अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शुक्र, शनी व प्लुटो, दशमात केतू आणि लाभात रवी, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्य धार्मिक गोष्टींसाठी चांगला आहे. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंनाही चांगला काळ आहे. जुने मित्र भेटतील. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. पुर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ संभवतात. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शुक्र, शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात रवी, बुध, नेपचून आणि व्ययस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
आठवडा छान जाणार आहे. चागले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. छान पार्टीचा मूड असेल. काहींना प्रवासयोग संभवतात. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर घरासाठी/ घरातील वस्तुंच्या डागडुजीसाठी खर्च करावा लागेल. आपले काही छंद असतील किंवा नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शुक्र, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात रवी, बुध, नेपचून आणि लाभस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. जोडीदारबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शुक्र, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात रवी, बुध, नेपचून आणि दशमात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. छान मेजवानीचे बेत आखाल. मात्र एक प्रकारची हुरहुर किंवा एखाद्या गोष्टीची चिंता विनाकारण वाटत राहील. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. लेखकांना छान ग्रहमान आहे. सप्ताह अखेर काहींना भाग्यवर्धक घटनांची ठरेल. प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शुक्र, शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात रवी, बुध, नेपचून, भाग्यात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. अध्यात्मिक मार्गातील लोकांना चांगले अनुभव येतील. सप्ताह मध्यात प्रियजनांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. घरात पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न असेल. कलाकार, वादक, कवी यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शुक्र, शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात रवी, बुध, नेपचून, अष्टमात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छान ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात मनाजोगते काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांची किंवा मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही खर्च करावे लागतील. तब्येतीच्या काही तक्रारीही जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. दुस‍र्‍यांच्या चुका काढणं या कालावधीत कटाक्षाने टाळा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शुक्र, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात रवी, बुध, नेपचून, सप्तमात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकुल काळ आहे. मनासारखे काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. प्रेमिकांना हा काळ अनुकूल आहे. कलाकारांना त्यांच्या कलेचा चांगला मोबदला या काळात मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीला जपावे. बेकायदेशीर कृत्ये टाळावीत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, तृतियस्थानात केतू, चतुर्थात रवी, बुध, नेपचून, आणि षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
रविवारी दुपारपर्यंतचा काळ सोडल्यास सप्ताह अनुकूल आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.  काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, धनस्थानी केतू, तृतियस्थानात रवी, बुध, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व कटकटीची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. एखादं अचानक मिळालेलं गिफ़्ट/ बक्षिस मनाला आनंद देऊन जाईल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. नवनवीन कल्पना सुचतील. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी रवी, बुध, नेपचून, चतुर्थस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शुक्र, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींना गुरुकृपा शक्य. गुरुची उपासना जरुर करावी. धनलाभाचे योग येतील. प्रवासाचेही योग आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, बुध, नेपचून, तृतियस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शुक्र, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. बर्‍याच काळापासुन अडकलेले पैसे अचानकपणे मिळू शकतील. इऩ्शूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, लाभस्थानी केतू आणि व्ययस्थानी रवी, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला शुक्र शनी युती होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल आणि २२ तारखेला शुक्राची प्लुटोशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. सप्ताह मध्य शारीरिक तक्रारींचा असू शकेल. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काही काळ थांबण्याची गरज आहे. नविन गुंतवणुक करणार असाल तर त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे नीट बघून व योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणुक करावी. शेअर मार्केट/ कमोडिटी अशा जोखिम असलेल्या व्यवहारांपासून सध्या लांबच राहिलेले बरे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद टाळा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध

Posted by | View Post | View Group