अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१९)   

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, पंचमात रवि, बुध, शुक्र व मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. पती / पत्नी विषयी एखादी चांगली बातमी कळू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमनासाठीही हा काळ चांगला आहे. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. संपूर्ण सप्ताह धार्मिक गोष्टींसाठी/ उपासनेसाठी अनुकुल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, बुध, शुक्र व मंगळ, सप्तमात गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ काढा. ईंशूरन्सचे काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. सूचक स्वप्ने पडू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कामात अचानक अडथळे किंवा त्रास संभवतो. शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांशी विनाकारण वाद वाढवू नका. सप्ताहाच्या शेवटी काही चांगल्या व आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील.
उपासना: मारुतीची उपासना फ़ायदेशीर ठरेल. हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, तृतिय स्थानात रवि, बुध, शुक्र व मंगळ, षष्ठात गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताह काहीसा प्रतिकूल आहे. घरच्यांबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय असणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवहार स्वच्छ ठेवावेत. ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा फ़ॅटी लिव्हरचा त्रास असेल त्यांनी आरोग्याची पूर्ण काळ्जी घ्यावी. अंगावर दुखणे काढू नका. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी आपले काम बरे आणि आपण बरे हे धोरण ठेवावे. वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची पुर्ण काळजी घ्यावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, बुध, शुक्र व मंगळ, पंचमात गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. वादविवादात व स्पर्धा परीक्षेमध्ये यश संभवते. नविन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराला जपावे. वादविवाद टाळावेत. त्याच्या तब्येतीविषयी काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराबरोबर वाद टोकाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे विकार असतील त्यांनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. अती मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. सप्ताहाचा शेवट काहींना भाग्यवर्धक आहे. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना हा संपूर्ण सप्ताह चांगला आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ, चतुर्थात गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना विरोधी ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. संधीवात, ह्रदयविकार किंवा रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी काळजी घ्यावी. वकील व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र हा अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर वाहने हळू चालवावीत. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
उपासना: हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र या काळात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, बुध, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग आहेत. गृह सजावटीसाठी वेळ काढाल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतुन लाभ संभवतात. एखाद्या  सप्ताहाचा शेवट जोडीदाराला चांगला आहे. जोडीदाराबरोबर मस्त ट्रीपला जाण्यासाठी छान कालावधी आहे. लेखकांना यशदायक काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि लाभस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घरात छानशा समारंभ किंवा सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला आहे. घरातील काही दुरुस्तीची कामे प्रलंबीत असतील तर आता त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे मात्र यश मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. कमोडीटी, शेअर मार्केट किंवा तत्सम गोष्टींमध्ये गुंतवणूक सध्या नुकसानीची ठरु शकेल. फिटनेसच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना सप्ताहाचा शेवट चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि रवि, बुध, शुक्र व मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस काहींना धनलाभाची प्राप्ती होऊ शकेल मात्र वादाचे प्रसंग टाळावेत. डोळ्यांचे किंवा दाताचे काही विकार असतील तर वेळीच उपचार करुन घ्यावेत. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. घरातील वातावरण छान असेल. प्रॉपर्टीच्या संबंधी कामे करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, भाग्यस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. छान खरेदी होईल. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. प्रवासाचेही योग येऊ शकतात. परदेशगमनासाठी कालावधी चांगला आहे. घरातील वातावरण चांगले राहील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. लेखक/ ब्लॉगर्स यांना चांगले ग्रहमान आहे. मात्र वादग्रस्त लिखाण टाळावे. प्रॉपर्टीपासून फ़ायदा संभवतो. नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही अनुकूल आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, अष्टमात रवि, बुध, शुक्र व मंगळ, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
हा सप्ताह खर्चाचा असेल. एखाद्या मित्राच्या/ आप्तॆष्टाच्या विचित्र बोलण्याचा किंवा वागण्याचा त्रास होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबीयांबरोबर वादाचे प्रसंग टाळावेत. कॉंप्यूटरवर जास्त वेळ काम करणार्‍यांनी डोळ्याची योग्य ती काळजी घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना मात्र लाभदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस अनुकूल कालावधी आहे. काही लाभाचे प्रसंग घडतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रवास लाभदायक ठरतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, सप्तमस्थानी रवि, बुध, शुक्र व मंगळ, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचे योग येतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. परदेशगमनासाठी काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ होतील. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसमवेत वेळ मजेत जाईल. मस्त पार्टी करायला हरकत नाही.
वरीष्ठ आपल्या कामावर खुश असतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, षष्ठात रवि, बुध, शुक्र व मंगळ, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्र व शनि यांची युती होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व बुध-शुक्र युती होईल. १४ तारखेला चंद्राची रविशी व शुक्राशी प्रतियुती होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. भाग्यवर्धक काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. धार्मिक गोष्टींसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. मित्रमंडळींच्या भेटी घडू शकतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी परदेशगमनासाठी अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीमधून फ़ायदा संभवतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध