बुध, गुरु आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा जरी झाला तरी नंतर त्यात सुधारणा होत जाईल. सोमवार, मंगळ्वार भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. काही छान लाभ अपेक्षित आहेत. प्रवासाचे योगही संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांची मर्जी खपा होणार नाही याची काळजी घ्यावी. विमा क्षेत्रातील लोक, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाचा शेवट चांगला व लाभदायक आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमात रवि, शुक्र, भाग्यस्थानी बुध, गुरु, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळ व शनि यांचा केंद्रयोग होईल. २८ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची शुक्राशी व बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राची गुरुशी युती व मंगळाशी लाभयोग होईल आणि बुध वक्री होईल.
रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक किंवा कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. त्यानंतरचे दोन दिवस ईंन्शूरन्ससंबंधी कामे करणार्यांना तसेच लेखक व कवी यांना अनुकूल आहेत. मात्र या कालावधीत जोखिम असलेली कामे करु नका. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम
करु नये. सप्ताह मध्यानंतर ठरविलेल्या भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध