अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१९)  

-व्दिवर्षपूर्ती-
या सप्ताहात ’अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य’ दोन वर्षाचं होत आहे. १३ ऑगस्ट २०१७ रोजी याची सुरुवात झाली. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळे हा प्रवास आतापर्यंत छान झाला. सर्वांना खूप खूप धन्यवाद. असाच आपला स्नेह असू द्या. आपला अभिप्राय जरुर लिहावा.

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, बुध व शुक्र, पंचमात मंगळ, अष्टमस्थानात गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासना करणार्‍यांसाठी काळ चांगला आहे. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ यांना ग्रहमान अनुकुल आहे. अचानक लाभही होऊ शकतात. काहींना प्रवास योग येतील. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग शक्य आहेत. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जास्तीत जास्त करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, तृतिय स्थानात रवि, बुध व शुक्र, चतुर्थात मंगळ, सप्तमात गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. कुठलाही शारिरीक त्रास असल्यास अंगावर काढू नका. वैद्यकिय सल्ला नक्की घ्या. जोडीदाराशी किंवा मित्रांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात हलगर्जीपणा ताळावा. वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. गुढ गोष्टींकडे मनाचा ऒढा असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, व्दितिय स्थानात रवि, बुध व शुक्र, तृतिय स्थानात मंगळ, षष्ठात गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराच्या तब्येतीला जपावे तसेच जोडीदाराशी व आपल्या वरीष्ठांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी आपले व्यवहार पारदर्शक ठेवावेत. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट तसेच कागदपत्रे सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. भागीदारीत नविन व्यवसाय सुरु करायचा असेल तर ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध व शुक्र, व्दितिय स्थानात मंगळ, पंचमात गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांना व आहारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मात्र जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, चतुर्थात गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, बुध व शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. संततीबाबत चांगली बातमी कळेल. विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. विशेषत: वातविकार किंवा ह्रदयविकाराचा ज्यांना त्रास आहे त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह अखेर अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू, लाभस्थानी रवि, बुध व शुक्र आणि  व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला जाईल. काही लाभही होतील. नविन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू, दशमस्थानी रवि, बुध व शुक्र आणि लाभस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल  काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. सॉफ़्टवेअर‍, डिझाईनशी संबंधीत तसेच कलाकारांना हा कालावधी अनुकूल आहे. नविन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. खेळाडू व विद्यार्थ्यांना ग्रहमान आहे. ह्रदयविकाराचा त्रास असणार्‍यांनी थोडी काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू, भाग्यस्थानी रवि, बुध व शुक्र  आणि मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग येतील. चांगल्या घटना घडतील. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. भागीदारीतील व्यावसायिकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची. घराच्या डागडुजीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमात रवि, बुध व शुक्र, भाग्यस्थानी मंगळ, आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. छान खरेदी होईल. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. छान पार्टीचा मुड असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, सप्तमस्थानी रवि, बुध व शुक्र, अष्टमात मंगळ, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नर्तन कलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तिंना लाभदायक काळ आहे. काही लाभ संभवतात. सप्ताह मध्यात डोळे किंवा दात यांच्यासंबंधी काही त्रास जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. प्रेमिकांना मात्र हा कालावधी छान आहे. सप्ताह अखेरीस खाण्यापिण्याबाबत संयम बाळगावा. डोळे किंवा दाताचे काही त्रास असतील तर दुर्लक्ष करु नका. लांबचे प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. मनाविरुध्द काही खर्च करावे लागतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, षष्ठात रवि, बुध व शुक्र, सप्तमस्थानी मंगळ, दशमस्थानी गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतात. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मुड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडीटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. नृत्यकलेशी संबंधीत लोकांनाही हा काळ चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत. जुन्या मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. एकंदरीत सर्वच सप्ताह चांगला व लाभदायक आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, पंचमात रवि, बुध व शुक्र, षष्ठात  मंगळ, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्र शनी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रवि व शुक्र युती होईल. १६ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल व शुक्र सिंह राशित प्रवेश करेल आणि १७ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल व रवि सिंह राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. काहींना प्रवास संभवतो. मित्रांच्या किंवा परीचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध