अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ मे ते १ जून)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, व्दितिय स्थानात रवी, बुध, तृतिय स्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनी, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. धनलाभही होतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील प्रवासयोगही येऊ शकतात. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. मात्र तुमची धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. वाहने सावकाश चालवा. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवट संमिश्र घटनांचा असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. मात्र भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर कोणत्याही वादात सापडणार नाहीत याची काळजी घ्या.
उपासना: या कालावधीत रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, व्दितिय स्थानात मंगळ, राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठांना न दुखवता आपले काम करुन घ्यावे. काही मनाविरुध्द घटना शक्य. व्यवसायातील लोकांनी सध्या जोखिम असलेली कामे टाळावीत. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. सप्ताह मध्यात काही लाभदायक घटना घडू शकतील. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेर अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. दातांची तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यायला हवी. डोळ्यांवर अती ताण येऊ देऊ नका. काही त्रास वाटला तर वैद्यकीय सल्ला जरुर घ्या.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, लाभस्थानी शुक्र, हर्षल आणि व्ययात रवी, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या जोडीदाराला भाग्यवर्धक काळ आहे. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल घरात वडीलधारी असतील तर त्यांची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात आपली कामे छान पार पडल्यामुळे खूश असाल. नविन नोकरी किंवा नोकरीबदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. फ़क्त या काळात तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य. मित्रांबरोबर व नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात शुक्र, हर्षल लाभस्थानी रवी, बुध आणि व्ययस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे/ वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. तब्येतीची काळजी घ्यावी. पाय, पाठ किंवा वातासंबंधी काही त्रास असतील तर विशेष काळजी घ्यावी. वातूळ, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे या काळात टाळलेले बरे. सप्ताहाच्या मध्यात काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. उपासना करण्यासही काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खूश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकूल काळ आहे. काहींना धनलाभ होतील. एखाद्या समारंभ/ पार्टीत सहभागी होण्याचे योग आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात शुक्र, हर्षल दशमस्थानी रवी, बुध, आणि लाभस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. प्रेमिकांसाठी आनंददायक काळ आहे. कायद्याचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात ज्योतिषी/ इंशूरन्सचे काम करणारे/ मानसोपचार तज्ञ यांना अनुकुल काळ आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही मन प्रसन्न करणाऱ्या घटना शक्य आहेत. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. आवडत्या व्यक्तिंच्या भेटी होतील.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात शुक्र, हर्षल भाग्यस्थानी रवी, बुध, आणि दशमस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर निय़ंत्रण ठेवणे उचित ठरेल. तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढतील. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वकील/ फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रात काम करणार्यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मात्र अनुकुल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात शुक्र, हर्षल, अष्टमात रवी, बुध, आणि भाग्यस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. काही लाभ/ बक्षिस अचानक मिळू शकेल. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टींचा काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी रवी, बुध, आणि अष्टमात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला जाईल. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट तब्येतीसाठी चांगला नाही. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना अनुकुल ग्रहमान आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठात रवी, बुध, सप्तमस्थानी मंगळ, राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे किंवा सहलीचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात शिक्षणासाठी परदेशात जाणार असाल किंवा त्यासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टी खरेदीची कामे मात्र शक्यतो करु नका. प्रॉपर्टी विक्रीसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ, एखादी शाबासकीची मिळालेली थाप याने सुखावल्यासारखे होऊ शकेल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, पंचमात बुध, रवी, षष्ठात मंगळ, राहू आणि लाभस्थानी वक्री गुरु, व्ययस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. मात्र खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा असं ग्रहांचं सांगणं आहे. आपल्या चीजवस्तू सांभाळा. डोळ्यांवर अती ताण येणार नाही असे बघा. सप्ताह मध्यात आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. कार्यालयीन कामासाठी प्रवास शक्य. सप्ताह अखेरीस घरात वाद टाळा. प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. अॅसिडिटी/ पोटाचे काही त्रास जाणवू शकतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी रवी, बुध, पंचमात मंगळ, राहू, दशमस्थानी वक्री गुरु, लाभस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
एकंदरीतच सप्ताह चांगला आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली आणि लाभदायक होण्याची शक्यता आहे. आवडत्या माणसांच्या सहवासात रहायला मिळेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. वरीष्ठ आपल्यावर खुष असतील. धनलाभाचे काही योग येऊ शकतील. प्रमोशन, पगारवाढ किंवा काही सवलतींसाठी वरीष्ठांकडे शब्द टाकायचा असेल तर त्यासाठी हा योग्य काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. नवीन गोष्टी किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करायची असेल तर अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, हर्षल, तृतियस्थानात रवी, बुध, चतुर्थस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ३० तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. १ जूनला बुध मिथुन राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छानशी खरेदी कराल. एखादा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. मात्र आता केलेला खर्च किंवा देऊ केलेला वेळ भविष्यात नक्की फ़ायदा देऊ शकेल. आयात-निर्यात करणार्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यामधे धार्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. आवक चांगली राहील. मन प्रसन्न असेल. दातांसंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्या.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध