अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ मे ते ११ मे)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात वक्री शनी, केतू व प्लुटो, लाभात नेपचून आणि व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला चांगलं काम घडल्यामुळे खुश असाल मात्र अती दगदग टाळावी. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळाजी घ्यावी. डोळयांशी संबंधीत काही त्रास संभवतो. मनासारखी खरेदी होईल. मनोरंजनासाठी काही खर्च होईल. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. ब्लॉगर्स, वक्ते यांना हा काळ चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस पटकन कामे उरकुन आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात वक्री शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून, लाभात शुक्र आणि व्ययस्थानी रवी, बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारचा दिवस धार्मिक गोष्टींसाठी व खरेदीसाठी चांगला आहे. त्यानंतरचे दोन दिवस खुप छान असतील. काहींना एखादी भेटवस्तु/ बक्षिस/ अचानक धनलाभ संभवतात. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील. सप्ताहाच्या मध्यातही काही धनलाभ होतील. मात्र धनस्थानात नुकताच आलेला मंगळ चंद्राबरोबर युती करेल. आपल्या जिभेवर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा दूरगामी नुकसान होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी जवळच्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, लेखक यांच्यासाठी हा सप्ताह मस्त जाईल. मनासारखं काव्य/ लेखन घडेल.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात वक्री शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, दशमात शुक्र, लाभस्थानी रवी, बुध, हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. छान खरेदीचे योग आहेत. खिशात पैसे भरपूर खुळखुळत असल्याने मस्त भटकंती व शॉपिंगला जायला हरकत नाही. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी सप्ताह मध्य चांगला आहे. जप- जाप्य, ध्यानधारणा यसाठी हा काळ चांगला आहे. काही धनलाभही होऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर घरात पार्टीचा मुड असेल. प्रॉपर्टीची कामे प्रलंबित असतील तर आता त्यामधे प्रगती होतांना दिसेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात वक्री शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, दशमात रवी, बुध, हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने खुष असाल. सप्ताह मध्यात छान प्रवासाचे योग संभवतात. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना लाभदायक काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात वक्री शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, अष्टमात शुक्र, भाग्यात रवी, बुध, हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. रविवारी काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. त्यानंतरचे दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या. वरीष्ठांशी जुळवुन घ्यावे लागेल. रागावर निय़ंत्रण ठेवावे. वरीष्ठांशी उगीचच वाद घातल्यास त्याचे परिणाम बराच काळ भोगायला लागू शकतात. ज्योतिषशास्त्रासारख्या गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्यात धनलाभाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील. काही भाग्यवर्धक घटनाही शक्य आहेत. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात वक्री शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, सप्तमात शुक्र, अष्टमात रवी, बुध, हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारच्या दिवशी काही मनाविरुध्द घटना घडू शकतील. वाहने हळू चालवावीत. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतात. उपासना करण्यार्यांना हा काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन टाळावे.
थेरपिस्ट, मानसोपचारतज्ञ, सर्जन यांना मात्र हा काळ फ़ायदेशीर आहे. सप्ताहाच्या शेवटी नातेवाईक/ मित्रांच्या भेटीये योग आहेत. छान लाभ झाल्याने मन प्रसन्न असेल.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात वक्री शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, षष्टात शुक्र, सप्तमात रवी, बुध, हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी. त्यानंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारींचा असू शकेल. काळजी घ्यावी. वाहने मात्र हळू चालवावीत. वाद टाळावेत. मात्र हा काळ विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोचारतज्ञ यांना चांगला आहे. सप्ताह मध्य धार्मिक गोष्टींसाठी चांगला आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, पंचमात शुक्र, षष्ठस्थानात रवी, बुध, हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारच्या दिवशी अॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास संभवतील. त्यानंतरचे दोन दिवस खुप छान असतील. जोडीदाराबरोबर काही अविस्मरणिय काळ व्यतित कराल. प्रेमिकांना लग्नबंधनात अडकण्यासाठी चांगला काळ आहे. एखादा विषयाचा अभ्यास नव्याने सुरु करायचा असेल तर उत्तम कालावधी आहे. गायक व इतर कलावंतांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य पुन्हा काही शारिरीक त्रासाचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडणेही शक्य आहे. काळजी घ्यावी.
सप्ताहाच्या शेवटी काहींना भाग्यवर्धक घटना थक्क करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थात शुक्र, पंचमस्थानात रवी, बुध, हर्षल, षष्ठात मंगळ, सप्तमस्थानी राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. खेळाडूंना व कलाकारांना छान कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरदार मंडळींना अनुकुल आहेत. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकुल कालावधी आहे. फ़िजिकल फ़िटनेस/ न्युट्रीशियन्स/ वैद्यकीय व्यवसाय करणारे यांना हा काळ फ़ायदेशीर आहे. तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात शुक्र, चतुर्थस्थानी बुध, रवी, हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू आणि लाभस्थानी वक्री गुरु, व्ययस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारच्या दिवशी मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ आहे. नंतरचे दोन दिवस अतिशय छान आहेत. भाग्यकारक घटना शक्य. विद्यार्थी, लेखक, ब्लॉगर्स व कलाकारांना अनुकूल काळ आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादं बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात तब्येत सांभाळावी. नोकरी बदल किंवा नव्या नोकरीच्या प्रयत्नात असाल तर अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर छान वेळ जाणार आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानात रवी, बुध, हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, दशमस्थानी वक्री गुरु, लाभस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
रविवारी छोट्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवास आनंददायी असेल. त्यानंतरचे दोन दिवस कुटुंबीय किंवा नातलग यांच्याबरोवर छान जाणार आहे. घरी मस्त पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यात मुलांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवा. विद्यार्थ्यांना हा काळ खूप चांगला असेल. मात्र अती आत्मविश्वास नको. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. कुठल्याही गोष्टीचा अती विचार करु नका. सल्लागार, वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानात रवी, बुध, हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी वक्री शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला मंगळ व गुरुचा प्रतियोग होईल. ७ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल व शुक्राचा शनीशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग हॊइल व शुक्र व गुरु यांच्यात त्रिकोणयोग होईल. १० तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. काहींना धनलाभ होऊ शकतील. सप्ताह मध्य प्रवासाचे योग आणू शकतो. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते यांच्यासाठी चांगला कालावधी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. आपल्या छंदांना वेळ द्यायला हरकत नाही. प्रेमिकांना विवाह ठरविण्यास हा काळ चांगला आहे. भागीदारीत व्यवसायासही हा काळ अनुकूल
आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध