अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० डिसेंबर ते ५ जानेवारी)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र, अष्टमात बुध, गुरु, भाग्यात रवि, शनी व प्लुटो, दशमात केतू,  लाभात नेपचून व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली संधी मिळेल. घरात छान पार्टीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी ऐकायला मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्बेतीची काळजी घ्या. कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. आपली धार्मिक मते मात्र दुसर्‍यांवर लादू नका. प्रवासाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात बुध, गुरु, अष्टमात रवि, शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात नेपचून, लाभात मंगळ आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर व मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांनासुध्दा छान कालावधी आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या काही तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या जोडीदाराला लाभदायक ग्रहमान आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नका.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात शुक्र, षष्ठात बुध, गुरु, सप्तमात रवि, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात नेपचून, दशमात मंगळ आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल. घरासंबंधी एखादी दुरुस्ती किंवा सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्य कलाकारांना खुप अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही त्रास शक्य. काळजी घ्यावी. नोकरी बदल ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी मात्र अनुकुल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात बुध, गुरु, षष्ठात रवि, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात काही सुखद/ आंनंददायक प्रसंग घडू शकतात. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची कामे करणार्‍यांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात शुक्र, चतुर्थात बुध, गुरु, पंचमात रवि, शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात मंगळ, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. कुटुंबात वादाचे प्रसंग टाळावेत. लेखक, वक्ते, कलाकार यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत चांगला आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकुल आहे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. एखादा अचानक धनलाभही होऊ शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियस्थानात बुध, गुरु, चतुर्थात रवि, शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात नेपचून, सप्तमात मंगळ, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. सप्ताह मध्य कलाकारांना, वक्त्यांना चांगला आहे. आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येऊ शकतात. घरासंबंधी एखादी दुरुस्ती किंवा सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, धनस्थानी बुध, गुरु, तृतियस्थानात रवि, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमात हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा अनपेक्षित खर्च करावा लागू शकतो. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत घालवण्याकडे कल असेल. सप्ताह मध्यात मनावर व बोलण्यावर संयम ठेवावा. आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक प्रवासयोग आहेत. भावंडांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीचे योग येतील. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, धनस्थानी रवि, शनी, प्लुटो, तृतियस्थानात केतू, चतुर्थात नेपचून, पंचमस्थानात मंगळ आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या भेटीचे योग येतील. कामानिमित्त प्रवास शक्य. मात्र अती दगदग टाळावी. मनासारखी चांगली खरेदी कराल. सप्ताह मध्यात हातातलं काम लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर घरात छान मेजवानीचे योग येतील. मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न करणार्‍या घटना अपेक्षित आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शनी, प्लुटो, धनस्थानी केतू, तृतियस्थानात नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानी बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला हातातील कामे पटकन उरकुन आराम करण्याकडे कल असेल. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. धनलाभही होतील. सप्ताहाच्या मध्यात घरासंबंधी एखादी दुरुस्ती किंवा सुधारणा करावी लागण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र हा काळ अध्यात्मिक उन्न्तीसाठी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात मंगळ, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  शुक्र आणि लाभस्थानी बुध, गुरु, व्ययस्थानी रवि, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस प्रवासाचे योग येतील. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. सप्ताह मध्यात छान काम झाल्याने वरीष्ठांकडून कौतूकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी मंगळ, तृतियस्थानात हर्षल, षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी बुध, गुरु, लाभस्थानी रवि, शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर त्यात सुधारणा होत जाईल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. छान प्रवास आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम झाल्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. काही धनलाभ अपेक्षित आहेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, अष्टमात शुक्र, भाग्यस्थानी बुध, गुरु, दशमस्थानी रवि, शनी, प्लुटो, लाभस्थानी केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ जानेवारीला बुध धनु राशित व शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करतील. २ तारखेला रविची शनीशी युती होईल आणि ४ तारखेला रविचा नेपचूनशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. ईंन्शूरन्ससंबंधी कामे करणार्‍यांना तसेच लेखक व कवी यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. सप्ताह मध्यानंतर ठरविलेल्या धार्मिक गोष्टींमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक घटनांचा आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध