अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर  २०१९)                        

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, षष्ठात रवि, मंगळ, सप्तमात बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात भाग्यवर्धक घटनांनी होऊ शकते. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना लाभ संभवतात. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. ज्योतिष, मानसशास्त्र, परामानसशास्त्र यांसारख्या गूढ विषयांचा अभ्यास करण्यांना चांगला काळ आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, पंचमात रवि, मंगळ, षष्ठात बुध, शुक्र व सप्तमात गुरु, अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला जाणार आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगारवाढीसाठीही अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताह अखेरीस धनलाभाचे योग आहेत. जोडीदाराबरोबर छान वेळ व्यतीत कराल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना विशेष अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, पंचमात बुध, शुक्र षष्ठात गुरु, सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनीही या कालावधीत जपून व्यवहार करावेत. सप्ताह मध्यात स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम करु नये. विमा क्षेत्रात काम करणार्‍यांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र त्यात अडथळे येण्य़ाची शक्याता आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या वरीष्ठांच्या नाराजीला कारण ठरेल असे कृत्य़ आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी. मधूमेह किंवा पोटासंबंधी काही त्रास तर काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात रवि, मंगळ, चतुर्थात बुध, शुक्र पंचमात गुरु, षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगली. तब्बेतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. सप्ताह मध्यात जोडीदाराच्या तब्बेतीकडे लक्ष द्यावे. प्रेमिकांसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळा. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. आपल्याला एखादा नविन विषय किंवा कला शिकायची असेल तर त्याची सुरुवात करण्यासाठी हा योग्य कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, मंगळ, मंगळ, तृतिय स्थानात बुध, शुक्र चतुर्थात गुरु, पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवात विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेसर्स/ कमोडीटी सारख्या व्यवहारापसून सध्या लांब रहावे, मैदानी खेळ खेळणार्‍यांना नविन संधी मिळतील मात्र शारीरिक दुखापती होऊ नयेत याची या काळात पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनी एखादी ऑफ़र मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कुठलाच निर्णय तातडीने घेऊ नका. सप्ताहाचा शेवट ज्योतिषी, ईतिहासकार, मानसोपचारतज्ञ अत्यंत चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, बुध, शुक्र, तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरुवातीला घरात काही कुरबुरी/ कटकटी होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सप्ताहाचा मध्य चांगला आहे.  काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसे आहारतज्ञ यांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळू शकते. मन प्रसन्न असेल. अविवाहितांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, धनस्थानी गुरु, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाच्या मध्यात नविन वास्तू खरेदी/ विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नविन विषय शिकयला किंवा एखाद्या छंदासाठी जरूर वेळ द्या. खेळाडूंना अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून लाभ संभवितात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि लाभस्थानी रवि, मंगळ, व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रवासाचे योग येतील. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. मात्र खाण्यावर नियंत्रण ठेवावे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्याने खूश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू दशमात रवि, मंगळ, लाभस्थानी बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सप्ताहाची सुरूवात छान खरेदीची असू शकेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घ्याल. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. लेखकांना व वक्त्यांना काळ चांगला आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठीही अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस नविन वास्तू खरेदी किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, भाग्यस्थानी रवि, मंगळ, दशमात बुध, शुक्र, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: हा पूर्ण सप्ताह काही कटकटींनी होऊ शकेल. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. काही अनावश्यक खर्च किंवा खरेदी होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. दात व डोळे यांची काळजी घ्यावी. त्याबद्दल काही त्रास असतील तर अंगावर काढू नका. योग्य तो वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा. काहींच्या बाबतीत हातातोंडाशी आलेले धनलाभाचे योग लांबतील. सप्ताहाच्या शेवटी कवी, लेखक यांच्यासाठी चांगला आहे. मन प्रसन्न असेल. कामानिमित्त प्रवास संभवतो.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, अष्टमात रवि, मंगळ, भाग्यस्थानी बुध, शुक्र, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यातही काही धनलाभ संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. सप्ताह मध्यानंतर्ही काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुने मित्र भेटतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी आपण केलेल्या एखाद्या चांगल्या कामामुळे वरीष्टांना खुश करु शकाल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, सप्तमस्थानी रवि, मंगळ, अष्टमात बुध, शुक्र, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला रविचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल.
फ़लादेश: संपूर्ण सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या सहवासात रहायला मिळू शकेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध