अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ एप्रिल ते ४ मे)
सध्या मेष राशित सुर्य व धनु राशित शनी-केतू युती होत आहे. उष्णतेचे उच्चांक या काळात दिसत आहेत. सर्वांना विनंती की त्यांनी उन्हात जाणे टाळावे. पाणी भरपूर प्यावे.
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात वक्री गुरु, भाग्यात शनी केतू व प्लुटो, लाभात नेपचून आणि व्ययात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
या सप्ताहात वरीष्ठांशी संबंध बिघडतील असे बोलू किंवा वागू नका. पायासंबंधी काही त्रास किंवा आजार असतील तर या सप्ताहात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग संभवतात. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मस्त खरेदी कराल. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्यांसाठी या कालावधीत जपुन व्यवहार करावेत. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ होऊ शकेल.
उपासना: रोज संध्याकाळी रामरक्षेचे पाठ करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, सप्तमात वक्री गुरु, अष्टमात शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून, लाभात बुध, शुक्र आणि व्ययस्थानी रवी, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह वाहने जपून चालवा. जोखिम असलेली कुठलेही काम या सप्ताहात टाळलेले बरे. कंबर किंवा वातासंबंधी काही त्रास होऊ शकतील. रविवारी संध्याकाळपर्यंतचा काळ धार्मिक गोष्टींसाठी चांगला आहे. त्यानंतरचे २ दिवस कार्यक्षेत्रात प्रतिकूलता देणारे ठरु शकतात. आपल्या कामात चूका होणार नाहीत याची दक्षता घ्या. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात वक्री गुरु, सप्तमात शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, दशमात बुध, शुक्र, लाभस्थानी रवी, हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
संपूर्ण सप्ताह जोडीदाराशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यांचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्या. रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ प्रतिकूल आहे. वाहने जपून चालवा. नंतरचे २ दिवस भाग्यवर्धक ठरु शकतील. मात्र भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी भागीदाराला गृहीत धरु नये. व्यवहार चोख ठेवावेत. काहींना प्रवासयोग संभवतात. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे इष्ट राहील. सप्ताह मध्यात आपल्या हितशत्रूंकडे लक्ष द्या. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरी बदलासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. अनपेक्षित खर्चाचे योग आहेत.
उपासना: मारुतीची उपासना उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात वक्री गुरु, षष्ठात शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमात रवी, हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. आपली व जोडीदाराची तब्येत सांभाळावी. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताह मध्य उत्तम प्रवासाचे असतील. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. एखादं बक्षिस, पाठीवर मिळालेली शाबासकीची एखादी ठाप सुखावून टाकेल. उपासनेसाठीही हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्यायला हरकत नाही. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मित्रांसाठी जरुर वेळ काढावा.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात वक्री गुरु, पंचमात शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, अष्टमात बुध, शुक्र, भाग्यात रवी, हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार संध्याकाळपर्यंत तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस आपल्या परीवाराबरोबर मजेत जातील. आपल्या मुलांना आपल्या मदतीची गरज किंवा त्यांचे काही प्रश्न असतील तर लक्ष द्या. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिष/ इतिहासकार/ सर्जन/ मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना काळ चांगला आहे. प्रॉपर्टीसंबंधीची कामे मात्र
प्रवास शक्यतो टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रवासयोग संभवतात.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात वक्री गुरु, चतुर्थात शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, सप्तमात बुध, शुक्र, अष्टमात रवी, हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
रविवार संध्याकाळपर्यंत दिवस मजेत जाणार आहे. मौज मजा करण्याकडे कल असेल. नंतरचे २ दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र हा काळ नोकरीबदलासाठी चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. वकीलांना हा काळ अनुकुल आहे. फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रात काम करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी वक्री गुरु, तृतियस्थानात शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, षष्टात बुध, शुक्र, सप्तमात रवी, हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
रविवार संध्याकाळपर्यंत घरात छान वातावरण असेल. नंतरचे २ दिवस विद्यार्थ्यांना, कलाकारांना व खेळाडूंना खुप चांगले आहेत. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. जोडीदाराशी वाद संभवतात. जोडीदाराला अनिष्ट ग्रहमान आहे.
उपासना: मारुतीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी वक्री गुरु, धनस्थानी शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, पंचमात बुध, शुक्र, षष्ठस्थानात रवी, हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
आठवडा संमिश्र घटनांचा असणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील मात्र प्रॉपर्टीची कागदपत्रे तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावीत असा ग्रहमानाचा होरा आहे. मन अशांत करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. आईशी वाद टाळावेत. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. सोशल मिडीयावर काहीही शेअर करतांना काळजी घावी. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. कमी श्रमात जास्त यश संभवते. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. अॅसिडिटी किंवा पोटाच्या काही व्याधी असतील तर काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थात बुध, शुक्र, पंचमस्थानात रवी, हर्षल, षष्ठात मंगळ, सप्तमस्थानी राहू आणि व्ययस्थानी वक्री गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग आहेत. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असणार्यांनी या कालावधीत काळजी घेतलेली बरी. उष्माघात (सनस्ट्रोक) होऊ नये म्हणून भर दुपारी उन्हात जाणं टाळावे. त्यावेळी बाहेर जावं लागलच तर पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकूल ग्रहमान आहे. परदेशाशी संबंधीत ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध असतो त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस
विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिंकांनाही प्रतिकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानी रवी, हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू आणि लाभस्थानी वक्री गुरु, व्ययस्थानी शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
रविवारचा दिवस प्रतिकूल आहे. एखादा मनाविरुध्द खर्च करावा लागू शकतो. नंतरचे दोन दिवस आपले खिसा- पाकिट सांभाळा. तसेच आपल्या जवळच्या लोकांना बोलण्यामुळे दुखावू नका. एखादा धनलाभ होता होता राहू शकेल. सप्ताह मध्यात काहींना जवळपासचे प्रवासयोग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. मित्रांच्या भेटी आनंद देतील. काही लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानात बुध, शुक्र, तृतियस्थानात रवी, हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, दशमस्थानी वक्री गुरु, लाभस्थानी शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मौज मजा करण्याकडे कल असेल. काही लाभही होतील. जुने मित्र भेटतील. ऒळखीमुळे काही अडकलेली कामे सहजगत्या होतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील. वडीलधारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नवनविन पदार्थ बनविणे व त्याचा आस्वाद घेणे आपल्याला आवडतं. या काळात एखादा नविन पदार्थ बनवून मस्त पार्टी करायला हरकत नाही. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, धनस्थानात रवी, हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी वक्री गुरु, दशमस्थानी शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सकाळी धनु राशित शनी वक्री होत आहे. १ तारखेला शनी व केतूचा पापकर्तरी योग होत आहे याचबरोबर मंगळाचा शनीशी षडाष्टक होईल, बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल व बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. ३ तारखेला बुध गुरुशी त्रिकोण करेल आणि त्यानंतर लगेच बुध मेषेत प्रवेश करेल.
रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ छान आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होऊ शकतील. काही लाभही होऊ शकतात. त्यानंतरचे २ दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भाग्यावर्धक घटनांचा असू शकतो. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. लांबच्या प्रवासाचे बेत ठरवाल. गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग येतील. सप्ताह अखेरीस सोशल मिडियावर वादग्रस्त ठरेल असे काहीही शेअर करु नका. उष्णतेच्या विकारांचा त्रास होऊ शकेल. काळजी घ्यावी.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध
Nice