अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३१ मार्च ते ६ एप्रिल)
या सप्ताहाच्या शेवटी मराठी नविन वर्ष सुरु होत आहे. आपणा सर्वांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात राहू, भाग्यात गुरु, शनी केतू व प्लुटो, लाभात बुध, शुक्र, नेपचून आणि व्ययात रवी अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. सप्ताहाच्या मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. लांबच्या प्रवासाचे बेत आखाल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. धनलाभाचे योग संभवतात. आप्तेष्टांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यानंतर छान खरेदीचे योग संभवतात. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. ज्यांचा परदेशी कंपनी बरोबर भागीदारीत व्यवसाय आहे त्यांना हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात मंगळ, व्दितिय स्थानात राहू, अष्टमात गुरु, शनी, केतू व प्लुटो, दशमात बुध, शुक्र, नेपचून, लाभात रवी आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला धार्मिक गोष्टींमध्ये मन लागणे कठीण आहे. तब्येतीच्याही काही तक्रारी जाणवू शकतात. प्रवासात पुरेशी काळजी घेणे उचित ठरेल. सप्ताहाच्या मध्यात गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. मानसशास्त्र, ज्योतिष यासारखे विषय शिकायला ग्रहमान अनुकूल आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नित्याच्या कामात मात्र दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मारुतीची उपासना करणे चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, भाग्यात बुध, शुक्र, नेपचून, दशमात रवी, लाभस्थानी हर्षल आणि व्ययात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाची सुरुवात शारीरिक त्रासाची व कंटाळवाणी होईल. जोडीदाराशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्य जोडीदाराबद्दल काही विचित्र घटना दर्शवीत आहे. प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्यावी. विमानतळ/ रेल्वेस्थानक किंवा बसस्थानक येथे नियोजित वेळेपेक्षा थोडे लवकरच पोचणे गरजेचे आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात आपले काम काटेकोरपणे करावे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. काहींना छान खरेदीचे योग येतील. महादेवाची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात गुरु, शनी केतू, व प्लुटो, अष्टमात बुध, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात रवी, दशमात हर्षल, लाभात मंगळ, आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला पती/पत्नी बरोबर तसेच भागीदारीत व्यवसाय असणार्यांनी वाद टाळावे. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे. सप्ताह मध्यात वातविकार तसेच त्वचेसंबंधी काही समस्या जाणवतील. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. घरात छान उत्सवाचं वातावरण असेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात गुरु, शनी, केतू, प्लुटो, सप्तमात बुध, शुक्र, नेपचून, अष्टमात रवी, भाग्यात हर्षल, दशमात मंगळ आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी चांगला. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याचीसुध्दा काळजी घ्यावी. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यानंतर काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. गूढ विषयांचा अभ्यास करण्यास चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, शनी, केतू, प्लुटो, षष्ठात बुध, शुक्र, नेपचून, सप्तमात रवी, अष्टमात हर्षल, भाग्यात मंगळ, आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काही धनलाभ, मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला आहे. ज्यांना श्वसनाचा किंवा दम्याचा त्रास त्यांनी मात्र या काळात विशेष काळजी घ्यावी. वकील, प्लंबिंग कॉंट्रॅक्टर यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी अनुकुल कालावधी आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, शनी, केतू, प्लुटो, पंचमात बुध, शुक्र, नेपचून, षष्टात रवी, सप्तमात हर्षल, अष्टमात मंगळ, आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घरासंबंधी काही दुरुस्ती/ आवराआवरी बरेच दिवस रेंगाळली असेल तर त्यासाठी वेळ काढाल. प्रॉपर्टीच्या खरेदी/ विक्रीच्या कामांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना चांगला आहे. ब्लॉगर्स, लेखक व खेळाडूंना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतुन फ़ायदा संभवतो. न्युट्रिशियन्स, कौंसिलिंगचे काम करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, चतुर्थात बुध, शुक्र, नेपचून, पंचमात रवी, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमात मंगळ आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या किंवा भावंडांच्या भेटीचे योग येतील. प्रवासाचे किंवा सहलीचे छान योग आहेत. प्रवास लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला आहे. घरात पार्टीचे वातावरण असेल. दमा किंवा श्वसनासंबंधी त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे मात्र अती आत्मविश्वास किंवा गाफ़िल रहाणे नुकसानीचे ठरु शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो, तृतियस्थानात बुध, शुक्र, नेपचून, चतुर्थात रवी, पंचमस्थानात हर्षल, षष्ठात मंगळ आणि सप्तमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील.
सप्ताह मध्यात प्रिय व्यक्ती भेटतील. काही छान लाभ होतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी. प्रवासाचे योग येतील भावंडांची खबरबात कळेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. मनासारखे लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना चांगला कालावधी. कलाकारांनाही अनुकुल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, शुक्र, नेपचून, तृतियस्थानात रवी, चतुर्थस्थानी हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात राहू आणि व्ययस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला एखादा खर्च करावा लागेल. कुटुंबीयांबरोबर वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. डोळ्यांची विशेष काळजी या काळात घ्यायची आहे. सप्ताह मध्यात काहींना प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. भावंडांची खुशाली कळेल. तुमच्या कलागुणांना छान वाव मिळणार आहे. कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभाचे योग आहेत. व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, नेपचून, धनस्थानात रवी, तृतियस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, पंचमात राहू, लाभस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाची सुरूवात खरेदीसाठी अनुकुल असेल. एखादा अचानक किंवा अनावश्यक खर्चही उदभवू शकतो. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. थोडा वेळ स्वत:साठी जरुर काढा. काही छंद असतील तर त्यालाही वेळ द्या. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. चांगले धनलाभ होतील. तर काहींना भाग्यकारक घटना चकीत करतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. सप्ताहाच्या शेवटी लेखक व प्रकाशक यांना ग्रहमान अनुकूल आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, धनस्थानात हर्षल, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, शनी, केतू, प्लुटो आणि व्ययस्थानी बुध, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुधाची नेपचूनशी युती होत आहे. ३० तारखेला गुरु अतीचार गतीने धनु राशित आला असुन तेथे तो २३ एप्रिलपर्यंत असेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम करावे. वरीष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र भेटतील. परदेशासंबंधी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना काही अतींद्रीय अनुभव येण्याची शक्यता आहे. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. सप्ताह अखेर एखादा धनलाभ शक्य आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध