अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात
शुक्र, अष्टमात बुध, गुरु, भाग्यात रवि, शनी व प्लुटो, दशमात केतू व लाभात मंगळ,
नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४ तारखेला
बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील.
साहित्यिकांसाठी व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल.
प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही
दुरुस्ती, काही प्रलंबित कामे असल्यास त्यांना प्राधान्य द्या. घरातील वातावरण छान असेल.
सप्ताहाच्या मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात बुध,
गुरु, अष्टमात रवि, शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात मंगळ व नेपचून आणि
व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४
तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग
होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. छान पार्टी करायला हरकत नाही.
काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक
स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर घरात वाद होणार नाहीत याची
काळजी घ्या. घरातील चीजवस्तू सांभाळा. सप्ताहाच्या अखेरीस कलाकारांना व विद्यार्थ्यांना
अनुकुल काळ आहे. प्रेमिकांनाही लग्न ठरविण्यास अनुकुल ग्रहमान आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात शुक्र, षष्ठात बुध,
गुरु,  सप्तमात रवि, शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात मंगळ, नेपचून आणि लाभस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४ तारखेला
बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला सर्दी/ सायनस किंवा थंडीमुळे त्रास होऊ शकेल. कोणाशी विनाकारण
शत्रुत्व ऒढवून घेऊ नका. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकुल काळ आहे. सप्ताह
मध्यात घरात छान वातावरण असेल. कुटुंबीयांसमवेत छान पार्टीचा मूड असेल. मन प्रसन्न
असेल. सप्ताह मध्यानंतर सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करु नका. सप्ताहाच्या
अखेरीस प्रॉपर्टीची कामे टाळलेलीच बरी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात बुध,
गुरु, षष्ठात रवि, शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात मंगळ, नेपचून आणि दशमात
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४ तारखेला
बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात छाम खरेदीची होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त
शॉपिंगला जायला हरकत नाही. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घाटना संभवतात.
सप्ताह मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. आपल्या बोलण्यामुळे कॊणी
दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या अखेरीस लेखक, कलाकार, ब्लॉगर्स
यांना अत्यंत चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत शुक्र, चतुर्थात बुध, गुरु, पंचमात
रवि, शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात मंगळ, नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी
राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४ तारखेला
बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घराच्या देखभालीसाठी
किंवा सजावटीकडे लक्ष द्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची किंवा
काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर आपले काही छंद असतील तर
त्यासाठी किंवा नविन विषयांचा अभ्यास करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या
अखेरीस मन प्रसन्न असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत बुध, गुरु, चतुर्थात
रवि, शनी, प्लुटो, पंचमात केतू,  षष्ठात मंगळ, नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू
आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल.
२४ तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग
होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक
होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यालयिन कामासाठी प्रवास
करावा लागु शकेल. सप्ताह मध्यात एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी होण्याचे योग
येऊ शकतात. धनलाभ होतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील.
सप्ताह अखेरीस आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी बुध, गुरु,
तृतियेत रवि, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात मंगळ, नेपचून, सप्तमात हर्षल आणि
दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४
तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
धनलाभाचे योग आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताह मध्यात
आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांबरोबर किंवा
नातेवाईकांबरोबर वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग शक्य.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, गुरु, धनस्थानी रवि,
शनी, प्लुटो, तृतियेत केतू, चतुर्थात मंगळ,  नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल,
भाग्यस्थानी राहू आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन
राशित प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला
शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. मात्र हा कालावधी इंशुरंन्सचं काम
करणारे तसेच ज्योतिषी यांना अनुकुल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला
आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे
काम झाल्याने मन प्रसन्न असेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. सप्ताहाच्या शेवटी
मित्रमंडळींच्या भेटी शक्य. काही लाभही होऊ शकतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, शनी, प्लुटो, धनस्थानी
केतू, तृतिय स्थानात मंगळ, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी
शुक्र आणि व्ययस्थानी बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित
प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा
प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान खरेदीचा मूड
असेल. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. सप्ताह मध्यानंतर
काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी
अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. आप्तेष्टांबरोबर
छान पार्टी साजरी करायला हरकत नाही.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी मंगळ, नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू, दशमस्थानी  शुक्र आणि लाभस्थानी बुध, गुरु,
व्ययस्थानी रवि, शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित
प्रवेश करेल. २४ तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा
प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व
कायदाविषयी काम करणार्‍यांसाठी फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर
वेळ मजेत घालवायला मिळेल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही.
सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर
धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी बुध, गुरु, लाभस्थानी रवि, शनी, प्लुटो
आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल.
२४ तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग
होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं
बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकुल काळ आहे. सप्ताह
मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा ठरु शकेल सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत
जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक
धनलाभाचे योग संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू, अष्टमात
शुक्र, भाग्यस्थानी बुध, गुरु, दशमस्थानी रवि, शनी, प्लुटो, लाभस्थानी केतू आणि व्ययस्थानी
मंगळ, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला मंगळ मीन राशित प्रवेश करेल. २४
तारखेला बुधाचा नेपचूनशी केंद्रयोग होईल आणि २८ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग
येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी व्हाल. सप्ताहाचा
मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नविन
नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. पूर्वी
केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध