अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ डिसेंबर ते २२ डिसेंबर)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात
शुक्र, अष्टमात रवि, बुध, गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात केतू व लाभात मंगळ,
नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा
प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही गोष्टींसाठी खर्च करावा लागेल. काही मनाविरुध्द घटना
शक्य आहेत. पारमार्थिक उन्नती करणार्यांसाठी मात्र हा काळ उत्तम असणार आहे.
सप्ताहाच्या मध्यात छान धनलाभाचे योग आहेत. मित्रांबरोबर वेळ घालविता येईल.
गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा
असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताहाची अखेर लाभदायक असेल. आपल्या जोडीदाराला
जरुर वेळ द्यावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि,
बुध, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात मंगळ व नेपचून आणि व्ययस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा
प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला अष्टमात रविचं आगमन होत आहे. या सप्ताहात खर्च वाढू शकतील.
प्रॉपर्टीच्या देखभालीसाठी किंवा प्रॉपर्टीच्या इतर कारणांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतील.
प्रॉपर्टी विकायची असेल तर थोडा जास्त प्रयत्न केल्यास यश मिळू शकेल. वरीष्ठांचे सहकार्य
मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभाचे योग आहेत.
सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. कुठलेही नविन निर्णय त्या २/३ दिवसात
घेऊ नका. जोडीदाराशी वाद टाळावेत. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि,
बुध, गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात मंगळ, नेपचून आणि लाभस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा
प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी/ सहकार्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
हितशत्रूंवर लक्ष ठेवा. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र हा काळ
चांगला आहे. सप्ताह मध्य छान असेल. काही भाग्यदायक घटना घडू शकतील. काही धनलाभ
अपेक्षित असतील तर त्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे.
सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मस्त
शॉपिंगला जायचा मूड असेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि,
बुध, गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात केतू, अष्टमात मंगळ, नेपचून आणि दशमात
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा
प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी
त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह
मध्यात आपले काम बरे व आपण बरे हे धोरण ठेवावे. वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे वागू
नका. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभ शक्य. मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीगाठीचे योग
संभवतात. प्रॉपर्टीच्या कामासाठी हा काळ चांगला आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत शुक्र, चतुर्थात रवि, बुध, गुरु, पंचमात
शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात मंगळ, नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू
अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा प्लूटोशी व शुक्राचा
शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण
होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. मनाचा तोल जाऊ
देऊ नये. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे.
प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराबद्दल चांगली बातमी समजेल. भागीदारीत व्यवसाय
करणार्यांना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रवासातून फ़ायद्याचे योग आहेत.
भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न
असेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत रवि, बुध, गुरु,
चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात केतू, षष्ठात मंगळ, नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी
राहू आणि लग्नस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश
करेल, मंगळाचा प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती
होईल आणि शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय
करणार्यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा असू शकतो. अॅसिडीटी
किंवा पोटाचा त्रास या काळात होऊ शकतो. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेर
आपल्याला भाग्यवर्धक ठरु शकेल. काहींना धनलाभ होतील. घरात मस्त पार्टीचा मूड
असेल. कलेच्या क्षेत्रातील लोकांना विशेषत: गायकांना चांगलं ग्रहमान आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी रवि, बुध, गुरु,
तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात मंगळ, नेपचून, सप्तमात हर्षल आणि
दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा
प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीची काळजी घ्यायला हवी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. वैद्यकीय
व्यवसाय करणार्यांना मात्र चांगला काळ आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकुल काळ
आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला जाईल. जोडीदाराबरोबर वेळ
छान व्यतीत होईल. प्रेमिकांनाही हा काळ चांगला आहे. त्यांना लग्नासाठी विचारणा होऊ
शकते. सप्ताह अखेर संमिश्र घटनांचा असू शकेल. वाहने जपून चालवावीत. रवि संपूर्ण सप्ताह
अनुकुल असल्याने आत्मविश्वास वाढलेला असणार आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, गुरु, धनस्थानी शनी,
प्लुटो, तृतियेत केतू, चतुर्थात मंगळ, नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू
आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल,
मंगळाचा प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल
आणि शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात येणारा रवि आपल्या कार्यक्षेत्रातील यशाची व्याप्ती
वाढविणार आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं
बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकुल काळ आहे. नवीन
विषयाचा अभ्यास सुरु करण्यास अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी
अनुकुल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा मिळू शकतो. तब्बेतीच्या काही तक्रारी
निर्मांण होऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मस्त खरेदी होऊ शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी केतू,
तृतिय स्थानात मंगळ, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, लाभस्थानी शुक्र आणि
व्ययस्थानी रवि, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल,
मंगळाचा प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहातील सुरुवातीला घरातील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्या. परदेशाशी
ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगला काळ आहे. प्रॉपर्टी ज्यांना विकायची असेल त्यांना
अनुकुल किंमत मिळू शकेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे.
सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीची काळजी घ्यावी. एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल.
एखाद्या मित्रामुळे अडकलेलं एखादं काम होऊ शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू, धनस्थानी मंगळ, नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी राहू, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी रवि, बुध, गुरु,
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल,
मंगळाचा प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
१६ तारखेला रवि आपल्या व्ययस्थानात येत आहे. तेथे तो महिनाभर असणार असेल. या संपूर्ण
काळात बेकायदेशीर व्यवहार टाळावे. वाहतूकीचे नियम पाळावेत. कुणाशी वाद विकोपाला
जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडे किंवा
आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. साहित्यिकांसाठी व कलाकारांसाठी चांगला काळ आहे.
मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकुल. सप्ताहाच्या
शेवटी एखादा धनलाभ संभवतो. ब्लॉगर्स, खेळाडू व कलाकारांना अनुकुल कालावधी आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी रवि, बुध, गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित प्रवेश करेल, मंगळाचा
प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु युती होईल आणि
शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल.
आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह मध्यानंतर
प्रवासयोग शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे
वातावरण असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व
कलाकारांना अनुकुल कालावधी आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुलता
आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,
अष्टमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी रवि, बुध, गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी
केतू आणि व्ययस्थानी मंगळ, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि धनु राशित
प्रवेश करेल, मंगळाचा प्लूटोशी व शुक्राचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुध व गुरु
युती होईल आणि शुक्राचा नेपचूनशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीस आपला आत्मविश्वास वाढवण्यार्या घटना संभवतात. प्रवासयोग येतील.
धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक खर्चाचे योग संभवतात.
आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सप्ताह
मध्यानंतर काही जुन्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. प्रवासातून लाभ
संभवतात लेखक व ब्लॉगर्स यांनाही चांगला काळ आहे. मात्र कुणाचे मन दुखावेल असे
लिखाण टाळावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अॅस्ट्रोशोध
Lagna rashikadun ka chandrarashikadun baghayche?
चंद्रराशिवरुन बघणे.