अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१९)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात रवि, मंगळ, षष्ठात बुध, शुक्र अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही गोष्टींसाठी खर्च करावा लागेल. काही मनाविरुध्द घटना शक्य आहेत. पारमार्थिक उन्नती करणार्यांसाठी मात्र हा काळ उत्तम असणार आहे. सप्ताहाच्या मध्यात छान धनलाभाचे योग आहेत. मित्रांबरोबर वेळ घालविता येईल. गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाची अखेर लाभदायक असेल. आपल्या जोडीदाराला जरुर वेळ द्यावा. आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, पंचमात बुध, शुक्र व सप्तमात गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या देखभालीसाठी किंवा प्रॉपर्टीच्या इतर कारणांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतील.
प्रॉपर्टी विकायची असेल तर थोडा जास्त प्रयत्न केल्यास यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. एखाद्या छानशा समारंभात तुम्ही हजेरी लावू शकाल. काही लाभ किंवा एखादी शाबासकी/ पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप मन प्रसन्न करणारी ठरेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, तृतिय स्थानात रवि, मंगळ, चतुर्थात बुध, शुक्र षष्ठात गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी/ सहकार्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्य छान असेल. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मस्त शॉपिंगला जायचा मूड असेल. सप्ताहाचा शेवट प्रसन्न घडामोडींचा असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, मंगळ, तृतिय स्थानात बुध, शुक्र पंचमात गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. सप्ताह मध्यात चांगलं काम झाल्यामुळे खुष असाल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. काही धनलाभही अपेक्षित आहेत. सप्ताह मध्यानंतर लेखक, कवी, साहित्यिक यांना छान ग्रहयोग आहेत. सप्ताहाच्या शेवटी प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, व्दितिय स्थानात बुध, शुक्र चतुर्थात गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. मनाचा तोल जाऊ देऊ नये. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी समजेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर फ़ायद्याचे योग आहेत. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. काही धनलाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, तृतियस्थानात गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा असू शकतो. अॅसिडीटी किंवा पोटाचा त्रास या काळात होऊ शकतो. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य आपला आत्मविश्वास वाढविणारा असेल. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतिय स्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू, दशमस्थानी रवि, मंगळ आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यायला हवी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र चांगला काळ आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला जाईल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. प्रेमिकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेर संमिश्र घटनांचा असू शकेल. वाहने जपून चालवावीत. जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना मात्र चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू रवि, मंगळ आणि लाभस्थानी बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा मिळू शकतो. तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहातील सुरुवातीला घरातील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्या. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगला काळ आहे. प्रॉपर्टी ज्यांना विकायची असेल त्यांना अनुकूल किंमत मिळू शकेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
सप्ताह मध्यानंतर नोकरदार व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, वकील यांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. सप्ताह अखेर जोडीदारासाठी चांगली आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, अष्टमात रवि, बुध, शुक्र व मंगळ, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताह मध्य थोडा प्रतिकूल असू शकतो. वाहने जपून चालवावीत. प्रॉपर्टीच्या कामंसाठी प्रतिकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल कालावधी आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. सप्ताह अखेरीस तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, सप्तमस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्यानंतर प्रवासयोग शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूलता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, षष्ठात रवि, बुध, शुक्र व मंगळ, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १७ तारखेला रवि राशिबदल करुन कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला शनि मार्गी होईल आणि २१ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होइल.
सप्ताहाच्या सुरूवातीस आपला आत्मविश्वास वाढवण्यार्या घटना संभवतात. प्रवासयोग येतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी व पोटाच्याही काही समस्या जाणवू शकतील. खाण्यापिण्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर काही जुन्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. प्रवासातून लाभ संभवतात. लेखक व ब्लॉगर्स यांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर जोडीदाराबरोबर छान साजरी कराल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध