अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०१९)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात रवि, मंगळ, सप्तमात बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीस मनासारखी खरेदी होईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वडीलधारी व्यक्तींचे मन दुखावू नका. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग येतील. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
रास वृषभ
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात रवि, मंगळ, षष्ठात बुध, शुक्र व सप्तमात गुरु, अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. जोडीदाराबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी कळतील. भागीदारीबद्दलचे काही प्रस्ताव आले आणि जर ते आपल्याला अनुकूल असतील तर ते स्विकारायला हरकत नाहीत. मित्रांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या मध्यात पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतुन लाभ होऊ शकतील. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. आपल्या बोलण्यावर संयम ठेवणे गरजेचे आहे. वाद टाळावेत.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, पंचमात बुध, शुक्र षष्ठात गुरु, सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराशी व वरीष्ठांशी वाद टाळावे. नोकरीसाठी किंवा नोकरीबदलासाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीची ऒळख वापरता येते का ते पहा. काम होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात रवि, मंगळ, चतुर्थात बुध, शुक्र पंचमात गुरु, षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. सप्ताह मध्यात छान काम होईल. तुमच्यावर वरीष्ठ खुष असतील. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. कलाकारांसाठी व प्रेमी जीवांसाठी हा कालावधी खुप चांगला आहे. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे. तब्येतीची मात्र काळाजी घेणे आवश्यक.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, मंगळ, मंगळ, तृतिय स्थानात बुध, शुक्र चतुर्थात गुरु, पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात त्रासाची व कंटाळवाणी होईल. कामाच्या ठिकाणी आपली चुक होणार नाही याची काळजी घ्यावी. घरातील मंडळींशी वाद टाळा. अध्यात्म मार्गातील लोकांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह मध्यात छान काम होईल. तुमच्यावर वरीष्ठ खुष असतील. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. छान धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, बुध, शुक्र, तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. एखाद्या मेजवानीचा/ समारंभाचा भाग व्हाल. सोमवार व मंगळवार वाहने जपून चालवा. बेकायदा गोष्टींशी तुमचा संबंध येणार नाही याची दक्षता घ्या. जोखिमेची कामे टाळा. सप्ताह मध्यात काही चांगल्या घटना चकित करतील. सप्ताह मध्यानंतर चांगला कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम हॊईल. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, धनस्थानी गुरु, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगला काळ आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. काहींना प्रवासयोग येऊ शकतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी रवि, मंगळ, व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छान लाभ होतील. मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. विशेषत: अॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास जाणवतील. खाण्या- पिण्याबाबत अतिरेक टाळावा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात रवि, मंगळ, लाभस्थानी बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला एक प्रकारचं दडपण विनाकारण मनावर राहील. घरकामासाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. मात्र अती आत्मविश्वास नको. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतुन फ़ायदा संभवतो. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात एखादा उत्सव, समारंभ किंवा छान पार्टी करायला हरकत नाही.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी रवि, मंगळ, दशमात बुध, शुक्र, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. लाभदायक प्रवासयोग येतील. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. रिअल इस्टेट्ची कामे करणार्यांना एखादं चांगलं फ़ायदा मिळवून देणारं काम मिळू शकेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. सप्ताह मध्यानंतर एखाद्या स्पर्धा/ परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. नोकरी बदलासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करतांना सावधानता बाळगावी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात रवि, मंगळ, भाग्यस्थानी बुध, शुक्र, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं व फ़ायदा मिळवून काम आपल्या हातून घडेल. वॆळ छान जाईल. सोमवार व मंगळवार प्रवास करणार असाल तर प्रवासात सर्व प्रकारची काळजी घ्यावी. भावंडांशी वाद टाळावेत. सोशल मिडियावर काहीही शेअर करतांना कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी रवि, मंगळ, अष्टमात बुध, शुक्र, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेस बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल आणि १७ तारखेला रवि तुळ राशित प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासयोग येतील. मात्र कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मौज मजेचे प्रसंग घडतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र
प्रतिकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध