अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ मे ते २५ मे)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, व्दितिय स्थानात रवी, बुध, तृतिय स्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनी, केतू व प्लुटो आणि लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. भावंडांशी मतभेद टाळावेत. मनाचा तोल जाऊ देऊ नये. वाहने हळू चालवावीत. इन्शुरन्सचे काम करणारे, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास प्रतिकूल आहे. प्रवास करणार असाल तर प्रवासात पुरेशी काळजी घ्यावी. विमान/ रेल्वे प्रवासासाठी निर्धारीत वेळेआधी पोहोचा. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकुल असेल. मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: या कालावधीत रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, व्दितिय स्थानात मंगळ, राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात उशीर होणे, मनाविरुध्द घटना घडणे शक्य आहे. स्वत:च्या वाहनाने प्रवास करीत असाल तर आपले वाहन प्रवासासाठी योग्य असल्याची खात्री मेकॅनिककडून आधीच करुन घ्यावी.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, लाभस्थानी शुक्र, हर्षल आणि व्ययात रवी, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात अॅसिडिटी/ पॊटाच्या तक्रारींनी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्यांनी तुर्तास आहे तीच नोकरी टिकेल असाच प्रयत्न करावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. वाद वाढणार नाहीत याची काळजी घेतलेली बरी. भागीदरीत व्यवसाय करणार्यांनी आपल्या भागीदरीला या काळात गृहित धरु नये. गैरसमज व्हायला छोट्या गोष्टीसुध्दा पुरतात हे लक्षात ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने जपून चालवावीत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, दशमात शुक्र, हर्षल लाभस्थानी रवी, बुध आणि व्ययस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडे लक्ष द्या. त्यांना तुमच्या मदतीची/ सल्याची गरज असू शकेल. विद्यार्थ्यांना ग्रहमान तितकेसे अनुकूल नाही. अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स, कमोडिटीसारख्या व्यवहारांपासून सध्या लांबच राहिलेले बरे. प्रेमिकांनाही हा कालावधी चांगला नाही. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या तब्येतीचीही काळजी या काळात घ्यावी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, भाग्यात शुक्र, हर्षल दशमस्थानी रवी, बुध, आणि लाभस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. मन आनंदी असेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांसाठी अनुकुल कालावधी आहे. चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. करणाऱ्यांसाठी अनुकुल कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. एखादं बक्षिस/ धनलाभही होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. वकील किंवा कायदाविषयक कामे करणार्यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, अष्टमात शुक्र, हर्षल भाग्यस्थानी रवी, बुध, आणि दशमस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खबरबात कळेल. साहित्यिकांसाठी चांगला काळ. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. लेखकांना व खेळाडूंना छान काळ आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकूल आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मस्त पार्टीचा मूड असेल. जोडीदाराला खूश करण्यासाठी काही खरेदी होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. कलाकारांना चांगला कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, सप्तमात शुक्र, हर्षल, अष्टमात रवी, बुध, आणि भाग्यस्थानी मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास सुखकर होतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची चांगली मदत मिळेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी रवी, बुध, आणि अष्टमात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवावीत. जोखिम असलेले काम सध्या करु नका. परामानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा गूढ गोष्टींकडे तुमचा कल या काळात वाढणार आहे. सप्ताह मध्य तुमच्यासाठी मस्त असेल. जुन्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. चमचमीत पदार्थ बनविणे तुम्हाला आवडते. घरात छानशी पार्टी करायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कवी, ब्लॉगर्स यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. डोळ्यांच्या किरकोळ तक्रारी या काळात जाणवतील. काळजी घ्या.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठात रवी, बुध, सप्तमस्थानी मंगळ, राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी उत्तम असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. घर किंवा घरासाठी लागणार्या गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात मनाविरुध्द घटना शक्य आहेत. वादग्रस्त विषयांअमध्ये पडू नका. परदेशगमन करणार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी काही आनंद देणार्या घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ शक्य. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल.
मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, पंचमात बुध, रवी, षष्ठात मंगळ, राहू आणि लाभस्थानी वक्री गुरु, व्ययस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. तब्येतीकडे मात्र
दुर्लक्ष करु नका. नोकरीच्या शोधार्थ असणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदीचे योग आहेत. पुर्वी केलेल्या कामापासून किंवा गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. प्रवासयोगही येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुध्द घटना घडण्याची शक्यता आहे. परदेशगमन करणार्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. अचानक खर्च उद्भवू शकतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी रवी, बुध, पंचमात मंगळ, राहू, दशमस्थानी वक्री गुरु, लाभस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, हर्षल, तृतियस्थानात रवी, बुध, चतुर्थस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला रविची बुधाशी युती होईल. २२ तारखेला मंगळाचा हर्षलशी लाभयोग होईल व चंद्राची शनीशी युती होईल. २५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.
प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध