अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ जून ते १५ जून)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, व्दितिय स्थानात शुक्र, रवि, तृतिय स्थानात मंगळ, बुध, राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनि, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, कलाकारांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा शेजार्‍यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. मात्र प्रवासात काळजी घावी. तब्येतीचीही काळजी या काळात घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, रवि, व्दितिय स्थानात मंगळ, बुध, राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनि, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात वादविवाद टाळलेले बरे. या काळात दाताच्या किंवा डॊळ्यांच्या काही समस्या जाणवतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल कालावधी आहे. यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही. अती आत्म्विश्वास या काळात घातक ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, न्युट्रिशियन्स यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. पुर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, बुध राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनि, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात शुक्र, रवि अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. लेखक, कवी व कलाकारांना हा काळ खुप चांगला आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. सायनस, मायग्रेन याचा त्रास असणार्‍यांनी काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणूक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच एम. आर. यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायचं आहे त्यांच्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनि, केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल लाभस्थानी शुक्र, रवि आणि व्ययस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. आपल्या संभाषण कौशल्यामुळे लोकप्रियता मिळेल. सप्ताह मध्यात भावंडांची किंवा शेजार्‍यांशी वाद संभवतात. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करावाच लागणार असेल तर सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. लेखक/ ब्लॉगर्स यांना प्रतिकूल कालावधी आहे. वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची असेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनि, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल दशमस्थानी शुक्र, रवि आणि लाभस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात चांगली होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्याने वरीष्ठ आपल्यावर खुश असतील. कलाकारांना काळ छान आहे. सप्ताह मध्यात काही मनाविरुध्द घटना घडू शकतील. आर्थिक गोष्टींसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. काही आर्थिक लाभ होता होता राहून जातील किंवा पैशांसंबंधी काही वाद/ कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. डोळे/ दातांच्या समस्या जाणवू शकतील. सप्ताह अखेर पुन्हा ग्रहमान अनुकूल होत आहे. लेखक, कवी व कलाकारंना खुप चांगला काळ आहे. मन आनंदी असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनि, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल भाग्यस्थानी शुक्र, रवि आणि दशमस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. प्रवासासाठी व परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीचे प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ विशेष चांगला. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात काही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. वरीष्ठांशी व सहकार्‍यांशी वाद टाळा. घरातील वडीलधारी व्यक्तींची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील. घरात छान वातावरण असेल. कलाकारांना विशेषत: गायकांना चांगला काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनि, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, अष्टमात शुक्र, रवि आणि भाग्यस्थानी मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
हा सप्ताह आपल्याला फ़ारसा चांगला नाही. काही आर्थिक लाभ होता होता रहाणार आहेत. मित्र-मैत्रिणी किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. काही खर्च अचानक उद्भवू शकतील. कोणाशीहि वाद होणार नाही याची दक्षता घ्या. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. व्यसनांपासून लांब रहा. बेहिशोबी/ गैरमार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास या काळत अंगाशी येऊ शकेल. ज्यांना ज्योतिष, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांची आवड आहे किंवा जे अशा विषयांचा अभ्यास करत असतील त्यांना मात्र अतिशय चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, रवि आणि अष्टमात मंगळ, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काही आर्थिक लाभ होता होता राहून जातील किंवा पैशांसंबंधी काही वाद/ कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाराज होऊ नका. मित्रांबरोबर वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य. ज्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात शुक्र, रवि, सप्तमस्थानी मंगळ, बुध, राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य. वैद्यकिय व्यावसायिक, आहारतज्ञ, जीम ट्रेनर यांना काळ अनुकूल आहे. नविन नोकरी किंवा नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात नोकरीतील किंवा व्यवसायातील लोकांनी आपल्या कामात चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. वरीष्ठांशी व सहकार्‍यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या जोडीदाराशीही काही वाद असतील तर या काळात ते वाढणार नाहीत याकडेही लक्ष द्या. सप्ताहाच्या शेवटी मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात शुक्र, रवि, षष्ठात मंगळ, बुध, राहू, लाभस्थानी वक्री गुरु आणि व्ययस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात संमिश्र ग्रहमानाची आहे. अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही लोकांना अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. ज्योतिषशास्त्रासारखे विषय शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही विचित्र घटना शक्य आहेत. शत्रूंचा त्रास संभवतो. तब्येतीच्याही काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठ खुश असतील.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी शुक्र, रवि, पंचमात मंगळ, बुध, राहू, दशमस्थानी वक्री गुरु आणि लाभस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. संततीशी वाद टाळावेत. विद्यार्थ्यांना प्रतिकूल कालावधी आहे. ह्रदयासंबंधी काही त्रास किंवा आजार असतील तर या काळात काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात शुक्र, रवि, चतुर्थस्थानी मंगळ, बुध, राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनि, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला रविचा गुरुशी प्रतियोग व शनिशी षडाष्टक होईल, १३ तारखेला मंगळ व राहू यांचा पापकर्तरीयोग होईल, १४ तारखेला मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल आणि १५ तारखेला रवि मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल आहे. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात घरातील वातावरण बिघडणार नाही याची खवरदारी घ्या. विशेषत: जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेर संमिश्र घटनांचा ठरेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मात्र जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध