अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०१९)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात रवि, बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येऊ शकतील. प्रेमी जिवांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. साहित्यिकांसाठी व कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. छान प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरातील वातावरण छान असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. २६ तारखेला तब्येतीची काळाजी घ्यावी. जोखिम असलेली कामे व वादविवाद टाळा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, शुक्र व सप्तमात गुरु, अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील चीजवस्तू सांभाळा. सप्ताहाच्या अखेरीस कलाकारांना व विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. कुठलीही गोष्ट सहजगत्या मिळणार नाही. हा पुर्ण सप्ताह आरोग्याबाबत प्रतिकूल आहे. काळजी घ्यावी.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, शुक्र षष्ठात गुरु, सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
पूर्ण सप्ताह चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. विवाहेच्छूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. प्रेमिकांना हा सप्ताह विशेष चांगला आहे. नविन विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करण्यासाठीही अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभाचे अचानक आलेले योग सुखावून टाकतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी सप्ताहाची सुरूवात जास्त अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, शुक्र पंचमात गुरु, षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान खरेदीने होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. धार्मिक कार्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. भावंडांच्या भःटीचे योग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर व आनंददायक ठरतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात मंगळ, मंगळ, तृतिय स्थानात रवि, बुध, शुक्र चतुर्थात गुरु, पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घराच्या देखभालीसाठी किंवा सजावटीकडे लक्ष द्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची किंवा काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर आपले काही छंद असतील तर त्यासाठी किंवा नविन विषयांचा अभ्यास करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. ज्योतिष किंवा त्यासारख्या गूढ विषयांमधे रुची निर्माण होऊ शकेल. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानी रवि, बुध, शुक्र, तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
२३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
संपूर्ण सप्ताहात छान ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यालयिन कामासाठी प्रवास करावा लागु शकेल. सप्ताह मध्यात एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी व्हाल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धनलाभ होतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताह अखेरीस एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, शुक्र, धनस्थानी गुरु, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. धनलाभाचे योग आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करु नका. अन्यथा कायदेशीर कटकटी उद्भवू शकतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी मंगळ, व्ययस्थानात रवि, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. मात्र हा कालावधी इंशुरंन्सचं काम करणारे तसेच ज्योतिषी यांना अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने खुश असाल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत. मात्र एखाद्या मित्राला अचानक काही मदत करावी लागेल. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात मंगळ, लाभस्थानी रवि, बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान खरेदीचा मूड असेल. सोमवार व मंगळवार काहींना त्रासदायक व अडचणींचे असू शकतात. मात्र गूढ विषयांचा अभ्यास किंवा पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची असेल त्यांना हा काळ अनुकूलच ठरणार आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आप्तेष्टांबरोबर छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमात रवि, बुध, शुक्र, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, बुध, शुक्र, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा ठरु शकेल सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील. गुरुजनांशी वाद टाळावेत. २६ तारखेला विशेष काळजी घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमात रवि, बुध, शुक्र, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २३ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. २५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी व्हाल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध