अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी)

                                                                                             मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शुक्र, शनी व प्लुटो, दशमात रवी, केतू आणि लाभात बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
रविवारचा दिवस खर्च वाढवणारा असेल. काही काळज्याही असतील. सोमवार आणि मंगळवार रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखी/ मायग्रेनसारख्या आजारांचा त्रास संभवतो. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. लेखकांना व ब्लॉगर्सना छान काळ आहे. प्रिंटींग/ पब्लिशिंग क्षेत्रातील लोकांनाही अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                          वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शुक्र, शनी व प्लुटो, भाग्यात रवी, केतू, दशमात बुध, नेपचून आणि व्ययस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. लांबच्या/ परदेश प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. मात्र बेकायदा कुठलाही व्यवहार करु नका. आपल्या चीजवस्तू सांभाळा. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडू शकतात. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकेल. आपल्या एखाद्या छंदासाठी किंवा आपल्या मुलांसाठी खर्च कराल. प्रवासयोग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                            मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शुक्र, शनी, प्लुटो, अष्टमात रवी, केतू, भाग्यात बुध, नेपचून आणि लाभस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही मनाविरुध्द किंवा विचित्र घटना संभवतात. वरीष्ठांशी वाद टाळा. नोकरीबदलासाठी अनुकूल ग्रहमान आहे. मित्र भॆटतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नर्तन कलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. काहींना धनलाभ शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

                                                                                         कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शुक्र, शनी व प्लुटो, सप्तमात रवी, केतू, अष्टमात बुध, नेपचून आणि दशमात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. उपासनेसाठी अनुकूल काळ आहे. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल घटना घडतील. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. मित्रांमध्ये गैरसमज होणे अथवा मित्रांशी वादाचे प्रसंग ऒढवू शकतात. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीला जपावे. विशेषत: सायनस/ सर्दीचा त्रास संभवतो. परदेशाशी व्यवहार ज्यांचा असतो त्यांना मात्र हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                            सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शुक्र, शनी, प्लुटो, षष्ठात रवी, केतू, सप्तमात बुध, नेपचून, भाग्यात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
रविवारचा दिवस आपल्या छंदांसाठी द्या. काहींना सूचक स्वप्ने पडतील. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. प्रवासयोग संभवतात. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. एखादं बक्षिस/ भेटसस्तू सुखावून टाकेल. प्रेमी जीवांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. छान लाभ झाल्याने प्रसन्न असाल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                            कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शुक्र, शनी, प्लुटो, पंचमात रवी, केतू, षष्ठात बुध, नेपचून, अष्टमात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. प्रवासात काळजी घ्या. सर्जन/ थेरपिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. घरात काही बदल करायचे असतील/ सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट मात्र तितकासा चांगला नसेल. आपल्या कामाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. म्हणजे वरीष्ठांना तुमच्या चुका काढायची संधी मिळणार नाही. सर्दी/ सायनसचा त्रास संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                           तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शुक्र, शनी, प्लुटो, चतुर्थात रवी, केतू, पंचमात बुध, नेपचून, सप्तमात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
रविवारी आपल्या तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. त्यानंतरचे २ दिवस जोडीदाराबरोबर मजेत जातील. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. मुलांबद्दल चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या विषयाचा नव्याने अभ्यास सुरू करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
भाग्यकारक घटना घडतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                         वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, तृतियस्थानात रवी, केतू, चतुर्थात बुध, नेपचून, आणि षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या काही तक्रारी असतील तर विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. घरात छान वातावरण असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. परदेशाशी व्यवहार करणार्‍यांसाठीही अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इन्शुरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सूचक स्वप्ने पडतील. प्रॉपर्टीची कामे मात्र सध्या नकोत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                           धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, धनस्थानी रवी, केतू, तृतियस्थानात बुध, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. सप्ताह मध्य वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. कफ़ाचा काही त्रास असेल तर हा काळ थोडासा त्रासदायक आहे. वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                           मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, केतू, धनस्थानी बुध, नेपचून, चतुर्थस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शुक्र, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यात विद्यार्थ्यांना यशासाठी जास्त श्रम करावे लागतील. कलाकार व खेळाडूंना यशासाठी झगडावे लागेल. सप्ताह अखेरीस नोकरदार व्यक्तींवर वरीष्ठांची चांगली मर्जी राहील. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे. मात्र तब्येतीला जपावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                          कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, नेपचून, तृतियस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शुक्र, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी रवी, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील तर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे मात्र या काळात वादग्रस्त लिखाण टाळा. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना चांगली आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

                                                                                             मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शुक्र, शनी, प्लुटो, लाभस्थानी रवी, केतू आणि व्ययस्थानी बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला रवी कुंभ राशित प्रवेश करेल आणि मंगळ हर्षलशी युती करेल. १७ तारखेला शुक्राचा नेपचूनशी लाभयोग होईल. १८ तारखेला रविचा हर्षलशी लाभयोग होईल तर शुक्राची शनीशी युती होईल.
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. परदेश प्रवासासाठीही अनुकूल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध