अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ जुलै ते ३ ऑगस्ट)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, चतुर्थात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. छान मेजवानीचे बेत पार पडतील. मन प्रसन्न असेल. प्रेमिकांना काही मंतरलेले क्षण अनुभवता येतील. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही घटना घडण्याची शक्यता आहे. महत्वाचे व्यवहार करताना पुरेशी काळजी घ्यावी. आईला जपावे. सप्ताहाच्या अखेरीस अनुकूल काळ आहे. कलाकार व विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, तृतिय स्थानात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
पूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग येऊ शकतात. मस्त पावसाळी सहल आयोजित करायला हरकत नाही. मात्र तब्येतीची काळजी घ्या. सर्दी/ कफ़ाचा त्रास संभवतो. भावंडे/ शेजारी यांच्याबाबत काही चांगले अनुभव येतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर प्रवास करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. लेखक, वक्ते, ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त गोष्टींपासून लांब राहावे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. सावधतेने व्यवहार करावेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, व्दितिय स्थानात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकूल असेल. कुटुंबीयांसह खरेदीला जायला हरकत नाही. मनावर व बोलण्यावर मात्र संयम ठेवावा. डोळ्यांच्या काही तक्रारी या कालावधीत जाणवू शकतील. सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकूल असेल. कुटुंबीयांसह छान खरेदीला जायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचे नियोजन असेल. थोडा वेळ स्वत:साठी जरुर काढा. प्रॉपर्टीसंदर्भातील खरेदी-विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. घरातील बिलंबीत कामे काही असतील तर त्यालाही वेळ द्यावा लागेल. सप्ताह मध्यानंतर कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांच्यासाठी ग्रहमान चांगले आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचेही योग येतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य परदेशगमनासाठी चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतुन फ़ायदा मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर धोका असलेले कुठलेही काम करु नये असे ग्रहमान आहे. मनाविरुध्द काही घटना शक्य आहेत. मन:स्ताप करुन घेऊ नका.
सप्ताहाच्या शेवटी भावंडांच्या भेटी शक्य आहेत. लेखक/ कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी राहू आणि व्ययस्थानात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कामात चुका होणार नाहीत व वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात वडीलधारी कोणी असतील तर त्यांची काळजी घ्या. मात्र परदेशाशी ज्या लोकांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्या बाबतीत काही अनुकूल घटना शक्य आहेत. सप्ताहाचा मध्य मित्रमंडळींच्या भेटीचा असू शकेल. प्रवासयोग शक्य. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि लाभस्थानी रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामासाठी एखादा खर्च कराल. गृहसजावटीसाठी छानशी खरेदी करायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज असेल. अशा प्रसंगातूनच मैत्रीची वीण घट्ट होत असते हे लक्षात ठेवावे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि दशमस्थानी रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ज्योतिष, मानसशास्त्र व ईन्शूरन्स हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहे. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूलता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. केलेल्या कष्टाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटीगाठी शक्य आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात राहू आणि भाग्यस्थानी रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीतील व्यवसायाला पूरक ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असु शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. धार्मिक गोष्टींसाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठांकडून कामे करुन घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा फ़ायदा करुन घ्या.
सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, अष्टमात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी काम करणार्यांसाठी फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी प्रतिकूल जाईल. जोडीदाराशी वाद टाळावे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
उपासना: कालभैरव अष्टक या काळात नित्य म्हणणे उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, सप्तमस्थानी रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असाल तर अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर प्रवास टाळावा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, षष्ठात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल
हा सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे. आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. खूप श्रम, दगदग करु नका. पुरेशी विश्रांती घ्या. तुम्हाला सर्दी/ कफ़ाचा त्रास होण्याची शक्यता आहे. पावसात भिजणे टाळा. याचबरोबर आपल्या घरातील किंवा जवळच्या व्यक्तींशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. हितशत्रूंवर नजर ठेवा. अध्यात्मात मन गुंतवा. वैद्यकीय क्षेत्रातील लोक, आहारतज्ञ, फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणारे यांना मात्र हा कालावधी खूप चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास बाळगू नये. अभ्यास/ परीश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, पंचमात रवि, मंगळ, वक्री बुध व शुक्र, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्र व गुरुचा प्रतियोग होईल. ३० तारखेला मंगळाचा नेपचूनशी षडाष्टक होईल व बुध वक्रगतीने मिथुन राशित प्रवेश करेल. १ ऑगस्टला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व बुध मार्गी होईल आणि २ तारखेला बुध पुन्हा कर्क राशित प्रवेश करेल
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थी, खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. लग्न ठरविण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घेतल्यास संपूर्ण सप्ताह छान गेल्याची भावना मनात असेल.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध