अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ जून ते २२ जून)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, व्दितिय स्थानात शुक्र, तृतिय स्थानात रवि, मंगळ, बुध, राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने हळू चालवावीत. इन्शुरन्सचे काम करणारे, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य. व्यावसायिक लोक मनासारखे काम झाल्याने खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी जुन्या मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग शक्य. धनलाभाचे योग येऊ शकतात.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना काही चांगले अनुभव येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, व्दितिय स्थानात रवि, मंगळ, बुध, राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तुमच्या किंवा तुमच्या जोडीदारासंबंधी आरोग्याच्या काही समस्या निर्माण करणारा ठरु शकेल. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात दिरंगाई किंवा कुचराई करु नका.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात रवि, मंगळ, बुध राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील.  नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांनी तुर्तास आहे तीच नोकरी टिकेल असाच प्रयत्न करावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही प्रश्न असतील तर तिकडे जरुर लक्ष द्यावे. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानी रवि, मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना छान कालावधी आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकिची मिळालेली थाप उत्साह वाढवेल. प्रेमी युगुलांसाठी छान काळ आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला आहे. आहारतज्ञ, जीम ट्रेनर तसेच वैद्यकीय व्यावसायिकांसाठी विशेष चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार पारदर्शक ठेवावेत. जोखिम असलेली कामे टाळावीत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी रवि, मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरकामासाठी वेळ काढावा लागेल. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखाद्या नविन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल तर काळ अनुकुल आहे. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ. सप्ताह मध्यानंतर वात किंवा त्वचाविकार असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. वकील किंवा कायदाविषयक कामे करणार्‍यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल भाग्यस्थानी शुक्र आणि दशमस्थानी रवि, मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम झाल्याने खूष असाल. लेखकांसाठी व साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकूल आहे. इस्टेट ब्रोकर तसेच बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकुल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मस्त पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करण्यासाठी चांगला. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, अष्टमात शुक्र आणि भाग्यस्थानी रवि, मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य. प्रवास सुखकर होतील. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांच्याकडे चांगले लिखाण होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानी शुक्र आणि अष्टमात रवि, मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द प्रसंग घडणे शक्य आहेत. वाहने जपून चालवावीत. जोखिम असलेली कामे टाळावीत. मायग्रेन किंवा अ‍ॅसिडीटी असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर भावंडांची खुशाली कळेल. काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात शुक्र सप्तमस्थानी रवि, मंगळ, बुध, राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना खुप चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखी खरेदी होईल. घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आवडत्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग येतील. जवळच्या प्रवासाचे योगही संभवतात.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि, मंगळ, बुध, राहू, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मात्र मित्रांशी वाद टाळावेत. तब्येतीकडे लक्ष द्यावे. अ‍ॅसिडिटी/ पोटाचे काही त्रास जाणवू शकतात. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर बेकायदा व्यवहार टाळा. काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी आहारावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी शुक्र, पंचमात रवि, मंगळ, बुध, राहू, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानी रवि, मंगळ, बुध, राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला गुरुचा केतूशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला बुधाची मंगळाशी युती होईल व शनीचा नेपचूनशी लाभयोग होईल. १९ तारखेला मंगळाचा प्लूटोशी प्रतियोग होईल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा शेवट अध्यात्मित उन्नतीसाठी चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध