अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ जुलै ते २० जुलै)           

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात रवि, शुक्र, राहू, चतुर्थात मंगळ, बुध, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. गूढ विषयाकडे ऒढा राहिल. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ तर काहींना प्रवासयोग संभवतात
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, शुक्र, राहू, तृतिय स्थानात मंगळ, बुध, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व कटकटीची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. जोडीदाराला जपा. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. कुलस्वामिनीचा जप करावा. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ व विमा व्यावसायिक यांना हा कालावधी चांगला आहे. नवनविन कल्पना सुचतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात आपल्या चीजवस्तु सांभाळा. वाहने जपून चालवा. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. मात्र आपल्या वरिष्ठांची नाराजी ऒढवेल असे वर्तन टाळावे. कामात हलगर्जीपणा नको. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात रवि, शुक्र, राहू, व्दितिय स्थानात मंगळ, बुध षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. आपल्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. विशेषत: आपल्या जोडीदाराला दुखावू नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी या काळात आपले सर्व व्यवहार पारदर्शी ठेवावेत. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. मात्र सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींना गुरुकृपा शक्य. प्रवासयोग फ़ायदेशीर ठरतील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
रविवार दुपारपर्यंतचा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, न्युट्रीशिअन्स, फ़िजिकल फ़िटनेसमध्ये काम करणारे तसेच वकील यांना हा कालावधी खूप चांगला आहे. नोकरीबदलासाठी किंवा नविन नोकरीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून चांगला फ़ायदा मिळू शकेल. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींशी विशेषत: जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी विनाकारण कोणाशी शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहने हळू चालवावीत. जोखिम असलेले काम सध्या तरी टाळलेलेच बरे. तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी रवि, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. एखादं बक्षिस, शाबासकी, सन्मान मिळू शकेल. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात तब्येतीकडे लक्ष द्यावे. हाती घेतलेल्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. मात्र फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी रवि, शुक्र, राहू आणि लाभस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. लेखक/ कवी यांना हा काळ खूप चांगला आहे. एखादा कोर्स किंवा कामाशी संबंधीत काही शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेर तब्येतीला जपावे. विशेषत: दमा/ वाताचे काही त्रास असतील तर काळजी घ्यावी. वातूळ पदार्थ या कालावधीत अजिबात खाऊ नका.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी रवि, शुक्र, राहू आणि दशमस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासात खिसा पाकीट सांभाळावे. ब्लॉगर्स, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात रवि, शुक्र, राहू आणि भाग्यस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. मात्र कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी रवि, शुक्र, राहू, अष्टमात मंगळ, बुध, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह अखेर उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. भावंडांची खुशाली कळेल. जवळचे प्रवास शक्य. वरीष्ठांची अनुकूलता राहील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात रवि, शुक्र, राहू, सप्तमस्थानी मंगळ, बुध, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ. सप्ताह मध्यात केलेल्या कामाचं चीज झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. कलाकार, वादक, कवी यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी मनावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या चीजवस्तु/ पैशांचं पाकीट/ कागदपत्रे सांभाळा. डॊळ्यांची विशेष काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात रवि, शुक्र, राहू, षष्ठात मंगळ, बुध, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमनाचे योग संभवतात.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी रवि, शुक्र, राहू, पंचमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला रविचा ल्पूटोशी प्रतियोग होईल. १४ तारखेला रविचा प्लूटोशी प्रतियोग होईल. १६ तारखेला चंद्र व शनी यांची युती होईल. १७ तारखेला रवि कर्क राशित प्रवेश करेल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
छान आठवडा आहे. भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. सप्ताह मनाजोगता जाणार आहे. काहींना छान प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या मध्यात अती रागाने कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. मस्त पार्टीचा मूड असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध