अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ जुलै ते १३ जुलै)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात रवि, शुक्र, राहू, चतुर्थात मंगळ, बुध, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर किंवा भावंडांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहेच्छूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदारांसाठी चांगले आहेत. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात रवि, शुक्र, राहू, तृतिय स्थानात मंगळ, बुध, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी पती किंवा पत्नीबरोबर वेळ मजेत जाणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर व्यवहारांचा कालावधी ठरु शकेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात रवि, शुक्र, राहू, व्दितिय स्थानात मंगळ, बुध षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस भावंडे/ नातेवाईक किंवा शेजारी यांच्याबरोबर मजेत जाईल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. कवी, कलाकार तसेच लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. मात्र कागदपत्रे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुष
व्हाल. कलाकारांना विशेषत: गायकांना हा कालावधी खूप अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, बुध, पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, शुक्र, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस प्रिय घटनांचा असेल. छान पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायला हरकत नाही. अचानक काही खर्चाचे प्रसंगही उभे रहातील. नंतरचे दोन दिवस प्रवासयोग देऊ शकतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी संवाद साधाल. आपल्या रागावर या काळात नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरात छान खरेदी कराल. परदेशगमन ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रेमिकांसाठीही चांगला कालावधी आहे. शेअर मार्केट सारख्या जोखिम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानी रवि, शुक्र, राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. नंतरचे दोन दिवस आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. दात किंवा डोळ्यांच्या काही समस्या या काळात जाणवतील. जास्त त्रास असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढणार आहे. वरीष्ठ खुष असतील. लाभदायक काळ आहे. लेखक, कवी, ब्लॉगर्स यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस घराच्या डागडुजीसाठी किंवा दुरुस्तीसाठी काही खर्च करावा लागू शकेल. प्रॉपर्टी खरेदी विक्री सध्या नको.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी रवि, शुक्र, राहू आणि लाभस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार हा कालावधी छान आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कवी, लेखक यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. फ़ायदेशीर प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्याने खुष असाल. काही लाभही या काळात अपेक्षित आहेत. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वाद टाळा. प्रवासात योग्य ते काळजी घ्या. लेखकांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यस्थानी रवि, शुक्र, राहू आणि दशमस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. धर्मिक गोष्टींमध्दे मन रमेल. नंतरचे दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. मात्र अती दगदग टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. कामानिमित्त प्रवास शक्य. शिक्षणक्षेत्रातल्या लोकांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम झाल्यामुळे आनंदी असाल. आपले वरीष्ठही आपल्या कामावर खुष असतील. काहींना धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, अष्टमात रवि, शुक्र, राहू आणि भाग्यस्थानी मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस छान असणार आहे. वरीष्ठ खुष असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नंतरचे दोन दिवस प्रवासयोगाचे ठरु शकतील. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द घटना घडू शकतात. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. जोखिम असलेली कामे करु नका. प्रेमिकांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका आणि आपली मते दुसर्यांवर लादू नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी रवि, शुक्र, राहू, अष्टमात मंगळ, बुध, आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहेव. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सोमवार, मंगळवार आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. ज्योतिषशास्त्रासारख्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. वरीष्ठ खुष असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाथी अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. जोडीदराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे. वाहने हळू चालवा.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात रवि, शुक्र, राहू, सप्तमस्थानी मंगळ, बुध, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा असू शकतो. प्रवासात काळजी घ्या. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. सोमवार, मंगळवार भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. काहींना प्रवासयोग येतील. जोडीदाराशी वाद टाळा. सप्ताह मध्यानंतर आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. हितशत्रूंकडे लक्ष ठेवा. काहींना सर्दीतापाचा त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. नोकरीबदल करण्यासाठी मात्र हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे
योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात रवि, शुक्र, राहू, षष्ठात मंगळ, बुध, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रात कामं करणार्यांसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. विद्यार्थी, कलाकार व प्रेमिकांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी रवि, शुक्र, राहू, पंचमात मंगळ, बुध, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला बुधाची मंगळाशी व शुक्राचा हर्षलशी लाभयोग होईल. ९ तारखेला रविचा शनिशी प्रतियोग होईल. आणि ११ तारखेला मंगळाचा हर्षलशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात चांगली होणार आहे. रविवारच्या दिवशी आपल्या आवडत्या लोकांबरोबर एखाद्या पार्टीचे किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही.
नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. प्रेमिकांसाठी अनुकूल काळ आहे. विध्यार्थी व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. भागीदारीतील व्यवसायात चांगला फ़ायदा होईल. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रॉपर्टीची कामे सध्या न केलेलीच बरी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध