अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ एप्रिल ते २७ एप्रिल)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, भाग्यात गुरु, शनी केतू व प्लुटो, लाभात नेपचून आणि व्ययात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
संपूर्ण सप्ताह सतर्क रहाण्याची गरज आहे. सप्ताहाची सुरूवात तितकिशी चांगली नाही. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. मात्र इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असेल. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मात्र या काळात प्रवास शक्यतो टाळलेलेच बरे. प्रवासाला जाणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. गाडीची कागदपत्रे जवळ बाळगा. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात मनाविरुध्द घटना शक्य आहेत. वरीष्ठांना दुखावू नका. मित्रांशी वाद संभवतात. काळजी घ्या.
उपासना: मारुती स्तोत्राचे नित्य पठण करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, अष्टमात गुरु, शनी, केतू व प्लुटो, दशमात नेपचून, लाभात बुध, शुक्र आणि व्ययस्थानी रवी, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. काही विचित्र घटना त्रास देऊ शकतील. वाहने जपून चालवावीत. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतात. सप्ताहाच्या शेवटीही काही मनाविरुध्द किंवा त्रासदायक घटना शक्य आहेत. पूर्ण सप्ताह काळजी घेतलेली बरी.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, भाग्यात नेपचून, दशमात बुध, शुक्र, लाभस्थानी रवी, हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. कुठलीही गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूक कुठे करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. शक्य तो नव्याने काहीही गुंतवणूक या सप्ताहात तरी करु नका. सप्ताह मध्यात संमिश्र अनुभव येतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. वाहने जपून चालवावीत.
उपासना: मारुतीची उपासना उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात गुरु, शनी केतू व प्लुटो, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमात रवी, हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीच्या काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा त्वचाविकार असणार्‍यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर आपल्या जोडीदाराला जपावे. काही वाद असतील तर ते वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
उपासना: गणापतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, सप्तमात नेपचून, अष्टमात बुध, शुक्र, भाग्यात रवी, हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना अनुकूल काळ आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडणार आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. नोकरी करणार्‍यांनी आपल्या वरीष्ठांशी वाद टाळावेत. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. खेळाडूंनी किंवा व्यायाम करणार्‍या लोकांनी आपल्या शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताण या काळात देऊ नये अन्यथा दूरगामी परीणाम होऊ शकतात.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शनी, केतू, प्लुटो, षष्ठात नेपचून, सप्तमात बुध, शुक्र, अष्टमात रवी, हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास करायला चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आईची काळजी घ्यावी. वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. श्वसनासंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना प्रतिकूल काळ आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. प्रेमिकांना प्रतिकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शनी, केतू, प्लुटो, पंचमात नेपचून, षष्टात बुध, शुक्र, सप्तमात रवी, हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. विशेषत: अती तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. सप्ताह मध्यात भावंडांशी वाद टाळावेत. शेजार्‍यांचे विचित्र अनुभव येऊ शकतात. प्रवास शक्य तो टाळलेलेच बरे. प्रवास करावाच लागणार असेल तर सर्व प्रकारची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. घरातील लोकांशी विशेषत: आईशी वाद टाळावेत. शांत झोप लागणं या काळात कठीण दिसते आहे.
उपासना: मारुतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात नेपचून, पंचमात बुध, शुक्र, षष्ठस्थानात रवी, हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर मस्त वेळ जाणार आहे. काही छान बेत ठरवायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे.सप्ताह मध्यात व सप्ताह अखेरपर्यंत काही धनलाभ होता होता राहू शकतील. आपल्या बोलण्यावर या काळात संयम ठेवायला हवा. या काळात नाराज झालेली आपली माणसं कायमची दुरावू शकतात. डॊळ्यांची विशेष काळजी या काळात घ्यायला हवी. काही त्रास असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रवासात आपले खिसा-पाकिट व चीजवस्तू सांभळा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थात बुध, शुक्र, पंचमस्थानात रवी, हर्षल, षष्ठात मंगळ आणि सप्तमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. काही विचित्र अनुभव येऊ शकतात. सप्ताह अखेरीस कुटुंबीय किंवा मित्रमंडळींशी वाद टाळावेत. मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. संपूर्ण सप्ताह काही कारण नसतांना एक प्रकारची हुरहुर किंवा चिंता लागून रहाणार आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप उपयोगी ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानी रवी, हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू आणि व्ययस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना उपासनेत खंड पडणे, मन भक्तीमार्गाकडे न लागणे असे योग आहेत. बेकायदा कोणतीही गोष्ट या काळात करु नका. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. डोके, डोळे व पायांना जपावे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानात बुध, शुक्र, तृतियस्थानात रवी, हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, लाभस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. सप्ताह मध्यात काहींना अचानक पैशांच्या कामाला विलंब होऊ शकतो. काही मनाविरुध्द घटना घडू शकतील. कामात कसूर होऊ नये म्हणून जागरूक रहा. मोठे व्यवहार या काळात न केलेले बरे. काहींना मित्राच्या किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताह अखेरीस पाय/ घोटा यासंबंधी त्रास संभवतो. महत्वाची खरेदी या काळात करु नका.
उपासना: मारुती उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, धनस्थानात रवी, हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला गुरु वक्र गतीने वृश्चिक राशित परत प्रवेश करेल. २३ तारखेला रवि व हर्षल यांची युती होईल. पुढील सप्ताहात शनी व केतू यांचा पापकर्तरी योग होणार आहे. त्याचं सावट या सप्ताहातही रहाणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होतील. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास लाभदायक होतील. धार्मिक गोष्टींसाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात व नंतर नविन विषयाचा अभ्यास करावासा वटेल. वडीलांशी किंवा वडीलधारी व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चुका होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. कष्टाच्या मानाने यश कमी मिळाल्याने मन थोडे खट्टू असेल. एखाद्या मित्राच्या/ नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध