अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० मार्च ते १६ मार्च)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात शुक्र, केतू, लाभात रवी, नेपचून आणि व्ययात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. मायग्रेनचा किंवा उष्णतेचा त्रास असणार्यांना थोडा त्रास संभवतो. उन्हात फ़िरणे शक्यतो टाळावे. उन्हात जावं लागणारच असेल तर पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात मिष्टान्न तसेच आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील.वडीलधारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आपल्याकडून बेकायदा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घ्या. भावंडांशी वाद टाळा. लेखक, ब्लॉगर्स यांनी सोशल मिडियावर वादग्रस्त लिखाण करु नका. त्रास होऊ शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात शुक्र, केतू, दशमात रवी, नेपचून, लाभात बुध आणि व्ययस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहात सुरुवातीला बेकायदा व्यवहार करु नका. वाहने जपुन चालवा. अचानक उदभवलेल्या खर्चाने त्रस्त होऊ शकाल. धर्मिक विचार घोळत राहतील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्या घटना घडू शकतात. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांसाठी अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. आपल्या एखाद्या छंदासाठी किंवा आपल्या मुलांसाठी वेळ काढावा लागेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात शुक्र, केतू, भाग्यात रवी, नेपचून, दशमात बुध, आणि लाभस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहात सुरुवातीला मित्र मैत्रिणींचा सहवास लाभण्याची शक्यता. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नर्तन कलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ शक्य. प्रॉपर्टीच्या कामासही यशदायक काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात शुक्र, केतू, अष्टमात रवी, नेपचून, भाग्यस्थानात बुध आणि दशमात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकुल काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आता चांगली गती मिळायला लागल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायला अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग शक्य आहेत. परदेशाशी व्यवहार ज्यांचा असतो त्यांना हा काळ चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात शुक्र, केतू, सप्तमात रवी, नेपचून, अष्टमात बुध, भाग्यात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
छान आठवडा आहे. भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक गोष्टींसाठी प्रवासयोग शक्य आहे. घराच्या डागडुजीसाठी किंवा घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करावा लागेल. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. बदली किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना काही संधी चालून येतील. या काळात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताहाच्या अखेरीस विचित्र घटना शक्य आहेत. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात शुक्र, केतू, षष्ठात रवी, नेपचून, सप्तमात बुध, अष्टमात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्य उत्तम प्रवासाचे असतील. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. काही लाभही शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. भागीदारीत व्यवसाय सुरु करायला अनुकुल काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शनी, प्लुटो, चतुर्थात शुक्र, केतू, पंचमात रवी, नेपचून, षष्टात बुध, सप्तमात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहाच्या सुरुवातीला आपली चिडचीड वाढेल. जोडीदाराबरोबर किंवा घरातील इतर व्यक्तींबरोबर वाद टाळावेत. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. मात्र कॊणतीही जोखिम घेऊ नका. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. प्रॉपर्टीची कामे करणार असाल तर व्यवहारासंबंधीची कागदपत्रे व्यवस्थित आहेत किंवा नाहीत याची तपासणी तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्या. सप्ताहाच्या शेवटी आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीसंबंधीच्या किरकोळ समस्या जाणवतील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियस्थानात शुक्र, केतू, चतुर्थात रवी, नेपचून, पंचमात बुध, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्याता आहे काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी मात्र अनुकूल कालावधी ठरु शकेल. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी शुक्र, केतू, तृतियस्थानात रवी, नेपचून, चतुर्थात बुध, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कलाकार व खेळाडूंनाही हा कालावधी चांगला आहे. एखादा धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्य फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. कफ़ाचा काही त्रास असेल तर हा काळ थोडासा त्रासदायक आहे. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडुन काही लाभ संभवतात.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, केतू, धनस्थानी रवी, नेपचून, तृतियस्थानात बुध, चतुर्थस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंनाही चांगला काळ आहे. नोकरदार व्यक्तींवर वरीष्ठांची चांगली मर्जी राहील. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, नेपचून, धनस्थानात बुध, तृतियस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात आपल्या चीजवस्तु सांभाळा. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. नृत्यकलेशी संबधितांना यशदायक ग्रहमान आहे. परदेशप्रवासासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना व वक्त्यांना चांगला काळ आहे. काहींना अचानक लाभ संभवतात.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, धनस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभस्थानी शुक्र, केतू आणि व्ययस्थानी रवी, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग होईल. १३ तारखेला रविचा प्लुटोशी लाभयोग होईल. १५ तारखेला रवि मीन राशित तर वक्री बुध मागे येऊन कुंभ राशित प्रवेश करेल. तिथेच रवि व बुधाची युती होईल. (बुध आता २० तारखेपर्यंत अस्तंगत असणार आहे.)
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. आपल्या छंदासाठी थोडा वेळ जरुर काढा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध