अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य ( २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०१९)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात मंगळ, षष्ठात रवि, बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात  शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सोशल मिडियावर लिहितांना लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. संततीशी वाद टाळावे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, चतुर्थात मंगळ, पंचमात रवि, बुध, शुक्र व सप्तमात गुरु, अष्टमात शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवणार आहेत. विशेषत: सर्दी/ दात/ डोळे यासंबंधी काही त्रास यादरम्यान जाणवतील काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना अनुकूल कालावधी आहे. काहीतरी चांगलं घडल्यामुळे खुश असाल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. एखादा विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर अत्यंत शुभ काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, तृतिय स्थानात मंगळ, चतुर्थात रवि, बुध, शुक्र षष्ठात गुरु, सप्तमात शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडीच्या पदार्थांची घरात रेलचेल असेल. आपल्या कुटुंबीयांबरोबर एखाद्या आवडत्या हॉटेलला भेट द्यायला हरकत नाही. सप्ताह अखेर छान असणार आहे. आपल्या आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्‍यांचा सुखद अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात मंगळ, तृतिय स्थानात रवि, बुध, शुक्र पंचमात गुरु, षष्ठात शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आपल्या प्रियजनांबरोबर मस्त खरेदीची ठरु शकेल. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आपली काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकुल काळ आहे. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, व्दितिय स्थानात रवि, बुध, शुक्र चतुर्थात गुरु, पंचमात शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना प्रवासयोग शक्य. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात. प्रॉपर्टीच्या खरेदी/ विक्रीसाठी अनुकुल काळ  आहे. घरातील वातावरण प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. जोडीदाराला छानसं गिफ़्ट द्यायला हरकत नाही. काही अनअपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, शुक्र, तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मर्जी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकुल काळ आहे. मात्र या काळात नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतिय स्थानात शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू, लाभस्थानी मंगळ आणि व्ययस्थानात रवि, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत.  सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. अचानक एखादा खर्च करावा लागू शकतो.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू, दशमात मंगळ आणि लाभस्थानी रवि, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग मात्र टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकुल काळ आहे.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, भाग्यस्थानी मंगळ दशमात रवि, बुध, शुक्र आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराला एखादी छानशी भॆटवस्तु देऊन खुश करा. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, अष्टमात मंगळ, भाग्यस्थानी रवि, बुध, शुक्र, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. कलाकारांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींनाही चांगला काळ आहे. मात्र आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका अती दगदग टाळा. काहींना प्रवासयोग शक्य. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी.
सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस मात्र रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमात रवि, बुध, शुक्र, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थी व प्रेमिकांना प्रतिकूल कालावधी आहे. गुंतवणूक करतांना सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या-ज्या क्षेत्रात जोखिम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी.सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत छान जाणार आहे. अती दगदग टाळावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, षष्ठात मंगळ, सप्तमस्थानी रवि, बुध, शुक्र, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला बुधाचा शनिशी केद्रयोग होईल. २३ तारखेला चंद्रचा मंगळाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. २४ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. आपल्याकडून चांगलं लेखन या काळात होऊ शकेल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नविन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध